Join us  

Skin Care Tips : व्हिटॅमिन इ असलेले महागडे स्कीन सिरम आता घरीही बनवता येईल, पाहा सोपी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2022 12:09 PM

Skin Care Tips : पाहूया उन्हाळ्यात त्वचा तजेलदार राहण्यासाठी घरच्या घरी सिरम कसे तयार करायचे?

ठळक मुद्देव्हिटॅमिन इ बरोबरच तुम्ही व्हिटॅमिन सी च्याही कॅप्सूल्स सीरममध्ये घालू शकता.हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा नैसर्गिक पदार्थ वापरुन करा घरच्या घरी सिरम

दिवसेंदिवस उकाडा वाढत जातो तशा त्वचेशी संबंधित तक्रारीही वाढत जातात. कधी उकाड्यामुळे त्वचा खूप कोरडी पडणे तर कधी निस्तेज होणे अशा समस्या उन्हाळ्यात भेडसावतात. एकीकडे अंगाची लाहीलाही झाल्याने पाणी पाणी होते तर दुसरीकडे त्वचेला खाज येणे किंवा आणखी काही समस्या उद्भवतात. उन्हाळ्यात त्वचा मॉश्चराइज राहणे आणि डिहायड्रेशनपासून त्वचेचे रक्षण करणे अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याबरोबरच चेहऱ्याची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक असते. आपण चेहऱ्यासाठी नियमितपणे अनेक सोंदर्यप्रसाधने वापरत असतो. कधी चेहऱ्यावरचे काळे डाग जाण्यासाठी तर कधी पिंपल्स दूर होण्यासाठी विविध उत्पादने वापरली जातात. 

(Image : Google)

सीरम हे त्वचेसाठी असेच एक महत्त्वाचे सौंदर्यप्रसाधन असून चेहऱ्यावरचा तजेला वाढण्यासाठी ते अतिशय महत्त्वाचे काम करते. बाजारात अनेक कंपन्यांची वेगवेगळी सीरम मिळतात, पण त्यामध्ये असणाऱ्या केमिकल्समुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा घरच्या घरीच सिरम तयार केले तर ते जास्त फायदेशीर ठरते. आपली त्वचा चांगली राहण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन इ, सी, जी अशा सगळ्यांची आवश्यकता असते. आहारातून हे घटक आपल्याला मिळतातच. पण त्वचेला वरुन हे घटक दिले तरी त्याचा चांगला फायदा होतो. यामुळे त्वचा आणखी तजेलदार दिसण्यास मदत होते. पाहूया उन्हाळ्यात त्वचा तजेलदार राहण्यासाठी घरच्या घरी सिरम कसे तयार करायचे? यातील व्हिटॅमिन इ मुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. 

साहित्य - 

१. ३ ते ४ व्हिटॅमिन इ कॅप्सूल२. २ चमचे कोरफडीचा गर ३. २ चमचे गुलाब पाणी 

(Image : Google)

कृती - १. एका वाटीत व्हिटॅमिन इ कॅप्सूल फोडा.२. त्यामध्ये गुलाब पाणी आणि कोरफडीचा गर घाला. ३. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित एकत्र करा. ४. आता चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करा. ५. आता ही तयार केलेली पेस्ट चेहऱ्याला एकसारखी लावा आणि १५ ते २० मिनीटे तशीच ठेवा. ६. थोडा वेळाने हे मिश्रण वाळेल, त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. ७. व्हिटॅमिन इ बरोबरच तुम्ही व्हिटॅमिन सी च्याही कॅप्सूल्स सीरममध्ये घालू शकता, त्यामुळे त्वचा आणखी उजळ होते.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसमर स्पेशल