Join us  

खोटे दागिने घातले की खाज येते- रॅश येते? २ सोप्या टिप्स, बिंधास्त घाला आवडती ज्वेलरी, त्रास होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2023 8:38 PM

Remedies For Skin Allergy Due To Artificial Jewellery: एरवी नाही, पण सणासुदीच्या दिवसांत हेवी ज्वेलरी घातली जातेच.. त्याचाच त्रास होत असेल तर हे काही उपाय करून बघा...

ठळक मुद्देएरवी काही जाणवत नाही. पण सणासुदीला, लग्न- समारंभात मात्र हमखास असे खोटे आकर्षक दागिने घालावे वाटतात.

काही जणींची त्वचा खूपच सेंसिटीव्ह असते. त्यामुळे त्यांना खोटे किंवा नकली दागिने घातले की खूप त्रास होतो. त्वचा लालसर होते, मग खाज यायला सुरुवात होते. काही जणींना तर त्या ठिकाणी लगेचच रॅश येते आणि ती २- ३ दिवस जात नाही. त्यामुळे मग त्यांना कितीही आवडत असले तरी खोटे किंवा नकली दागिने घालताच येत नाही. एरवी काही जाणवत नाही. पण सणासुदीला, लग्न- समारंभात मात्र हमखास असे खोटे आकर्षक दागिने घालावे वाटतात. अशावेळी या दागिन्यांचा त्रास होऊ नये, म्हणून काय करावं (home hacks), यासाठी या २ टिप्स बघा. खोट्या किंवा नकली दागिन्यांचा अजिबात त्रास होणार नाही. (How to get rid of skin allergy or skin rash due to artificial jewellery)

 

खोटे दागिने घातल्यावर त्रास होऊ नये म्हणून उपाय

१. व्हॅसलिन किंवा क्रिमहा यावरचा सगळ्यात सोपा उपाय आहे. नकली दागिन्यांमध्ये जो धातू वापरला जातो, तो त्वचेला सहन होत नाही. त्यामुळे आपल्याला या धातूचा आणि आपल्या त्वचेचा संपर्क रोखता आला पाहिजे.

फक्त १ मिनिटाचा १ उपाय नियमित करा; पाठदुखी थांबेल- पोटावरची चरबीही होईल कमी- जॉ लाईनही दिसेल परफेक्ट

म्हणून तुम्हाला जो कोणता दागिना घालायचा आहे, त्या दागिन्याच्या खाली व्हॅसलिन लावा आणि मग तो दागिना घाला. व्हॅसलिनच्या ऐवजी तुम्ही त्याला एखादं क्रिमही लावू शकता. फक्त त्या क्रिमचा डाग कपड्यांवर पडणार नाही, एवढी काळजी घ्यायला हवी.

 

२. नेलपेंटनकली दागिन्यांचा त्रास होऊ नये म्हणून नेलपेंटचा उपायही करता येईल. हा उपाय करण्यासाठी ट्रान्सफरंट नेलपेंटचा वापर करा. ट्रान्सफरंट नेलपेंट दागिन्यांच्या खालच्या बाजुने लावून घ्या.

डोक्यात सारखी खाज येते- केसांमधून दुर्गंधही येतो? २ सोपे उपाय, मात्र सतत खाज येण्याचं धोक्याचं..

लावल्यानंतर ती चांगली वाळू द्या. त्यानंतर ते दागिने घाला. नेलपेंटचा उपाय एकदाच केला की तो कायमचा होऊन जातो. व्हॅसलिनप्रमाणे दागिने घालताना प्रत्येकवेळी त्याला नेलपेंट लावण्याची गरज नाही. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीदागिने