Join us

Skin Care Tips: चेहऱ्याची त्वचा खडबडीत आहे? नितळ त्वचेसाठी करा 'हे' उपाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2025 15:32 IST

Skin care tips: ऍक्ने अर्थात चेहऱ्याची त्वचा खडबडीत होणे. हे कशामुळे होते आणि त्यावर उपाय काय ते जाणून घेऊ. 

आपला चेहरा आपली ओळख असतो. तो छान दिसावा यासाठी आपण त्याची विशेष काळजी घेतो. चेहऱ्यावर काही अनपेक्षित बदल दिसू लागले की अस्वस्थ होतो. असाच एक प्रकार म्हणजे ऍक्ने अर्थात चेहऱ्याची त्वचा खडबडीत होणे. हे कशामुळे होते आणि त्यावर उपाय काय ते जाणून घेऊ. 

चेहऱ्याची त्वचा सुकणे, काळवंडणे, खडबडीत होणे सौंदर्याला बाधक ठरते. त्यामागे अनेक कारणे असूशकतात. हार्मोनल असंतुलन, चुकीच्या खाण्याच्या सवयी, अयोग्य जीवनशैली, प्रदूषण यापैकी काहीही! यावर मात करून त्वचा निरोगी आणि नितळ बनवायची (Soft and beautiful skin tips) असेल तर आहारात पुढे दिल्याप्रमाणे आवश्यक बदल करा. 

जर तुमच्या त्वचेची चमक कमी होत असेल, चेहऱ्यावर डाग दिसू लागले, पुरळ, मुरुम उठू लागले किंवा त्वचेशी संबंधित अन्य समस्या निर्माण झाल्या तर, शरीरातील हार्मोनल असंतुलन हे त्यामागील मुख्य कारण असू शकते. हार्मोनल चढउताराचा आपल्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. शरीरातील हार्मोनल असंतुलन पचन, त्वचा, लैंगिक आरोग्य, प्रजनन क्षमता आणि इतर अनेक गोष्टींवर परिणाम करते. जर तुमच्या चेहऱ्यावर पुरळ वारंवार उठत असेल, किंवा त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होत असतील, तर तुम्हाला तुमचा आहार बदलण्याची गरज आहे. 

हार्मोनल संतुलन आणि मुरुम कमी करण्यासाठी निरोगी आहार आवश्यक आहे. त्यासाठी पुढील गोष्टींचा आहारात समावेश करा. 

बदामाचे सेवन : 

निरोगी त्वचेसाठी ४-५ भिजवलेले बदाम आणि १-२ काजू अंशपोटी खा. काजू आणि बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि सेलेनियमसारखे अँटी-ऑक्सिडंट असतात. त्याच्या सेवनामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि मुरुमांपासून बचाव होतो.

पपई तसेच लिंबू सरबत :

निरोगी त्वचा आणि हार्मोनल संतुलनासाठी पपई खूप महत्त्वाची आहे. पपईचे गुणधर्म रक्तशुद्धीकरणाची भूमिका बजावतात. तसेच लिंबाचे सरबत त्वचा नितळ ठेवण्यासाठी गुणकारी ठरते. यामुळे त्वचेची जळजळ कमी होते, मृत पेशी दूर होते आणि त्यामध्ये असलेले बीटा कॅरोटीन त्वचा चमकदार बनवते. व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने त्वचेची निस्तेजता दूर होते.

हिरव्या भाज्या : 

दुपारच्या जेवणात गाजर आणि पालक यासारख्या रसरशीत भाज्या खा. या भाज्या अतिरिक्त इस्ट्रोजन कमी करतात. हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते. जे त्वचा कोरडेपणा आणि मुरुमांशी लढण्यास मदत करतात.

आंबट  फळं : 

संत्री आणि स्ट्रॉबेरीसारखी हंगामी फळे खा. स्ट्रॉबेरीमध्ये सॅलिसिलिक ॲसिड भरपूर असते आणि त्वचा टवटवीत आणि स्वच्छ ठेवण्यास मदत होते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते आणि मुरुमांपासून बचाव करण्यासाठी त्यात आवश्यक जीवनसत्व असते. 

आवळ्याच्या पदार्थाचे सेवन : 

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे शरीरातील कोलेजनची पातळी वाढवते आणि रक्त शुद्ध करण्यास मदत करते. आवळा त्वचेच्या आरोग्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि चेहऱ्याची चमक नैसर्गिकरित्या मिळवून देण्यासाठी मदत करते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहेल्थ टिप्सआरोग्य