Join us  

फेशियल न करता चेहऱ्यावर येईल तेज; १० रूपयांत करा 'हा' उपाय, दिवाळीत चेहरा दिसेल ग्लोईंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 3:21 PM

Skin Care Tips for Glowing Skin on Diwali : नियमित सिरम, फेस वॉश आणि नाईट क्रिमचा वापर करून अनेकजण चेहऱ्याची काळजी घेतात.

ऑक्टोबर हिटमुळे अनकांच्या चेहऱ्यावर टॅनिंग झालं तर उष्णतेमुळे काहींच्या चेहऱ्यावर डाग, पुळ्या आल्या. (Skin Care Tips) ऐन दिवाळीच्या तोंडावर चेहऱ्यावर टॅनिंग नको असेल तर घरात उपलब्ध असलेले काही पदार्थ वापरून तुम्ही चेहरा उजळवू शकता. (Diwali Skin Care Tips) नियमित सिरम, फेस वॉश आणि नाईट क्रिमचा वापर करून अनेकजण चेहऱ्याची काळजी घेतात. यातील केमिकल्समुळे त्वचेवर डाग, पिंपल्स असे साईड इफेक्ट उद्भवू शकतात. (Skincare Tips for that Perfect Diwali Glow) घरगुती उपायांमुळे तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट्स उद्भवत नाहीत.

१) कच्च दूध आणि मध

सगळ्यात आधी एका वाटीत फेअरनेस क्रिम घाला आणि २ ते ३ चमचे दूध घाला. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कच्च दूध वापरावे लागेल. त्याच चमचाभर मध घालून मिसळा, हे मिश्रण चेहऱ्याला लावून १० मिनिटांसाठी तसेच ठेवा. सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. या उपायाने टॅनिंग निघून जाण्यास मदत होईल. 

२) लिंबाचा रस

लिंबाचा रस चेहऱ्यावर लावल्याने डाग सहज दूर होण्यास मदत होते.  लिंबाचा रस स्किनवर थेट अप्लाय न करता त्यात गुलाबपाणी मिसळून मग स्किनवर लावा. लिंबाचा रस थेट लावल्यामुळे त्वचा काळी पडू  शकते. कारण यात एसिडचे प्रमाण जास्त असते. नियमित लिंबाचा रस चेहऱ्याला लावल्याने ग्लो वाढतो. लिंबाच रस चेहऱ्यावरील पिंपल्सनासुद्धा दूर ठेवतो. ऑयली स्किनसाठी लिंबाचा रस गुणकारी आहे.

३) एलोवेरा जेल

एलोवेरा जेल स्किनसाठी बरेच फायदेशीर ठरते. चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावल्याने स्किनच्या समस्या दूर होण्यास मदत होते. एलोवेरा जेलमुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यास मदत होते. या जेलमुळे त्वचेला पोषण मिळते. एलोवेरा जेल नियमित लावल्याने वयवाढीच्या खूणा कमी होण्यास मदत होते. 

केस गळणं ताबडतोब थांबवायचंय? 8 कारणं समजून घ्या- खर्च न करता लांब, सुंदर केस मिळतील

४) बेसन आणि हळद

बेसन, हळद प्रत्येकाच्याच घरी असते. हे दोन्ही पदार्थ दुधात मिसळून चेहऱ्यावर लावल्यानं डाग दूर होऊन चेहरा ग्लोईंग दिसतो. हळदीत एंटी बॅक्टेरियल, एंटीऑक्सिडेंटस असतात, हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो. त्वचेतील मृतपेशी निघण्यास मदत होते.  हळदीने चेहऱ्याचा काळेपणा दूर होऊन त्वचेवर ग्लो येतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी