मॉईश्चरायझर आणि सनस्क्रिन लावणे हा आपल्या रोजच्या स्किनकेअर रुटीनचा भाग आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक आहेत. पण तरीही बहुसंख्य लोक नेमकी इथेच चूक करतात. वारंवार ही चूक होत जाते. त्यामुळे मग त्याचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. त्वचा सैल पडल्यासारखी वाटते आणि त्वचेवर अकाली सुरकुत्या येऊ लागतात (correct method of applying sunscreen). हे सगळं टाळायचं असेल आणि चाळिशीनंतरही त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवायचं असेल तर मॉईश्चरायझर किंवा सनस्क्रिन लावण्याची योग्य पद्धत एकदा पाहून घ्या. (how to apply moisturiser properly)
मॉईश्चरायझर, सनस्क्रिन लावण्याची योग्य पद्धत
मॉईश्चरायझर किंवा सनस्क्रिन लावण्याची एक सर्वसामान्य पद्धत म्हणजे अनेक जण ते हातावर घेतात. त्याचे चेहऱ्यावर अगदी मोजके दोन- तीन ठिपके देतात. त्यानंतर ते क्रिम दोन्ही हातावर चोळतात आणि मग तेच हात चेहऱ्यावर रगडून रगडून लावतात. ही पद्धत अतिशय चुकीची आहे.
पाळीमध्ये पेनकिलर घ्यावीच लागते? डॉक्टर सांगतात खास उपाय, पाळीचा त्रास जाणवणारच नाही...
त्वचेवर मॉईश्चरायझर किंवा सनस्क्रिन योग्य पद्धतीने कसं लावावं, याविषयीचा व्हिडिओ beyogafit_withsankshita या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही मॉईश्चरायझर किंवा सनस्क्रिन हातावर घेता तेव्हा त्याचे त्वचेवर अनेक छोटे छोटे ठिपके द्या.
यानंतर गालावर ते पसरवून लावण्यासाठी नाकाच्या बाजुने दोन्ही हातांची बोटे खालच्या दिशेने ओढा आणि अशाप्रकारे गालावर मॉईश्चरायझर लावा. डोळ्यांच्या खालच्या भागावरून बोट फिरवून अलगद मॉईश्चरायझर लावा. यानंतर डोळ्यांच्या भोवती गोलाकार पद्धतीने बोट फिरवून मॉईश्चराईज करा.
ओठांच्या आजुबाजुच्या त्वचेवर गोलाकार बोटं फिरवून मॉईश्चरायझर लावा. तसेच कपाळावर दोन्ही हातांची बोटे आडवी फिरवत बाहेरच्या बाजुने ओढत माॅईश्चरायझर लावा.
गळ्याला मॉईश्चरायझर लावताना खालून वर अशा पद्धतीने बोटे फिरवत मॉईश्चरायझर लावा. यामुळे माॅईश्चरायझर किंवा सनस्क्रिनचा पुरेपूर फायदा तुमच्या त्वचेला होईल आणि त्वचेचं सौंदर्य दिवसेंदिवस वाढत जाईल.