आपल्या प्रत्येकाच्या स्कीनचा पोत वेगवेगळा असतो. कोणाची खूप ऑइली (Skin Care Tips) असते तर कोणाची एकदम कोरडी. कोणाच्या चेहऱ्यावर खूप फोड येतात तर कोणाला खड्डे असतात. काहींची त्वचा कायम तजेलदार आणि ग्लोईंग असते. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, आहार-विहाराच्या पद्धतीनुसार आणि अनुवंशिकतेनुसार हा त्वचेचा पोत बदलतो. मात्र तुमची त्वचा खूप तेलकट असेल तर ठराविक वेळाने तुमच्या नाकावर, कपाळावर आणि हनुवटीच्या भागातील त्वचा अचानक तेलकट झाल्याचे दिसते. अशामुळे आपल्याला सतत पावडर लावावी लागते किंवा मेकअप करावा लागतो. इतकेच नाही तर ऑयलीपणामुळे त्वचेवर पिंपल्स येणे, डाग पडणे यांसारख्या समस्या उद्भवतात. थंडीत ज्याप्रमाणे आपल्याला कोरडेपणाचा त्रास उद्भवतो त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेच्या तेलकटपणाची समस्या वाढते. आता अशीच समस्या तुम्हालाही भेडसावत असेल तर खालील गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात जेणेकरुन तुम्हाला तेलकट त्वचेचा त्रास होणार नाही (How to take care of oily skin) .
१. बाहेरुन आल्यावर चेहरा धुणे
अनेकदा उन्हाळ्यात बाहेरुन आल्यावर आपल्याला घाम आलेला असतो त्यामुळे आपण घरात आल्या आल्या गार पाण्याने चेहरा धुतो. पण ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी असे न करता बाहेरुन आल्यावर आधी चेहरा टिशू पेपरने टिपावा. त्यानंतर चेहऱ्यावरली मेकअप काढण्यासाठी एखाद्या क्रिमचा किंवा टिश्यूचा वापर करावा आणि त्यानंतर १५ मिनीटांनी चेहरा पाण्याने धुवावा.
२. फेसवॉशचा वापर
आपला चेहरा खूप तेलकट होतो म्हणून त्याला धुण्यासाठी फेसवॉश वापरण्याचा पर्याय अनेक जण स्वीकारतात. दिवसातून ४ वेळा आपण चेहरा धुत असू तर चारही वेळेस फेसवॉश लावण्याची चूक अजिबात करु नका. यामुळे चेहरा आणखी खराब होऊ शकतो. शक्यतो चेहरा साध्या पाण्याने धुवा, त्यामुळे तुमची त्वचा तेलकट असेल तरीही ती आणखी खराब होणार नाही.
३. चेहऱ्याला खराब हात लावणे
आपण अनेकदा दिवसभर बाहेर असतो, अशावेळी आपले हात वेगवेगळ्या ठिकाणी लागतात. तेच हात काही ना काही कारणाने चेहऱ्याला लावले जातात. पण अशाप्रकारे खराब हात चेहऱ्याला लावल्यामुळे त्याची घाण चेहऱ्याला लागते. त्वचेचा पोत तेलकट असल्याने ही घाण आणि तेल यांचा संपर्क येऊन त्वचेवर फोड येण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचा खूप ऑइली असेल तर बाहेर पडताना चेहऱ्याला जेल बेस्ड सनस्क्रीन लावायला अजिबात विसरु नका.
४. सततचा मेकअप
ऑइली स्कीन असेल तर तिला कमीत कमी मेकअप करणे गरजेचे असते. नाहीतर तुमची त्वचा खराब होऊ शकते. ऑइली स्कीनवर सतत मेकअप केला आणि त्याला वेगवेगळ्या प्रॉड्क्टसचा वापर केला तर या स्कीनवर पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे आपल्या स्कीनचा टोन लक्षात घेऊन मगच ब्यूटी प्रॉडक्टस वापरावीत.