Lokmat Sakhi >Beauty > कमी वयातच त्वचा लूज पडली?; त्वचा घट्ट करण्यासाठी ५ प्रभावी उपाय, दिसाल अधिक तरुण

कमी वयातच त्वचा लूज पडली?; त्वचा घट्ट करण्यासाठी ५ प्रभावी उपाय, दिसाल अधिक तरुण

Home remedies for saggy skin: Natural treatments for loose skin: Firming skin with DIY remedies: How to tighten sagging skin naturally: Anti-aging remedies for saggy skin: Natural oils for skin firming: Exercises for tightening loose skin: Herbal remedies for sagging skin: Best homemade masks for saggy skin: Skin tightening with aloe vera: कमी वयात आपली त्वचा लूज पडत असेल तर हे ५ प्रभावी उपाय करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 12:21 IST2025-03-02T12:20:29+5:302025-03-02T12:21:29+5:30

Home remedies for saggy skin: Natural treatments for loose skin: Firming skin with DIY remedies: How to tighten sagging skin naturally: Anti-aging remedies for saggy skin: Natural oils for skin firming: Exercises for tightening loose skin: Herbal remedies for sagging skin: Best homemade masks for saggy skin: Skin tightening with aloe vera: कमी वयात आपली त्वचा लूज पडत असेल तर हे ५ प्रभावी उपाय करुन पाहा.

skin care tips Home remedies for saggy skin Natural treatments for loose skin | कमी वयातच त्वचा लूज पडली?; त्वचा घट्ट करण्यासाठी ५ प्रभावी उपाय, दिसाल अधिक तरुण

कमी वयातच त्वचा लूज पडली?; त्वचा घट्ट करण्यासाठी ५ प्रभावी उपाय, दिसाल अधिक तरुण

आरोग्याची काळजी घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकेच महत्त्वाची आहे आपली त्वचा. आपल्यापैकी कुणाला सुंदर दिसावे असे वाटत नाही. (Home remedies for saggy skin) आरशात स्वत:ला पाहिले की, आपल्या एक नवा आत्मविश्वास निर्माण होतो. परंतु, त्वचेवरील पिंपल्स, मुरुमे, डोळ्यांखाली असणारी काळी वर्तुळे आणि कमी वयात त्वचा लूज पडणं या समस्यांना प्रत्येकाला सामोरे जावं लागतं आहे. वय वाढल्यानंतर त्याचा परिणाम सर्वात आधी आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. (Natural treatments for loose skin)

धावपळीच्या जीवनात आपण सगळ्यात जास्त त्रस्त असतो ते त्वचेमुळे. अनेकदा त्वचेवर डाग आणि सुरकुत्या दिसू लागतात. त्यामुळे अनेकांना त्वचा लूज पडल्यासाखी वाटते. (How to tighten sagging skin naturally) यासाठी आपण स्किन टाईटनिंगसाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करतो परंतु, परिणाम हवा तसा मिळत नाही. अनेक वजन कमी करण्यासाठी आपण व्यायाम किंवा जीममध्ये जातो. यामुळे शरीराच्या काही भागांवर त्वचा निस्तेज होऊ लागते. तसेच वाढत्या वयामुळे त्वचेतील लवचिकता कमी होते. जर कमी वयात आपली त्वचा लूज पडत असेल तर हे ५ प्रभावी उपाय करुन पाहा. (Exercises for tightening loose skin)

चाळिशीतही त्वचा दिसेल नितळ-चमकदार जसे की वय असावे जेमतेम पंचवीस, पाहा ५ उपाय

1. व्यायाम 
व्यायामामुळे त्वचा घट्ट होण्यास मदत होते. आपल्या स्नायूच्या विकासामुळे त्वचा सैल होत असेल तर यासाठी योगा किंवा व्यायाम प्रशिक्षणांकडून योग्य तो सल्ला घ्यावा. योग्यप्रकारे व्यायाम केल्याने स्नायूंना बळकटी मिळेल. तसेच त्वचेचा ढीलापणा कमी होण्यास मदत होईल. 

2. क्रीम्स 
त्वचेचा लूजपणा कमी करण्यासाठी     क्रीम, लोशन आणि सीरमचा उपयोग होईल. यात आपण रेटिनॉल आणि हायलुरोनिक ऍसिड असणारी उत्पादने वापरु शकतो. ज्यामुळे त्वचेची लवचिकता सुधारण्यास मदत होईल. हे घटक कोलेजन उत्पादन वाढवण्यास मदत करतील, ज्यामुळे त्वचा घट्ट होईल. 

3. हायड्रेशन आणि सनस्क्रीन 
त्वचेला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यामुळे त्वचा मऊ आणि निरोगी राहिल. तसेच उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरणे फायदेशीर ठरते. जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचेचे नुकसान होते, ज्यामुळे डाग आणि सुरकुत्या पडण्याची शक्यता अधिक असते. 

4. कोलेजन 
कोलेजन आणि हायल्यूरॉनिक अॅसिडपासून बनवलेले सप्लिमेंट्स त्वचेची लवचिकता वाढते. त्वचेला सुटणारी खाज देखील थांबते. संशोधनातून असेही समजले आहे की, औषधांमुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते. तसेच त्वचा पुन्हा घट्ट करण्यास मदत होते. 

5. शस्त्रक्रिया 

जर काही घरगुती उपायांनी परिणाम मिळत नसतील तर शस्त्रक्रिया करणे हा देखील एक उपाय आहे. त्वचा घट्ट करण्यासाठी किंवा त्वचेचा आकार सुधारण्यासाठी शस्त्रक्रिया मदत करते. ज्या लोकांचे वजन अधिक असते त्यांच्यासाठी हा शेवटचा पर्याय मानला जातो. 

Web Title: skin care tips Home remedies for saggy skin Natural treatments for loose skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.