आपला चेहरा मस्त ग्लोईंग असावा असं आपल्याला नेहमीच वाटतं (Skin care tips) . पण कधी चेहऱ्यावर खूप फोड येतात तर कधी चेहरा निस्तेज आणि कोरडा दिसतो. कधी चेहऱ्यावर डाग येतात तर कधी खड्डे पडल्यासारखे वाटतात (Skin problems) . मग बाहेर जायचे झाले की एकतर भारंभार मेकअप करावा लागतो किंवा सतत चेहऱ्यासाठी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करावे लागते. पण आपली जीवनशैली उत्तम असेल तर स्कीन चांगली राहण्यास मदत होते. त्यामुळे उत्तम आहार, पुरेशी झोप, व्यायाम यांसारख्या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. त्याबरोबरच काही सोप्या घरगुती उपायांनी चेहऱ्याची चमक वाढण्यास मदत होते. दूध आपल्या सगळ्यांच्याच घरात सहज उपलब्ध असणारी गोष्ट आहे. हे दूध आरोग्यासाठी जितके फायदेशीर असते तितकेच त्वचेची चमक वाढवण्यासाठीही दुधाचा अतिशय चांगला उपयोग होतो. पाहूयात दूधाने चेहऱ्याला फेशियल कसे करायचे आणि त्यामुळे कसा ग्लो येतो....
१. सुरुवातीला चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा आणि नॅपकीनने कोरडा करा. एका बाऊलमध्ये एक ते दिड चमचा कच्चे दूध, १ चिमूट मीठ आणि २ चिमूट हळद एकत्र करा. कॉटनच्या बोळ्याने हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. कापसाचा बोळा गोलाकार फिरवत ३ ते चार मिनीट हे मिश्रण चेहऱ्यावर एकसारखे लावा. त्यानंतर हे चेहऱ्यावर तसेच ठेवून १० मिनीटांनी चेहरा पाण्याने धुवा.
२. एका बाऊलमध्ये २ चमचे कच्चे दूध, अर्धा चमचा कॉर्न फ्लोअर आणि १ चमचा तांदळाचे पीठ एकत्र करा. दुसऱ्या टप्प्यामध्ये चेहरा स्क्रब करणे आवश्यक असल्याने हे मिश्रण करणे गरजेचे असते. हे मिश्रण जास्त घट्ट झाले तर ते थोडे पातळ करण्यासाठी त्यामध्ये गुलाब पाणी घाला. या मिश्रणाने चेहरा चांगला स्क्रब करा. चेहऱ्यावरचे ब्लॅकहेडस आणि जास्तीचे तेल कमी करण्यासाठी आ स्क्रबचा अतिशय चांगला उपयोग होईल.
३. आता तिसरा टप्पा म्हणजे चेहऱ्यासाठी दूधाचा वापर करुन क्रिम तयार करणे. १ चमचा कच्चे दूध घेऊन त्यामध्ये मध घाला. यात तुम्ही कोरफडीची जेलही घाली शकता. कॉटनच्या बोळ्याने हे मिश्रण चेहऱ्यावर गोलाकार एकसारखे लावा. संपूर्ण चेहऱ्याला लावून झाल्यावर चेहरा ५ ते ७ मिनीटांसाठी तसाच ठेवा. त्यानंतर ओल्या टॉवेलने चेहरा पुसून घ्या.
४. आता दूधाचा वापर करुन आपल्याला फेसपॅक तयार करायचा आहे. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचा पोत कसा आहे ते लक्षात घेऊन हा पॅक तयार करावा लागेल. तुमची त्वचा खूप ऑयली असेल तर तुम्ही कच्च्या दुधात मुलतानी माती घाला. पण त्वचा कोरडी असेल तर त्यात केळं स्मॅश करुन घाला. हा पॅक चेहऱ्याला एकसारखा लावून १० मिनीटांसाठी तसाच ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
शक्यतो कच्च्या दुधाचे फेशियल रात्रीच्या वेळी करा. त्यामुळे झोपेतून उठल्यावर त्याचा अतिशय चांगला इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. तसेच तुमची त्वचा जास्त कोरडी असेल तर फेशियल झाल्यावर चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावायला विसरु नका.