Lokmat Sakhi >Beauty > Skin Care Tips : प्राजक्ता माळीचे स्किन केअर रुटीन, नितळ त्वचेसाठी प्राजक्ताच्या 5 सोप्या टिप्स

Skin Care Tips : प्राजक्ता माळीचे स्किन केअर रुटीन, नितळ त्वचेसाठी प्राजक्ताच्या 5 सोप्या टिप्स

Skin Care Tips : सध्या मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणाऱ्या प्राजक्ताची त्वचा अतिशय नितळ असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्वचेसाठी ती नेमके काय करते याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 12:16 PM2022-04-07T12:16:05+5:302022-04-07T12:18:18+5:30

Skin Care Tips : सध्या मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणाऱ्या प्राजक्ताची त्वचा अतिशय नितळ असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्वचेसाठी ती नेमके काय करते याविषयी...

Skin Care Tips: Prajakta Mali's Skin Care Routine, 5 Simple Prajakta Tips for Smooth Skin | Skin Care Tips : प्राजक्ता माळीचे स्किन केअर रुटीन, नितळ त्वचेसाठी प्राजक्ताच्या 5 सोप्या टिप्स

Skin Care Tips : प्राजक्ता माळीचे स्किन केअर रुटीन, नितळ त्वचेसाठी प्राजक्ताच्या 5 सोप्या टिप्स

Highlightsआपल्या त्वचेला काय सूट होईल याचा अभ्यास करा आणि त्यानुसार उत्पादने वापरलेली केव्हाही चांगली. रात्री झोपताना हलका आहार घ्या, त्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होईल. 

आपली त्वचा चित्रपट किंवा टिव्हीमधील अभिनेत्रींप्रमाणे नितळ आणि सुंदर असावी असं प्रत्येकीला वाटतं. त्यासाठी आपण सतत काही ना काही नवनवीन प्रयोग करत असतो. पण चेहऱ्याला महागडी उत्पादने लावण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने तो जितका छान राहील तितका चांगला (Skin Care Tips). आपल्याला सतत पिंपल्स येत असतील, चेहऱ्यावर डाग पडत असतील किंवा त्वचा खूप कोरडी होत असेल तर त्यामागची कारणे शोधून त्यानुसार उपचार करायला हवेत. उगाचच महागडी ब्रँडेड उत्पादने लावून काही उपयोग होत नाही. असे प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Actress Prajakta mali) सांगते. सध्या मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणाऱ्या प्राजक्ताची त्वचा अतिशय नितळ असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण या नितळ त्वचेसाठी ती काय स्कीन केअर रुटीन (Skin care routine) फॉलो करते, पाहूया....

(Image : Google)
(Image : Google)

१. तोंड धुताना

दिवसातून किमान पाच वेळा गार पाण्याने तोंड धुवा. हे करताना तोंडाचा फुगा करा. ज्यामुळे आपल्या त्वचेच्या थरात जी घाण बसलेली असते ती निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे चेहरा स्वच्छ साध्या पाण्याने धुणे ही अतिशय महत्त्वाची आणि बेसिक गोष्ट प्रत्येक महिलेने लक्षात ठेवायला हवी. 

२. झोपताना हे नक्की करा

आपण अनेकदा चेहऱ्याला खूप महागडे ब्यूटी प्रॉडक्टस लावायला जातो. पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. घरी असताना चेहऱ्याला सतत मॉइश्चरायजर लावण्याचा सल्लाही दिला जातो. मात्र तुमच्या चेहऱ्याची त्वचा जास्त कोरडी पडत असेल तर रात्री झोपताना न चुकता चेहऱ्याला खेबरेल तेल लावा. 

३. मेकअप करताना सगळ्यात महत्त्वाचे 

मेकअप करताना आपण सगळ्यात आधी बीबी क्रिम किंवा फाऊंडेशन लावतो. त्याआधी त्वचेला अगदी हलके कैलास जीवन लावा. त्यामुळे मेकअपची उत्पादने त्वचेच्या फार आत जात नाहीत. त्वचा नैसर्गिकरित्या चांगली राहण्यासाठी कैलास जीवन अतिशय चांगले असते. ते थोडे ऑयली असल्याने जास्त नाही पण अगदी थोडे कैलास जीवन मेकअपच्या आधी जरुर लावा. 

४. आहाराकडे लक्ष द्या

त्वचा तजेलदार राहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. फळांचा आहारातील समावेश वाढवा. शक्यतो शाकाहारी पदार्थांवर भर ठेवा. इतकंच नाही तर तेलकट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने चेहऱ्यावर मुरुम येण्याची किंवा इतर त्रास होण्याची शक्यता असते. तेव्हा अशाप्रकारचा आहार टाळा. रात्री झोपताना हलका आहार घ्या, त्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होईल. 

५. आपल्याला काय सूट होते ते महत्त्वाचे 

स्कीन केअर प्रॉडक्ट वापरताना आपण अनेकदा आपल्या मैत्रिणी काय वापरतात. आपल्या बहिणी काय वापरतात किंवा अगदी एखादी हिरोईन काय वापरते याकडे जास्त लक्ष देतो. इतकेच नाही तर अमुक एक कंपनी खूप मोठी आहे आणि त्या कंपनीची प्रॉडक्ट महागडी असल्याने ती चांगली असतील असे आपल्याला वाटते. पण असे नसते. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे आपल्या त्वचेला काय सूट होईल याचा अभ्यास करा आणि त्यानुसार उत्पादने वापरलेली केव्हाही चांगली. 

Web Title: Skin Care Tips: Prajakta Mali's Skin Care Routine, 5 Simple Prajakta Tips for Smooth Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.