आपली त्वचा चांगली दिसावी यासाठी आपण असंख्य स्कीन केअर प्रॉडक्टस वापरत असतो. यामध्ये फेसवॉशपासून मॉईश्चरायजर, वेगवेगळी ब्यूटी प्रॉडक्टस अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. मग या ब्रँडचं प्रॉडक्ट चांगलं की त्या ब्रँडच्या अमुक प्रॉडक्टमुळे त्वचा जास्त ग्लोईंग होईल असा प्रश्नही आपल्याला पडतो. कधी आपण एखादं प्रॉडक्ट ट्राय करुन पाहतो तर कधी एखादं प्रॉडक्ट जास्त महाग असेल तर त्याचे रिव्ह्यू पाहून मग ते घ्यायचं की नाही ते ठरवतो. पण काहीवेळा या प्रॉडक्टपेक्षाही आपल्या जीवनशैलीतील काही गोष्टी बदलल्यास त्याचा नक्कीच चांगला उपयोग होतो. प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर आपल्या चाहत्यांना याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स देतात. ऋजूता दिवेकर सोशल मीडियावर भरपूर अॅक्टीव्ह असून त्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कायम काही ना काही गोष्टी सांगत असतात (Skin Care Tips Rujuta Divekar).
त्याचप्रमाणे आताही त्यांनी आरोग्य आणि सौंदर्य यांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट चाहत्यांशी शेअर केली आहे. यामध्ये त्या सौंदर्याचा अतिशय सोपा फॉम्युला सांगतात. झोप, व्यायाम आणि घरातले अन्न ही तिन्ही अतिशय उत्तम अशी स्कीन केअर प्रॉडक्टस आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या गोष्टीवर टिपण्णी करताना त्या काहीशा खोचकपणेच ही उत्पादने ऑनलाइन मिळत नसून ती आपल्याला आपल्या घरातच मिळतात असा सल्लाही त्या देतात. त्यांच्या या पोस्टला ४ दिवसांत ६२ हजारांहून अधिक लाइक्स आले असून लाखो जणांनी आतापर्यंत ती पोस्ट पाहिली आहे. बऱ्याच जणांनी त्यावर हे उत्तम असते, मी ट्राय केले आणि त्याचा उपयोग होतो किंवा ह्यूमर चांगला आहे. तुम्ही अतिशय योग्य सांगत आहात अशाप्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
आपण हल्ली बरीचशी शॉपिंग ही ऑनलाइन करतो. मात्र आपल्या बेसिक गोष्टींकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. असे करणाऱ्या तरुण पिढीसाठी ऋजुता हा महत्त्वाचा सल्ला देतात. ही शॉपिंग करताना आपण त्यावर काही डिस्काऊंट मिळावे म्हणून एखादा कूपन कोडही वापरतो. मात्र आपल्या पोस्टमध्ये ऋजूता कूपन कोड असे लिहून त्यापुढे कॉमन सेन्स असे लिहीतात. त्यामुळे एकीकडे अतिशय महत्त्वाची माहिती देताना त्या ती सत्यस्थिती आणि प्रत्यक्ष उपाय यांचा यातील ह्यूमर कौतुकास्पद आहे. त्यामुळे आहाराबरोबरच ब्युटीसाठी ऋजूता देत असलेला सल्ला अतिशय उपयुक्त आहे हे लक्षात घ्यायला हवे. या पोस्टला त्यांनी ‘डोन्ट यू थिंक’? अशी कॅप्शनही दिली आहे.