Join us  

Skin care Tips : चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांना म्हणा बाय; 1 उपाय- सुरकुत्यांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2022 12:59 PM

Skin care Tips : त्वचा आतून आणि बाहेरुन चमकदार करण्यासाठी बदाम अतिशय फायदेशीर असतात. इतकेच नाही तर वय झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नयेत यासाठी बदाम अतिशय उपयुक्त ठरतात.

ठळक मुद्देत्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी बदाम हा उत्तम पर्याय आहे. वाळल्यानंतर चोळून हा पॅक काढून टाका. या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाण्यास मदत होईल

गोडधोड पदार्थांमध्ये घालण्यासाठी किंवा कधीतरी खाण्यासाठी आपल्या घरात सुकामेवा आवर्जून असतो. काजू, बदाम, पिस्ता, मनुके या त्यातील घरात साधारणपणे असणाऱ्या गोष्टी. यातही साधारणपणे बदाम ही जास्त प्रमाणात खाल्ली जाणारी गोष्ट. बदामात मॅग्नेशियम, फायबर, ओमेगा ३, ओमेगा ६ फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक असतात. त्यामुळे बदाम आरोग्यासाठी फायदेशीर असतात हे आपल्याला माहित आहे. पण आरोग्याबरोबरच सौंदर्यासाठीही (Skin care Tips) बदामाचा उपयोग होतो. केसांना लावायचे तेल, चेहऱ्याचे एखादे क्रिम किंवा फेसपॅक यामध्ये बदाम असल्याचे आपण पाहतो (Use of almond for beauty). पण त्वचा आतून आणि बाहेरुन चमकदार करण्यासाठी बदाम अतिशय फायदेशीर असतात. इतकेच नाही तर वय झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते पण या सुरकुत्या पडू नयेत यासाठी बदाम अतिशय उपयुक्त ठरतात. 

(Image : Google)

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्वचा एक्सफॉलिएट करण्यासाठी बदामाचा अतिशय चांगला उपयोग होतो. तर त्वचा मॉईश्चराइज राहण्यासाठीही बदाम उपयुक्त ठरतो. अनेक महिला कधी मेकअप काढण्यासाठी तर कधी मसाजसाठी बदामाचे तेल वापरतात. या तेलाऐवजी आपण बदामाची पेस्ट करुन तीही चेहऱ्याला लावू शकतो. आपल्या चेहऱ्याचे गेलेले सौंदर्य परत मिळवायचे असेल तर बदामाचा विविध प्रकारे वापर करता येतो. पाहूयात आपल्या रोजच्या स्कीन केअर रुटीनमध्ये बदामाचा कशाप्रकारे उपयोग करता येईल. 

१. असा तयार करा फेसपॅक 

सुरुवातीला ४ ते ५ बदाम मिक्सरमधून काढून त्याची पावडर करा. ही पावडर एका वाटीत घेऊन त्यामध्ये १ चमचा मध घाला. तुमची त्वचा ऑयली असेल तर या पॅकमध्ये १ चमचा गुलाब पाणी घालून ती थोडी एकसारखी करा. तर तुमची स्कीन खूप कोरडी असेल तर या मिश्रणात गुलाब पाण्याऐवजी कच्चं दूध मिक्स करा. हा पॅक तयार झाल्यानंतर तो चेहरा आणि गळ्याला लावा. २० मिनिटे हे असेच ठेवा, वाळल्यानंतर चोळून हा पॅक काढून टाका. या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाण्यास मदत होईल. 

२. टॅनिंग दूर होण्यासाठी मदत 

अनेकदा उन्हात फिरुन किंवा आणखी काही कारणाने आपल्या चेहऱ्याची त्वचा टॅन होते. त्वचेचा हा काळेपणा दूर करण्यासाठी बदाम हा उत्तम पर्याय आहे. बदामाची पावडर आणि बेसन पीठ एकत्र करा. यामध्ये थोडे दही घाला. हे मिश्रण एकत्र करुन त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा. २० मिनीटांनंतर चेहरा थोडा चोळा. यामुळे स्क्रबसारखा इफेक्ट मिळून चेहऱ्यावरचे टॅनिंग निघण्यास मदत होईल. थंड पाण्य़ाने चेहरा साफ करा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास त्याचा त्वचा उजळ होण्यास चांगलाच फायदा होतो. 

(Image : Google)

३. सुरकुत्या जाण्यास मदत 

बदामामध्ये ई व्हिटॅमिन असते, ज्यामुळे आपल्या आपले वाढलेले वय दिसू नये यासाठी त्याचा उपयोग होतो. बदामामध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस त्वचेतील पेशींचा बचाव कऱण्यास उपयुक्त ठरतात. आपले वाढते वय चेहऱ्यावर दिसू नये यासाठी बदामाचा फेसपॅक किंवा स्क्रब उपयुक्त ठरतो. याबरोबर डोळ्याखालील काळेपणा आण सुरकुत्या कमी करण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी