कोरोना व्हायरसपासून बचावासाठी प्रत्येकजण मास्क वापरताना दिसून येत आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी जोपर्यंत ठोस उपाय सापडत नाही तोपर्यंत मास्क लावण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. तुम्ही जेव्हाही कुठे बाहेर जाता तेव्हा सुरक्षेसाठी फेसमास्क वापरणं गरजेचं आहे. बाहेर जाताना किंवा सार्वजनिक ठिकाणी कोरोनापासून बचावासाठी हा एकमेव मार्ग सध्या दिसून येतो. पण वापर वाढल्यानं मास्कचा वापर त्वचेविषयी आजारांचे कारण ठरत आहे. मास्क वापरत असताना तो आरामदायक असेल याची काळजी घ्या नाहीतर इरिटेशन होण्याची शक्यता असते.
मास्कच्या वापरानंतर त्वचेवर दिसणारी लक्षणं
रॅशेस
ड्रायनेस
अस्वस्थ वाटणं
खाज
पुळ्या, लाललसरपणा
पुरळ उठण्याचे एक कारण मास्कचा घट्टपणा असू शकतो किंवा आपण मास्क धुण्यासाठी वापरल्या गेलेल्या डिटर्जंटची एलर्जी असू शकते. पॉलिस्टर आणि नायलॉनपासून बनविलेले मास्क अधिक उष्णता देतात आणि घाम आल्यामुळे पुळ्या देखील तयार होतात.
मास्कमुळे उद्भवत असलेल्या स्किन इरिटेशन टाळण्यासाठी टिप्स
जर संवेदनशील त्वचा असेल तर आपण आपल्या त्वचारोग तज्ञाचा सल्ला घ्यावा. आपण जी खबरदारी घेत आहात त्याची अधिक काळजी घ्या. मऊ आणि लवचिक सामग्रीसह फेस मास्क निवडा. आपला मास्क असा निवडा जो योग्यरित्या लावला जाईल. आपण व्हायरसपासून बचावू करू शकाल याची खात्री करू घ्या. कॉटनचा मास्क वापरणं जास्त सोयीस्कर ठरेल.
पॉलिस्टर किंवा नायलॉन फॅब्रिकपासून बनविलेले फेस मास्क टाळा. ऑनलाइन साइटवर विविध प्रकारचे व्हायब्रंट प्रिंट केलेले मास्क उपलब्ध आहेत जिथे आपण खरेदी करण्यापूर्वी फॅब्रिकची रचना तपासू शकता. मास्क धुताना जास्त स्ट्राँग डिर्जेंटचा वापर करू नका. त्वचेवर नॉन-कॉमेडोजेनिक क्रीम आणि मॉईश्चराईजर वापरा. यामुळे त्वचा कोरडी होण्यापासून बचाव करता येऊ शकतो. त्वचा मऊ आणि हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा.
जर आपल्या चेहर्यावर पुरळ उठली असेल तर त्या ठिकाणी झिंक ऑक्साईड लावा. या भागात कानांच्या मागे, नाकाच्या वरच्या भागाचा आणि आपल्या हनुवटीचा समावेश असू शकतो, जिथे पुरळ दिसू शकते आणि मास्कच्या इलास्टीकमुळे, घट्ट मास्कमुळे किंवा मास्क धुण्यासाठी वापरात असलेल्या डिटर्जंटमुळे या समस्या उद्भवू शकतात.
हायपोअलर्जेनिक केमिकल त्वचेला सुधारण्यासाठी देखील मदत करते, म्हणून आपण हलके मॉइश्चरायझर लावू शकता. मास्क सतत लावून राहिल्यामुळे अनेकांना त्वचेवर खाज, पुरळ येणं, कान दुखणं अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासोबतच डोळे कोरडे (Dryness in Eyes) पडत असल्याचंही जाणवलं आहे. जर ही समस्या असेल तर गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
डोळ्यातल्या ओलावा कमी होत असल्यास काही गोष्टी त्यावर उपाय म्हणून करता येतील. आपण मास्क घालतो आणि नाकाने श्वास घेतो. तेव्हा मास्कखालची त्वचा गरम होते. मास्क घातलेल्या असल्याने हवा नीटपणे नाकाच्या आत जाऊ शकत नाही. आपण श्वास सोडतो तेव्हा ही हवा मास्कवर आदळून डोळ्यांना लागते. हे सतत होत राहतं तेव्हा मग डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढतो. आर्द्रता कमी होते. याकारणाने डोळ्यांच्या पृष्ठभागावर सूज येणे आणि जळजळ होणे अशा समस्या उद्भवतात.
तुम्हाला जर दीर्घकाळ मास्क घालून वावरावं लागत असेल तर अशा व्यक्तींनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. त्वचा आणि डोळे नीट व सुरक्षित राहतील याची काळजी घेतली पाहिजे. मास्क घालणं गरजेचंच आहे पण मास्कचा डोळ्यांवर पडणारा प्रभाव नियंत्रणात ठेवला पाहिजे.
तुम्ही तासनतास मास्क घालून राहत असाल तर चांगला फिट बसणारा मास्क घातला पाहिजे. असा मास्क घाला ज्यातून हवा वर डोळ्यांकडे जाणार नाही. मास्कमुळे डोळ्यांखालचा भाग ताणला तर जात नाही ना हे पाहा. शक्य असेल तर मोकळ्या हवेत जाऊन मास्क खाली काढून श्वास घ्या. डोळ्यात जळजळ, खाज अशी लक्षणं सतत जाणवत राहिल्यास डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.