Join us  

पिंपल्स, सुरकुत्या घालवण्यासाठी मुलतानी मातीचा होममेड फेसपॅक; काही सेकंदात मिळेल ग्लोईंग त्वचा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 5:42 PM

Skin Care Tips : मुलतानी माती तुम्हाला सहज उपलब्ध होईल. पार्लरचा जास्तीचा खर्चही वाचेल. घरच्याघरी ग्लोईंग त्वचा या फेसपॅकनं तुम्ही मिळवू शकता.

ठळक मुद्देमुलतानी माती दूधासोबत एकत्र करुन लावल्यास काळे डाग दूर केले जाऊ शकतात. दूधातील काही गुणधर्मांमुळे डोळ्यांना आराम मिळेल.तुम्हाला तुमची त्वचा जर टाईट हवी असेल आणि तेलमुक्त राहायला हवी असेल तर दोन चमचे मुलतानी मातीबरोबर दूध आणि चंदन पावडर एका बाऊलमध्ये समान प्रमाणात घ्या आणि त्याची घट्ट पेस्ट बनवा.

पावसाळ्यात त्वचेची खास काळजी घेणं गरजेचं असतं कारण या कालावधीत त्वचेवर पिंपल्स, एक्ने येण्याची (Pimples and Acne Problem)  समस्या वाढते. पावसाळ्यात, वातावरणातील आर्द्रतेमुळे, त्वचेचा चिकटपणा वाढतो, ज्यामुळे आपली खूप चिडचिड होते. चिकट त्वचेमुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स जास्त  दिसून येतात. 

याशिवाय पावसाळ्यात त्वचेचा संसर्ग पसरण्याचा धोकाही खूप जास्त असतो. अशा स्थितीत मुलतानी मातीचा फेसपॅक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. मुलतानी माती तुम्हाला सहज उपलब्ध होईल. पार्लरचा जास्तीचा खर्चही वाचेल. घरच्याघरी ग्लोईंग त्वचा या फेसपॅकनं तुम्ही मिळवू शकता. मुलतानी मिट्टीपासून असे तीन फेसपॅक बनवण्याची पद्धत सांगणार आहोत, ज्याचा उपयोग त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो.

मुलतानी माती आणि बटाटा

पावसाळ्यात आपली त्वचा खूप चिकट होते. अशा स्थितीत बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. चेहऱ्यावर बटाट्याचा रस वापरल्याने तुमच्या त्वचेची चमक वाढते. तुम्ही मुलतानी मातीसह चेहऱ्यावर बटाट्याचा रस वापरू शकता.

सगळ्यात आधी एक बटाटा घेऊन चांगला किसून द्या. बटाट्याचा किस एक कापडात ठेवून पिळून पाणी संपूर्ण एका भांड्यात काढून घ्या. त्यानंतर बटाट्याच्या रसात १ चमचा मुलतानी माती घाला. दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर त्याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट आपला चेहरा आणि मानेला लावा. जवळपास १० ते १५ मिनिटांनंतर आपला चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या.  आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यानं सुरकुत्या आणि त्वचेच्या मृतपेशी निघून जाण्यास मदत होईल.

मुलतानी माती आणि दूध 

मुलतानी माती दूधासोबत एकत्र करुन लावल्यास काळे डाग दूर केले जाऊ शकतात. दूधातील काही गुणधर्मांमुळे डोळ्यांनाही आराम मिळेल.

मुलतानी माती आणि बदाम

मुलतानी माती आणि बदामाचा फेस पॅक त्वचा मऊ बनवते. दोन चमचे मुलतानी मातीमध्ये एक चमचा बदाम कापून घाला आणि मग दुधात मिसळून पेस्ट बनवा. आता हा पॅक चेहऱ्यावर लावा. २०  मिनिटांनंतर थंड पाण्याने तुमचा चेहरा धुवा. या उपायानं चेहरा मऊ तर होतोच शिवाय चमकदारदेखील होईल.

मुलतानी माती आणि चंदन पावडर

तुम्हाला तुमची त्वचा जर टाईट हवी असेल आणि तेलमुक्त राहायला हवी असेल तर दोन चमचे मुलतानी मातीबरोबर दूध आणि चंदन पावडर एका बाऊलमध्ये समान प्रमाणात घ्या आणि त्याची घट्ट पेस्ट बनवा. आता हा फेसपॅक चेहऱ्यावर लाऊन ३० मिनिटं असाच ठेवा आणि थंड पाण्याने धुवा.

मुलतानी मातीचा पॅक

मुलतानी मातीचे सौंदर्याच्या दृष्टीने फार महत्व आहे. तुमची त्वचा तेलकट असल्यास, तुम्ही दोन चमचे मुलतानी माती त्यात एक मोठा चमचा टॉमेटो रस, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक मोठा चमचा मध घाला. आता हा पॅक आपल्या चेहऱ्यासह मानेला, अंडरआर्म्ससाठी तुम्ही वापरू शकता. सुकल्यानंतर थंड पाण्याने धुऊन टाका. वरील कोणतंही साहित्य तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही त्यापासून घरच्याघरी हर्बल फेसपॅक तयार करू शकता.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स