उन्हाळा सुरु झाला की, आपण सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे संरक्षण व्हावे यासाठी सनस्क्रीन, मॉइश्चरायझर सारख्या अनेक उत्पादनांचा वापर करतो.(Summer skincare tips) त्वचा ग्लोइंग आणि तजेलदार व्हावी यासाठी अनेक महागड्या उत्पादने लावतो.(Coconut oil for skin) परंतु अनेकदा केमिकल्स असणाऱ्या उत्पादनांचा चेहऱ्यावर दुष्परिणाम होतो.(Glowing skin in summer) ज्यामुळे त्वचेचे सौंदर्य बिघडते. त्वचेसाठी सगळ्यात चांगले अर्थात नारळाचे तेल. (Natural skincare remedies)नारळाचे तेल त्वचेसाठी चांगला नैसर्गिक पर्याय आहे.(Beauty tips for summer) हे आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यापासून मदत करते.(How to use coconut oil for glowing skin) यामध्ये असणारे घटक त्वचेला मॉइश्चरायझिंग करतात. तसेच उन्हामुळे त्वचा टॅन झाली असेल तर नारळाचे तेल उपयोगी ठरते. त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करते. नारळाचे तेल कसे लावायला हवे जाणून घ्या. (Best summer skincare routine with coconut oil)
गुलाबी लाली आणि ओठ लाललाल.. ‘अशी’ करा गुलाबाच्या पाकळ्यांची लिपस्टिक, रोज ‘रोझ’ डे!
1. कोरफड जेल
उन्हाळ्यात त्वचेला पोषण देण्यासाठी कोरफड जेलमध्ये नारळाचे तेल मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला पोषण मिळेल. त्वचेचा कोरडेपणाही कमी होईल.
2. नारळाच्या तेलात हळदी मिसळा
आपली त्वचा संसर्गमुक्त ठेवण्यासाठी उन्हाळ्यात हळदीमध्ये खोबऱ्याचे तेल मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे मुरुमे आणि संसर्गाचा धोका कमी होतो. २ चमचे नारळाच्या तेल १ चमचा हळद पावडर मिसळा. नंतर ते चेहऱ्यावर लावून ३० मिनिटे ठेवा. थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
आयब्रो- चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी रेझर वापरताय? ५ चुका - चेहऱ्याचं सौंदर्य होईल खराब..
3. कापूरही फायदेशीर
बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी नारळाच्या तेलात थोडा कापूर मिसळा. हे तेल त्वचेला लावल्यास बुरशी किंवा इतर संसर्ग टाळण्यास मदत होते. हे तेल बोटाच्या सहाय्याने आपण त्वचेवर लावू शकतो.
4. टी-ट्री ऑइल
घाममुळे चिकटपणामुळे उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या वाढू शकतात. यामुळे मुरुमे, त्वचेचे संक्रमण आणि पुरळ वाढू शकतात. या समस्या टाळण्यासाठी नारळाच्या तेलात थोडसे टी-ट्री ऑइल मिसळा आणि त्वचेवर लावा.
5. झोपण्यापूर्वी या पद्धतीने लावा नारळाचे तेल
उन्हाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी चेहरा सगळ्यात आधी पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर नारळाचे तेल चेहऱ्यावर मालिश करा. रात्रभर चेहऱ्यावर तसेच राहू द्या. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर तेलाने मालिश केल्याने सुरकुत्याची समस्या कमी होते.