आपल्या चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी महिला वेगवेगळ्या उपाय करतात तर काहीजणी पार्लरमध्ये पैसे खर्च करतात. स्किन केअर रूटीन फॉलो करतात तरीही चेहऱ्यावर चमक येत नाही. ( How to glow your face in ganpati festival) तुम्हालाही चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल आणि तुम्ही स्किन केअर रूटीनच्या शोधात असाल तर फक्त स्किन केअर रूटीन फॉलो करून चालणार नाही तुम्हाला काही घरगुती उपाय देखील करावे लागतील. ज्यामुळे तुम्ही बिना मेकअपचेही सुंदर दिसाल. (Skin Care Tips for Glowing Skin)
हायड्रेट राहा
चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर सगळ्यात आधी आपल्या लिक्विड इन्टेकवर लक्ष द्या. शरीर आतून स्वच्छ असले तर बाहेरील त्वचा चांगली दिसेल. स्वत:ला हायड्रेट ठेवा आणि पुरेश्या प्रमाणात पाणी प्या. फळांचा रस किंवा नारळ पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे त्वचा रेडिएंट, ग्लोईंग आणि सॉफ्ट दिसेल.
संतुलित आहार
संतुलित आहार घेणं फार महत्वाचं असतं. ग्लोईंग स्किनसाठी संतुलित आहार घ्या. जंक फूडपासून दूर राहा आणि तुमच्या आहारात ताज्या फळांचा समावेश करा. व्हिटॅमिन सी समृद्ध फळे खा. व्हिटॅमिन सी एक अँटिऑक्सिडेंट आहे जे हानिकारक फ्री रॅडिकल्सशी लढते. जे तुमच्या त्वचेचा पोत देखील सुधारते. कोलेजन उत्पादन वाढवून सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.
दिवसरात्र गळून केस विरळ झाले? किचनमधले ३ पदार्थ 'या' पद्धतीनं लावा, दाट होतील केस
व्यायाम करा
ग्लोईंग त्वचा मिळवण्यासाठी रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. यामुळे त्वचा हेल्दी राहते. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. त्वचेत ऑक्सिजनचा संचार व्यवस्थित होतो आणि त्वचा हेल्दी दिसते. याव्यतिरिक्त घामावाटे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात.
नियमित झोप घ्या
रोज ७ ते ८ तासांची झोप घेणं गरजेचं आहे. रात्री झोपल्यानंतर त्वचेच्या पेशी रिपेअर होतात. तुम्ही चांगली झोप घेता तेव्हा डोळ्यांखालचे डार्क सर्कल्स आणि सूज कमी होते. एक्सपर्ट्स सांगतात की तुम्ही कमी झोपता तेव्हा ताण-तणाव जाणवतो. पचनक्रिया बिघडते. एक्ने, पिंपल्स, काळे डाग येतात.
ओठ काळपट दिसतात? मऊ-गुलाबी ओठांसाठी ३ उपाय, लिपबाम-लिपस्टीक लावणंच विसराल
मुलताना मातीचा फेस पॅक
मुलतानी माती हा चेहरा उजळवण्याचा नैसर्गिक उपाय आहे. मुलतानी मातीत गुलाबपाणी, चंदन पावडर मिसळून चेहऱ्याला लावा आणि हा पॅक सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यांचा ग्लो वाढेल आणि तुम्ही अधिकच सुंदर दिसाल.