Join us  

Skin Care Tips : घाईघाईत अंघोळ करताना ब्रेस्ट, नाजूक भाग व्यवस्थित स्वच्छ होत नाही? मग अंघोळ करताना टाळा 'या' ६ चूका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 6:32 PM

Skin Care Tips : त्वचेवर घामामुळे आलेला मळ, डेड स्किन सेल्स निघून गेल्यातर आपली त्वचा स्वच्छ होते. तरीही रोज आपण अशा काही चूका करतो त्यामुळे त्वचेवर इंफेक्शन होतं.

ठळक मुद्देआंघोळ करताना बहुतेक स्त्रिया बाथरूममध्ये जास्त वेळ घालवतात. प्रत्येकजण आंघोळ करण्यासाठी वेळ घालवतो असं नाही.  आंघोळ करण्यापूर्वी, कधीकधी त्या बाथरूममध्ये ठेवलेल्या वस्तू स्वच्छ करण्यास सुरवात करतात तर कधीकधी ते बाथरूम धुवत बसतात. अंघोळीसाठी बाथरूमध्ये गेलआंघोळ केल्यानंतर साधारणपणे सर्व स्त्रिया पटकन कपडे घालायला लागतात आणि शरीर व्यवस्थित पुसण्याकडेही लक्ष देत नाहीत.  कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या संसर्गाच्या विकासाचे हे सर्वात मोठे कारण आहे. साबण निवडताना तुम्ही त्यात असलेल्या घटक आधी वाचायला हवेत. त्वचेच्या टाईपनुसार साबणाची निवड करावी. तुम्हाला कोणताच साबण सूट होत नसेल तर डॉक्टराच्या सल्ल्यानंतर एंटी बॅक्टेरिअल किंवा हर्बल साबण वापरा.  

आंघोळ  करताना आपल्या संपूर्ण शरीराची त्वचा स्वच्छ करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.  अनेक घरांमध्ये बायकांना आंघोळीसाठीही मनासारखा वेळ मिळत नाही. जेवण बनवणं, ऑफिसची तयारी करणं, घरातील माणसांना वेळेवर नाष्ता, चहा देणं याा कामांच्या नादात १० मिनिटात कशीबशी आंघोळ करून बाहेर यावं लागतं. अंघोळ करताना त्वचेवर घामामुळे आलेला मळ, डेड स्किन सेल्स निघून गेल्यातर आपली त्वचा स्वच्छ होते. तरीही रोज आपण अशा काही चूका करतो त्यामुळे त्वचेवर इंफेक्शन होतं.

पुरूषांच्या तुलनेत महिलांची  त्वचा जास्त संवेदनशील असते. याच कारणामुळे महिलांमध्ये स्किन इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, खाज, लालसरपणा असा त्रास दिसून येतो. काहीजणी अंग व्यवस्थित सुकू न देताच अंगावर कपडे चढवतात मग ओलसरपणामुळे इन्फेक्शन पसरतं. शक्यतो आंघोळीनंतर अंग व्यवस्थित कोरडं करूनच कपडे घालायला हवेत. 

१) साबण जास्त स्ट्राँग असू नये

१) साबणाच्या निवडीबाबत बहुतेक स्त्रिया इतरांचं ऐकून  स्वतःसाठी साबण निवडतात. काहीजणी जाहिराती पाहिल्यानंतर प्रत्येक साबण वापरून पाहतात. तर काहीजण घरात जो साबण आणला जातो त्यानंच अंघोळ करतात. तो आपल्या त्वचेला सुट होतोय की नाही याबाबत विचार केला जात नाही. 

२) साबण निवडताना तुम्ही त्यात असलेले  घटक आधी वाचायला हवेत. त्वचेच्या टाईपनुसार साबणाची निवड करावी. तुम्हाला कोणताच साबण सूट होत नसेल तर डॉक्टराच्या सल्ल्यानंतर एंटी बॅक्टेरिअल किंवा हर्बल साबण वापरा.  

२) ब्रेस्ट आणि प्रायव्हेट एरिया

१) महिलांनी त्यांच्या स्तनांच्या आणि नाजूक भागांच्या स्वच्छतेकडे बारीक लक्ष दिले पाहिजे. आंघोळ केल्यानंतर टॉवेलने शरीर स्वच्छ करताना, स्तनाचा खालचा भाग आणि स्तनाचा मधला भाग पूर्णपणे सुकवा.  या अशा जागा आहेत जिथे घाम आल्यामुळे बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. 

