उन्हाळाच्या दिवसात त्वचा काळी पडणं खूपच कॉमन आहे. प्रत्येकालाच आपल्या त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. या वातावरणात त्वचेचा रंग काळा होण्यापासून रोखणं एक टास्कच आहे. (Skin care tips) धूळ, सतत घाम येणं, प्रदुषण यामुळे त्वचे संबंधित समस्या उद्भवतात. उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची काळजी कशी घ्यायची ते पाहूया. (Skin care tips in summer wash face with cold water and use sunscreen)
1) भरपूर पाणी प्या
उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे त्वचा चमकदार राहते आणि शरीर हायड्रेट राहतं. एका व्यक्तीनं दिवसभरात कमीत कमी ६ ते ७ लिटर पाणी प्यायला हवं. पाणी प्यायल्यानं त्वचेचा ग्लो वाढतो आणि इतर आरोग्यसंबंधीत समस्या दूर राहण्यास मदत होते.
2) चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवा
उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरून आल्यानंतर चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवा. आठवड्यातून कमीत कमी २ वेळा चेहऱ्याला स्क्रब करा. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली धूळ, माती निघून त्वचा चमकदार राहण्यास मदत होते.
3) सनस्क्रीनचा वापर
सनस्क्रीनचा वापर प्रत्येक वातावरणात केला जातो. उन्हाळ्यात सनस्क्रीनचा वापर आवर्जून करायला हवा. यामुळे सुर्याच्या किरणांपासून निघत असलेल्या अल्ट्रावॉयलेट किरणांपासून त्वचा सुरक्षित राहते. सनस्क्रीन लावल्यानं उन्हापासून बचाव केला जाऊ शकतो.
केस खूप लवकर पिकलेत? मेहेंदीत 'हा' एक पदार्थ मिसळा; बिना डायचे केस होतील काळेभोर
4) भाज्या
उन्हाळ्याच्या दिवसात हिरव्या भाज्या खाण्याची सवय ठेवायला हवी. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यानं शरीरात पोषक तत्व कमी पडतात यामुळे त्वचा चमकदार बनत नाही.
5) जास्तीत जास्त फळं खा
शरीराला डिहायड्रेशपासून वाचवण्यासाठी हंगामी फळांचा आहारात समावेश करा. द्राक्ष, टरबूज, आंबा, संत्री अशा फळांचे सेवन करू शकता. या फळांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते ज्यामुळे त्वचेची चमक टिकून राहते.
रामनवमीला करा तोंडात टाकताच विरघळणारे, मऊ बेसन लाडू; नैवेद्यासाठी झटपट, सोपा ऑपश्न
6) केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर टाळा
अनेक वेळा आपण घटक न तपासता रसायनयुक्त पदार्थ वापरतो. या उत्पादनांच्या सततच्या वापरामुळे त्वचेचे खूप नुकसान होते. त्याऐवजी नैसर्गिक पर्यायांचा वापर करावा.