Join us  

Skin care tips : चेहरा निस्तेज, बेजान, एकदम डल दिसतोय? चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी झटपट करा ३ उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2022 6:48 PM

Skin care tips : आधीच आपला मूड खराब त्यात चेहरा डल दिसायला लागला की काय करावे आपल्याला कळत नाही, चेहऱ्यावरचे तेज परत आणण्यासाठी सोप्या टिप्स...

ठळक मुद्देत्वचा निस्तेज झाली की काय करावे कळत नाही, मग कधी पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट घेतल्या जातात तर कधी आणखी काही... पण स्कीन केअर रुटीनमध्ये काही गोष्टी केल्यास त्वचा टवटवीत राहण्यास मदत होते

चेहऱ्याचे सौंदर्य हे चेहऱ्याची त्वचा किती ग्लोइंग आहे यावर अवलंबून असते. अनेकदा एकाएकी आपला चेहरा निस्तेज दिसतो. चेहरा डल दिसायला लागला की गेलेला ग्लो परत आणण्यासाठी काय करावे Skin care tips ते आपल्याला कळत नाही. कामाचा ताण, हवामानातील बदल, अपुरी झोप, आहारातील चुका यांमुळे चेहऱ्याचे तेज कमी होते आणि  चेहरा बेजान दिसायला लागतो. आपला चेहरा टिव्ही किंवा चित्रपटातील अभिनेत्रींसारखा ग्लोइंग असावा असे प्रत्येक तरुणीला वाटते. मग कधी कोणाच्या सांगण्यानुसार घरगुती उपाय केले जातात तर कधी पार्लरमध्ये जाऊन महागडे उपचार घेतले जातात. मात्र यासाठी बराच वेळ आणि पैसा खर्च होतो. मात्र या समस्येपासून तुम्हाला स्वत:ची सुटका करायची असेल तर प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ अनिका गोयल काही सोप्या टिप्स सांगतात. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ३ सोप्या टिप्स शेअर करत त्या आपल्या फॉलोअर्सना याबाबतची माहिती देतात. त्यांनी सांगितलेल्या टिप्स आपली डल पडलेली त्वचा ग्लो करण्यासाठी उपयुक्त ठरतात. 

१. केमिकल एक्सफोलिएशन 

हे असे एक टेक्निक आहे ज्यामध्ये अॅसिडच्या मदतीने त्वचेतून मृत पेशी काढल्या जातात. या प्रक्रियेमुळे व्यक्तीची स्कीन आधीपेक्षा चमकदार आणि मुलायम होते. ही प्रक्रिया आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार केली जाते. तेलकट, कोरडी आणि इतर त्वचा प्रकारांसाठी ही केमिकल एक्सफोलिएशन प्रक्रिया केली जाते.     ग्लायकोलिक अॅसिड आणि लॅक्टीक अॅसिड त्वचेसाठी अतिशय चांगले मानले जाते. त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा ही प्रक्रिया करायला हवी. 

२. सेरामाईड बेस मॉइश्चरायझरचा वापर 

स्कीन केअर रुटीनसाठी मॉइश्चरायझर अतिशय गरजेचे असते. त्वचा खूप कोरडी होते तेव्हा मॉइश्चरायझर लावणे आवश्यक असते. तुमची स्कीन डल पडली असेल तर सेरामाइड बेस असलेले मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्याबरोबरच इतरही फायदे होतात. त्यामुळे तुमच्या स्कीनचा प्रकार लक्षात घेऊन बाजारात मिळणारे वेगवेगळ्या ब्रँडपैकी आपल्या चेहऱ्याला सूट होईल असे मॉइश्चरायझर वापरा. 

३. सनस्क्रीनचा आवर्जून वापर करा

टॅनिंगपासून वाचायचे असेल तर आपण सगळ्यांनीच नियमितपणे सनस्क्रीनचा वापर करायला हवा. चेहऱ्याचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करण्याबरोबरच निस्तेज त्वचेमध्ये सुधार करण्यासाठी सनस्क्रीन अतिशय उपयुक्त ठरते. त्वचा एक्सफॉलिएट केल्यानंतर सनसनक्रीनचा आवर्जून वापर करा. याबरोबरच मेकअप करण्याआधीही सनस्क्रीनचा योग्य पद्धतीने वापर करा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी