Lokmat Sakhi >Beauty > काळ्या डागांमुळे चेहऱ्याचा ग्लो हरवलाय? शहनाज हुसैन सांगतात ३ उपाय; चेहऱ्यावर येईल ग्लो

काळ्या डागांमुळे चेहऱ्याचा ग्लो हरवलाय? शहनाज हुसैन सांगतात ३ उपाय; चेहऱ्यावर येईल ग्लो

Skin care tips by shahnaz husain : शहनाज हुसैन यांनी एक्ने कंट्रोल करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. (Skin care tips by shahnaz husain)

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 08:33 AM2023-06-27T08:33:00+5:302023-06-27T13:23:28+5:30

Skin care tips by shahnaz husain : शहनाज हुसैन यांनी एक्ने कंट्रोल करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. (Skin care tips by shahnaz husain)

Skin care tips by shahnaz husain : Shahnaz Hussain Shares 5 Beauty Tips For Glowing Skin | काळ्या डागांमुळे चेहऱ्याचा ग्लो हरवलाय? शहनाज हुसैन सांगतात ३ उपाय; चेहऱ्यावर येईल ग्लो

काळ्या डागांमुळे चेहऱ्याचा ग्लो हरवलाय? शहनाज हुसैन सांगतात ३ उपाय; चेहऱ्यावर येईल ग्लो

पिंपल्स नेहमी तेलकट त्वचेवर दिसून येतात. टिनएजमध्ये हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर एक्ने येतात.ब्लॅकहेड्स पासून एक्नेची सुरूवात होते.  (How to remove pimples spots from face) ब्लॅकहेड्सकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळे त्वचेच्या आजूबाजूचे टिश्यूजना सूज येते आणि पिंपल्स आणि डाग त्यावर येतात. एक्नेमध्ये बॅक्टेरियअल आणि इन्फेक्शन एक्टिव्हिज होतात. यामुळे ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स आणि सिस्ट येते. शहनाज हुसैन यांनी एक्ने कंट्रोल करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. (Skin care tips by shahnaz husain)

कडुलिंबाची पानं

कडुलिंबाची पानं तब्येतीसाठी फायदेशीर ठरतात. याचा वापर तुम्ही त्वचेवरही करू शकता. कडुलिंबाच्या पानात एंटी सेप्टीक गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेच्या समस्यांशी लढण्यास मदत होते. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. आता त्यात मूठभर कडुलिंबाची पाने टाका. गॅस मंद आचेवर करून थोडा वेळ उकळवा. साधारण 15-20 मिनिटांनी गॅस बंद करा. पाणी थंड झाल्यावर बाटलीत गाळून घ्या. एक्ने असलेल्या ठिकाणी कडुलिंबाच्या पाण्याचा स्प्रे करा आणि सुकण्यासाठी ठेवा. रोज या पाण्याचा वापर केल्यानं एक्नेचा त्रास कमी होईल.

चंदन पावडर

२ चमचे चंदन पावडरमध्ये ३-४ चमचे गुलाबजल टाका आणि आता त्यात मिसळा. ही पेस्ट मुरुमांवर वापरू शकता. या पेस्टमध्ये कापूस भिजवा. आता मुरुमांच्या भागावर कापूस लावा. ही पेस्ट सुकल्यावर पाण्याने स्वच्छ करा. रात्रीच्या वेळीही चेहरा स्वच्छ करावा. मेकअप, तेल, धूळ आणि घाण साफ करा. मुरुमांची समस्या कमी करण्यासाठी बाजारात अनेक औषधी साबण आणि क्लिन्झर उपलब्ध आहेत. त्वचा तेलकट असेल तर तेलकट क्रीम आणि मॉइश्चरायझर वापरू नका.

त्वचा क्लिज करा

आपली त्वचा योग्य प्रकारे स्वच्छ करणे किंवा स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी विशेषतः रात्री मेकअप काढून झोपा. त्वचा स्वच्छ करण्यासाठी, शहनाज कोरफड आणि लिंबू क्लिन्झर वापरण्याची शिफारस करतात. शहनाज उन्हापासून त्वचेचं संरक्षणाचा सल्ला देतात. त्यांच्यामते सूर्यप्रकाश त्वचेचं मॉईश्चर शोषून घेतो. म्हणूनच उन्हाळ्यातच नव्हे तर हिवाळ्यातही सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. यासाठी उच्च एसपीएफ असलेले सनस्क्रीन निवडा.

Web Title: Skin care tips by shahnaz husain : Shahnaz Hussain Shares 5 Beauty Tips For Glowing Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.