Join us  

उन्हाळ्यातही चेहरा तजेलदार राहण्यासाठी करा १ सोपा नैसर्गिक उपाय, टॅनिंग जाऊन त्वचा दिसेल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2024 11:57 AM

Skin Care tips home remedy for sun tan removal : ऐन उन्हाळ्यात चेहरा तजेलदार दिसण्यासाठी...

हिवाळा संपून उन्हाळा सुरू व्हायच्या दरम्यान त्वचा कोरडी, रुक्ष पडायला लागते. हिवाळ्यात कोरड्या झालेल्या त्वचेचा वरचा थर निघून जातो आणि उन्हाळ्यात त्वचा घामाने तेलकट व्हायला सुरुवात होते. पण ऋतूबदलाच्या या काळातही त्वचा छान तजेलदार राहावी यासाठी घरच्या घरी काही नैसर्गिक उपाय केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. बाजारात मिळणारी केमिकल्स असलेली उत्पादने चेहऱ्याला लावण्यापेक्षा नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास त्याचा चांगला फायदा होतो (Skin Care tips home remedy for sun tan removal).

पार्लरच्या ट्रिटमेंटसही खूप महाग असल्याने बरेच पैसे खर्च होतात. तसंच याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असं नाही. म्हणूनच आज आपण घरच्या घरी करता येईल असा एक सोपा उपाय पाहणार आहोत. यात नैसर्गिक घटक वापरल्याने चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होण्याची शक्यता नसते. तसेच या उपायाने भर उन्हाळ्यातही चेहरा तजेलदार दिसण्यास मदत होते. पाहूयात हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा...

(Image : Google)

१.   एका बाऊलमध्ये साधारण २ चमचे खोबरेल तेल घ्यायचे.

२. त्यामध्ये थोडी हळद, दही आणि डाळीचे पीठ घालायचे.

३. यामध्ये टोमॅटोचा रस पिळून घालायचा आणि लिंबाचा रसही घालायचा.

४. या सगळ्या गोष्टी चमच्याने व्यवस्थित एकजीव करुन घ्यायच्या. 

५. मग हे मिश्रण चेहरा, गळा, मान, हात अशा सगळ्या ठिकाणी एकसारखे लावायचे. 

६. साधारण ५ मिनीटे हा पॅक चेहऱ्यावर तसाच ठेवायचा आणि मग चेहरा चोळून पाण्याने धुवून टाकायचा. 

आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास उन्हाने चेहऱ्याला झालेले टॅनिंग निघण्यास मदत होते. तसेच त्वचा पॉलिशिंग करण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो. त्वचेला चमक येण्यासही हा उपाय फायदेशीर ठरतो. नैसर्गिक घटक असल्याने याचे कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत, त्यामुळे तुमच्या त्वचेचा पोत कोणताही असला तरी तुम्ही नक्कीच हा उपाय करु शकता. घरच्या घरी त्वचेची सोप्या पद्धतीने काळजी घ्यायची असल्यास हा उपाय नक्कीच फायदेशीर ठरतो.    

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी