Join us  

ऐन थंडीतही त्वचा ग्लोईंग दिसण्यासाठी करा ३ सोपे उपाय; दिसाल कायम सुंदर-देखण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2023 4:53 PM

Skin care Tips for flawless skin : काही सोपे घरगुती उपाय केल्यास त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास आणि तो ग्लोईंग दिसण्यास मदत होते.

आपली त्वचा कायम ग्लोईंग आणि चमकदार दिसावी यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. पण थंडीच्या दिवसांत हवेतील कोरडेपणाचा त्वचेवर परीणाम होतो आणि त्वचा निस्तेज-कोरडी दिसायला लागते. मग आपण चेहऱ्याला मॉईश्चरायजर विविध प्रकारची क्रिम लावून चेहऱ्याचा कोरडेपणा कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा म्हणााव तसा उपयोग होतोच असे नाही. काही तास याचा इफेक्ट राहतो आणि नंतर त्वचा पुन्हा कोरडी दिसायला लागते. पण काही सोपे घरगुती उपाय केल्यास त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास आणि तो ग्लोईंग दिसण्यास मदत होते. विशेष म्हणजे यासाठी विशेष खर्चही येत नसल्याने हे उपाय करणेही सोपे असते. हे उपाय करायला सोपे असल्याने तुम्हाला स्कीन केअर करण्याबाबतचा कंटाळा असेल तरी तुम्ही हे उपाय नक्कीच करु शकता. आता त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया (Skin care Tips for flawless skin)...

१. कोरफडीचा गर

कोरफडीचा गर त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अतिशय फायदेशीर असतो, त्यामुळे त्वचा स्मूथ होण्यास मदत होते आणि ग्लो करते. यासाठी हा गर थेट त्वचेवर लावला तरी चालतो. नाहीतर पपई किंवा मुलतानी माती यामध्ये हा गर एकत्र करुन हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचा टॅन तर होणार नाहीच पण त्वचेवर कोणत्याही प्रकारचे डाग दिसणार नाहीत. 

(Image : Google)

२. लवेंडर इसेन्शिअल ऑईल

आंघोळ करताना तुम्ही हे तेल नक्की वापरु शकता. यामुळे त्वचा स्मूद राहण्यास मदत तर होईलच. पण त्वचेशी निगडीत काही समस्या असतील तर त्या दूर होण्यासही याचा चांगला उपयोग होईल. आंघोळीच्या आधी हे तेल चेहऱ्याला लावायचे. काही वेळ तेल चेहऱ्यावर तसेच ठेवायचे आणि मग आंघोळ करायची. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास आणि त्वचा एकसारखी दिसण्यास मदत होईल. 

(Image : Google)

३. एच ए लोशन  या लोशनमध्ये एक्सफॉलिएटर असतो, ज्यामुळे मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. बाजारात याच्या बऱ्याच क्रिम उपलब्ध असतात, त्या घेऊन आपण त्वचा एक्सफॉलिएट करु शकतो. शक्यतो या प्रकारच्या गोष्टी या डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेल्या केव्हाही जास्त चांगल्या. म्हणजे याचा कोणताही साईड इफेक्ट आपल्यावर होत नाही. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजी