Lokmat Sakhi >Beauty > पिंपल्समुळे चेहरा डल वाटतो? शहनाज हुसैनच्या ७ टिप्स, नितळ-डागविरहीत दिसेल त्वचा

पिंपल्समुळे चेहरा डल वाटतो? शहनाज हुसैनच्या ७ टिप्स, नितळ-डागविरहीत दिसेल त्वचा

Skin Care Tips by shahnaz husain : ब्लॅकहेट्स, व्हाईटहेट्स आणि सिस्टचा त्रास उद्भवतो. शहनाज हुसैन यांनी एक्ने कंट्रोल करण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 08:16 PM2023-03-22T20:16:56+5:302023-03-22T20:24:56+5:30

Skin Care Tips by shahnaz husain : ब्लॅकहेट्स, व्हाईटहेट्स आणि सिस्टचा त्रास उद्भवतो. शहनाज हुसैन यांनी एक्ने कंट्रोल करण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत.

Skin Care Tips by shahnaz husain : How to control acne in teenage by shahnaz husain: | पिंपल्समुळे चेहरा डल वाटतो? शहनाज हुसैनच्या ७ टिप्स, नितळ-डागविरहीत दिसेल त्वचा

पिंपल्समुळे चेहरा डल वाटतो? शहनाज हुसैनच्या ७ टिप्स, नितळ-डागविरहीत दिसेल त्वचा

पिंपल्स तेलकट त्वचेवर येतात. तर कधी हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर एक्ने येतात. ब्लॅकहेट्सवर लक्ष  न दिल्यानं टिश्यू ट्रिगर होतात परिणामी त्वचेवर सूज येते. (How to control acne) एक्नेमध्ये बॅक्टेरिअल आणि इंफेक्शन एक्टिव्हीज होतात. यामुळे ब्लॅकहेट्स, व्हाईटहेट्स आणि  सिस्टचा त्रास उद्भवतो. शहनाज हुसैन यांनी एक्ने कंट्रोल करण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत. (How to control acne in teenage by shahnaz husain)

एक्ने स्किन केअर टिप्स

१) हेल्दी आणि निरोग स्किनचं सिक्रेट आहे क्लिजिंग. योग्य उत्पादनांच्या मदतीनं चेहरा स्वच्छ ठेवल्यास त्वचा सतत तेलकट होणार नाही. जर सतत तुमचा चेहरा तेलकट राहत असेल तर एस्ट्रींजंट लोशन आणि स्किन टॉनिकचा वापर करू शकता. 

२) काकडीत एस्ट्रीजेंड इफेक्ट्स असतात. काकडीचा गर चेहऱ्याला लावून १५ मिनिटांनी साध्या पाण्यानं  तोंड स्वच्छ धुवा.

३) आपण चेहऱ्यावर ग्रीन टी चा वापरही करू शकता. ग्रीन टी ची पानं  गरम पाण्यात अर्ध्या तासासाठी भिजवायला ठेवा.  गाळ्यानंतर हे लिक्विड त्वचेला लावा.

चेहरा गोरा पण मान-पाठ खूपच काळपट दिसते? ४ उपाय, संपूर्ण शरीराचं टॅनिंग होईल दूर

४) चंदनाची पेस्ट पिंपल्स, एक्ने आणि पुळ्यांवर लावता येते.  रॅशेज असलेल्या ठिकाणी चंदनासह गुलाबपाणी मिसळून चेहऱ्याला लावा.  २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा.

५) कडुलिंबाची पानं पाण्यात मंद आचेवर उकळा. हे पाणी थंड करून गाळून घ्या. कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून रोज लावा. 30 मिनिटांनंतर ते धुवा. मुरुमांसाठी तुळशीचा वापर करू शकता. तुळशीमध्ये जंतुनाशक  गुणधर्म आहेत.

६)मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. ते कोरडे झाल्यावर, त्वचा स्वच्छ करा.

किचनमधल्या ४ पदार्थांमध्ये दडलेत ॲण्टी एजिंग गुण; रोज खा,तिशीनंतरही कायम दिसाल तरुण आणि फ्रेश

७) एक चमचा दालचिनी पावडर, अर्धा चमचा मेथीच्या बियांची पावडर, लिंबाचा रस आणि मधाचे काही थेंब मिसळून पेस्ट तयार करा. रात्रभर चेहऱ्याला लावून सकाळी चेहरा स्वच्छ धुवा. 

Web Title: Skin Care Tips by shahnaz husain : How to control acne in teenage by shahnaz husain:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.