त्वचा सुंदर दिसावी यासाठी आपण सगळेच जण त्यांची व्यवस्थित काळजी घेतो. फेशियल, क्लिनपसारख्या अनेक गोष्टांचा वापर आपण चेहऱ्यावर करत असतो. (Skin care tips for women over 40) ज्यामुळे काही प्रमाणात त्वचा उजळू लागते. परंतु, जसं जसं वय वाढते तसं तसेच वयानुसार त्वचेचे सौंदर्य हरवू लागते. कितीही घरगुती उपाय किंवा महागड्या पार्लरमध्ये गेलो तरी चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या, पिंपल्स, मुरुमे आणि डागांपासून आपली काही सुटका होत नाही. (Anti-aging skincare after 40)
वयाची ४० शी ओलांडल्यानंतर आपल्याला त्वचेची विशेष काळजी घ्यायला हवी. या काळात वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होतात. (Best anti-aging creams for women over 40) वातावरणातील बदल, शरीरातील हार्मोन्समधील बदल यांचा आपल्या त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो. (Skin care ingredients for women over 40) वयाच्या ४० व्या वर्षी त्वचेवर काही लक्षण दिसू लागतात. यामध्ये चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा, डोळ्याखाली काळे वर्तुळ येणं, त्वचा कोरडी पडणं, त्वचेचा रंग बदलणं, त्वचा अतिसंवेदनशील होणं आणि त्वचा सैल होणं यांसारख्या समस्या उद्भवतात. जर आपलं वय ही ४० गाठणार असेल तर त्वचेची काळजी घेण्यासाठी या गोष्टी कायम ध्यानात ठेवा.
तुरटी म्हणजे चेहऱ्यासाठी जादूई परीच! पिंपल्स-ॲक्ने-डाग-त्रास काहीही असो, ‘अशी’ लावा
1. हायड्रेशन
वयाची ४० शी गाठली की, त्वचेमध्ये हायड्रेशनची कमतरता ही सर्वात मोठी समस्या बनते. त्यासाठी आपल्याला हायड्रेशनने समृद्ध असलेल्या उत्पादनाचा वापर करायला हवा. यामध्ये हायलुरोनिक ॲसिड असलेली उत्पादने चेहऱ्यावर लावा. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होईल. त्वचेला मॉइश्चरायझ ठेवण्यासाठी सिरॅमाइड्स असलेली उत्पादने वापरा.
2. सनस्क्रीन
वयाच्या ४० शी नंतर चेहऱ्याचा रंग बदलतो. सुरकुत्या आणि सूर्याच्या प्रकाशामुळे त्वचेवरील घट्टपणा कमी होऊ लागतो. जर आपण नियमितपणे चेहऱ्यावर सनस्क्रीन लावल्यास चेहऱ्याचा पोत सुधारण्यास मदत होईल. तसेच सूर्यापासून त्वचेचे रक्षण होते.
3. त्वचेसाठी सीरम
सीरम हे त्वचेसाठी अँटिऑक्सिडंटचे काम करते. यामध्ये हायलुरोनिक ॲसिड किंवा व्हिटॅमिन सी सीरम, कोलेजन उत्पादन वाढविण्यासाठी पेप्टाइड आधारित क्रीमचा वापर करु शकतो. या सिरममुळे चेहऱ्यावर असणारे डाग हलके होण्यास मदत होते.
4. डोळ्यांसाठी क्रीम
डोळ्यांभोवतीची त्वचा सर्वात नाजूक आणि पातळ असते. डोळ्यांखाली बारीक रेषा, सूज, काळी वर्तुळे आणि सुरकुत्या येतात. बारीक रेषा कमी करण्यासाठी आणि कोलेजन वाढवण्यासाठी पेप्टाइड्स आणि व्हिटॅमिन सी असलेल्या क्रीमचा वापर करा.
5. निरोगी आहार
आपल्या त्वचा तजेलदार आणि चमकदार ठेवायची असेल तर जीवनशैलीमध्ये बदल करायला हवा. त्यासाठी ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या. ओमेगा-३, जीवनसत्त्व आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेला संतुलित आहार घ्या. ताण कमी करण्यासाठी ध्यान, योगासने आणि व्यायाम करा.