Join us

चेहऱ्याला मध लावण्याच्या ३ पद्धती! ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स, पिगमेंटेशन घालविण्याचा सगळ्यात सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2024 13:34 IST

Skin Care Tips For Winter: मधाचा उपयोग करून त्वचेचं सौंदर्य खुलवता येतं. पण त्यासाठी तो नेमक्या कशा पद्धतीने वापरायचा हेच अनेकांना ठाऊक नसतं.(3 amazing ways of using honey for skin brightning)

ठळक मुद्देवेगवेगळ्या पद्धतीने मधाचा उपयोग करून त्वचेचं सौंदर्य कसं वाढविता येईल, याविषयी....

असं म्हणतात की खूप पुरातन काळापासून त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी मधाचा वापर करण्यात येतो. सौंदर्यशास्त्रात मधाला अतिशय महत्त्व आहे. कारण मधामध्ये असणाऱ्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी मदत करतात (Skin care tips for winter). डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन कमी करून त्वचा स्वच्छ नितळ करण्यासाठी मध खूप उपयुक्त ठरतो (how to use honey for removing black heads and white heads?). त्यासाठी मधाचा वापर नेमका कशा पद्धतीने करायला पाहिजे ते आता पाहुया...(3 amazing ways of using honey for skin brightening) 

 

त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी मध कशाप्रकारे वापरावा?

वेगवेगळ्या पद्धतीने मधाचा उपयोग करून त्वचेचं सौंदर्य कसं वाढविता येईल, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ rohitsachdeva1 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

सुपरस्टायलिश लूक देणारे कॉलर ब्लाऊजचे १० सुंदर पॅटर्न- लग्नसराईमध्ये दिसाल एकदम आकर्षक 

१. चमकदार त्वचेसाठी.... 

त्वचा अधिक चमकदार करण्यासाठी, त्वचेवरचं टॅनिंग कमी करून ती उजळ करण्यासाठी मधाचा खूप चांगला उपयोग करता येतो. यासाठी १ चमचा मध आणि १ चमचा बटाट्याचा रस किंवा लिंबाचा रस एका वाटीमध्ये एकत्र करा. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्याला लावून ७ ते ८ मिनिटे गोलाकार मसाज करा. यानंतर चेहरा धुऊन टाका. त्वचेवर ब्लीच केल्याप्रमाणे छान चमक येईल. 

 

२. गुलाबी ओठांसाठी मधाचा वापर 

थंडीमध्ये ओठ खूप कोरडे पडतात. काही जणींचे ओठ काळे, चॉकलेटी अशा गडद रंगाचे झालेले असतात. अशा काळपट पडलेल्या ओठांना पुन्हा नैसर्गिकपणे गुलाबी रंग देण्यासाठी मधाचा खूप चांगला उपयोग करता येतो.

तुम्हाला माहिती आहे फिटनेससाठी महत्त्वाचा '9-1 Rule'? वजन तर उतरेलच पण आजारही दूर पळतील

यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा मध आणि १ चमचा पिठीसाखर घ्या. या मिश्रणाने तुमच्या ओठांवर हलक्या हाताने २ ते ३ मिनिटांसाठी गोलाकार मसाज करा. त्यानंतर पाण्याने धुवून टाका. ओठ मऊ, मुलायम आणि गुलाबी होतील.

 

३. व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स कमी करण्यासाठी 

यासाठी एक टोमॅटो घ्या आणि तो मधोमध कापून त्याचे दोन तुकडे करा. यानंतर टोमॅटोच्या चिरलेल्या भागावर मध आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित पसरवून टाका.

Winter Superfood: सर्दी- खोकला होऊन मुलं सारखी आजारी पडतात? ५ पदार्थ खाऊ घाला- इम्युनिटी वाढेल

आता तोच टोमॅटो त्वचेवर लावून ५ ते ७ मिनिटे हळूवार मसाज करा. यानंतर त्वचा धुवून टाका आणि मॉईश्चराईज करा. हा उपाय केल्याने पिगमेंटेशन, डेड स्किनही निघून जाते.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीथंडीत त्वचेची काळजी