चेहरा सुंदर, डागविरहीत दिसण्यासाठी अनेक स्त्रिया पार्लरमध्ये खर्च करतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का? कच्चं दूधही त्वचा स्वच्छ करते, त्वचेचा पोत सुधारते, त्वचेला मॉइश्चराईज करण्यासाठी फायदेशीर ठरते. जर तुमच्या त्वचेवर पुरळ असेल तर तुम्ही कच्च्या दुधाचा फेस पॅक लावू शकता. त्वचेवर डाग असले तरीही तुम्ही कच्चे दूध वापरू शकता. (How to remove black spots from face) जर तुम्ही कच्च्या दुधात बदाम घातले तर आणखी सुधारणा होईल किंवा दुसऱ्या पर्यायात तुम्ही कच्च्या दुधात व्हिटॅमिन ई तेल मिसळू शकता. (Skin careTips)
या दोन्ही प्रकारे तुम्ही फेस पॅक तयार करू शकता, ज्यामुळे त्वचेला खोलवर पोषण मिळेल आणि त्वचा स्वच्छ होईल. या लेखात आपण कच्च्या दुधापासून बनवलेल्या दोन फेस पॅकचे फायदे आणि ते कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत. या विषयावर त्वचारोग तज्ज्ञ , वरिष्ठ सल्लागार डॉ. देवेश मिश्रा यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना अधिक माहिती दिली आहे.
१) कच्च दूध आणि बदामाचा फेसपॅक (Milk and almond face pack)
सर्व प्रथम एका भांड्यात ताजे कच्चे दूध काढा. तुमच्या वापरानुसार दुधाचे प्रमाण घ्या. चेहरा आणि मानेसाठी ४ ते ५ चमचे दूध पुरेसे आहे. नंतर मिक्सरमध्ये ४ ते ५ बदाम टाकून पावडर बनवा. पावडर तयार झाल्यावर त्यात दूध घालून मिक्सर पुन्हा हलवा. मिश्रण चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.
फायदे
बदाम आणि कच्च्या दुधाने बनवलेला हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर करेल.ज्या लोकांना चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची समस्या आहे त्यांनी कच्चे दूध आणि बदामाचा फेस पॅक लावावा. तुमची त्वचा टॅन होत असेल तरीही तुम्हाला कच्चे दूध आणि बदामाच्या फेस पॅकचा फायदा होईल.
२) कच्चं दूध आणि व्हिटामीन ई (Milk and vitamin E Face pack)
हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला कच्चं दूध, व्हिटॅमिन ई टॅब्लेटची आवश्यकता असेल. व्हिटॅमीन ई च्या दोन कॅप्सूल कापून त्याचे तेल एका भांड्यात काढा. आता ताजे कच्चे दूध घ्या आणि ते व्हिटॅमिन ई तेलात मिसळा. मिश्रण चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. हा पॅक जास्त वेळ ठेवू नका, तर बनवल्यानंतर लगेच चेहऱ्यावर लावा.
फायदे
कच्चं दूध आणि व्हिटॅमिन ईने बनवलेला हा फेसपॅक लावल्याने त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळेल. व्हिटॅमिन ई एक उत्कृष्ट क्लींजर म्हणून वापरला जातो, ते त्वचेतील घाण साफ करते आणि त्वचा चमकदार बनवते. व्हिटॅमिन ई तेल आणि कच्च्या दुधाने बनवलेला फेसपॅक लावल्याने स्किन टाईटनिंग होण्यास मदत होते.
चेहरा तेलकट, मानेवर काळपटपणा आलाय? ग्लोईंग त्वचेसाठी घरीच फक्त १० मिनिटात असं करा फेशियल
३) कच्च्या दुधाचा फेसपॅक कसा लावावा (How to apply face pack)
वरील दोन्ही फेस पॅक लावण्याची पद्धत सारखीच आहे. सर्वप्रथम सौम्य फेसवॉशच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.चेहरा कोरडा झाल्यावर फेसपॅक लावा. फेसपॅक लावण्यासाठी तुम्ही कॉटन बॉलची मदत घेऊ शकता. आता फेस पॅक त्वचेवर 20 ते 30 मिनिटे राहू द्या. जेव्हा फेस पॅक सुकेल तेव्हा तुम्हाला त्वचेवर ताण जाणवेल. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरडे झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावा. जर तुम्हाला कच्च्या दुधाची ऍलर्जी असेल, तर हा फेस पॅक लावू नका आणि तुमच्या डॉक्टरांचा किंवा त्वचा विशेषज्ञांचा सल्ला घ्या.