२) याशिवाय ब्रेस्ट आणि प्रायव्हेट पार्ट्स पुसण्यासाठी एक वेगळं सुती कापड ठेवा. त्यासह संपूर्ण भाग कोरडा करा. नंतर बाह्य त्वचेवर मॉइश्चरायझर लावा आणि या नंतरच आतले कपडे घाला.

३) आंघोळीनंतर या चुका करणं टाळा

१) आंघोळ केल्यानंतर साधारणपणे सर्व स्त्रिया पटकन कपडे घालायला लागतात आणि शरीर व्यवस्थित पुसण्याकडेही लक्ष देत नाहीत.  कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या संसर्गाच्या विकासाचे हे सर्वात मोठे कारण आहे. कारण असे केल्याने शरीरावर ओलावा बराच काळ टिकून राहतो आणि घाम आल्यावर जीवाणू आणि बुरशीच्या वाढीसाठी योग्य वातावरण तयार होते. म्हणून, आंघोळ केल्यानंतर, स्वच्छ टॉवेलने शरीर पूर्णपणे पुसून टाका. नंतर मॉइश्चरायझर लावा आणि त्यानंतर स्वच्छ कपडे घालून तयार व्हा.

४) शेविंग करताना 'अशी' घ्या काळजी

१) शेव्हिंग आणि डर्माप्लॅनिंग करताना काही विशेष खबरदारी घेणे महत्वाचे आहे. उदाहरणार्थ,  डर्माप्लॅनिंग करण्यापूर्वी आपली त्वचा चांगल्या प्रकारे हायड्रेट करा. त्वचेवर बदामाचे तेल, क्रीम मालिश किंवा लोशन मसाज करणे योग्य आहे.

२) नेहमी स्वच्छ रेझर वापरा. केस काढण्यापूर्वी गरम पाण्यात किंवा डेटॉलमध्ये रेझर धुणे चांगलं ठरेल. केसांच्या वाढीच्या दिशेने नेहमी शेव्हिंग किंवा डर्माप्लॅनिंग करा. रेजर गरम पाणी किंवा डेटॉलनं स्वच्छ धुवा. केसांच्या वाढीच्या दिशेने नेहमी शेव्हिंग किंवा डर्माप्लॅनिंग करा. जर तुम्ही केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने दाढी केली किंवा डर्माप्लॅनिंग केले तर तुमच्यात संसर्गाची शक्यता वाढते.

५) आंघोळीसाठी जास्तवेळ लावू नका

१) आंघोळ करताना बहुतेक स्त्रिया बाथरूममध्ये जास्त वेळ घालवतात. प्रत्येकजण आंघोळ करण्यासाठी वेळ घालवतो असं नाही.  आंघोळ करण्यापूर्वी, कधीकधी त्या बाथरूममध्ये ठेवलेल्या वस्तू स्वच्छ करण्यास सुरवात करतात तर कधीकधी ते बाथरूम धुवत बसतात. अंघोळीसाठी बाथरूमध्ये गेलेलं असताना असं काही करू नका. 

२)  जेव्हाही तुम्ही हे कराल तेव्हा अत्यंत सावधगिरी बाळगा आणि हातमोजे आणि मास्क वापरा. पायात प्लास्टिकचे शूज घाला. आठवड्यातून एकदा बाथरूम स्वच्छ करणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. जेणेकरून तुम्हाला दररोज पाण्यात जास्त वेळ घालवावा लागणार नाही. 

६) त्वचेचं होऊ शकतं नुकसान

१) बराच काळ पाण्यात राहिल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जातात. काही स्त्रिया शॉवर घेताना किंवा बाथटबमध्ये आंघोळ करताना बाथरूममध्ये जास्त वेळ घालवतात.  त्यामुळे त्यांच्या त्वचेवर कोरडेपणा येतो. 

२) आपण मॉइश्चरायझर वापरून हे नुकसान भरून काढू शकता. पण नेहमी लक्षात ठेवा की नैसर्गिक पोषणाला पर्याय नाही.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीमहिला