Lokmat Sakhi >Beauty > टीन एजर्स मुलीही ऐन तारुण्यात करतात भलतेसलते प्रयोग; सावधान- चेहरा खराब होण्याचा धोका

टीन एजर्स मुलीही ऐन तारुण्यात करतात भलतेसलते प्रयोग; सावधान- चेहरा खराब होण्याचा धोका

Skin Care Tips: आईचं किंवा मोठ्या बहिणीचं बघून टीन एजर्स (beauty tips for teenage girls) मुलींनाही पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ब्यूटी ट्रिटमेंट्स करण्याचा मोह होतो.. पण हा क्षणभराचा मोह टाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 06:00 PM2022-03-04T18:00:08+5:302022-03-04T18:02:07+5:30

Skin Care Tips: आईचं किंवा मोठ्या बहिणीचं बघून टीन एजर्स (beauty tips for teenage girls) मुलींनाही पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ब्यूटी ट्रिटमेंट्स करण्याचा मोह होतो.. पण हा क्षणभराचा मोह टाळा...

Skin Care Tips: Teenage girls must not try these beauty treatments in the early age, It will damage your skin | टीन एजर्स मुलीही ऐन तारुण्यात करतात भलतेसलते प्रयोग; सावधान- चेहरा खराब होण्याचा धोका

टीन एजर्स मुलीही ऐन तारुण्यात करतात भलतेसलते प्रयोग; सावधान- चेहरा खराब होण्याचा धोका

Highlightsटीन एजमध्ये मैत्रिणींचं ऐकून किंवा टिव्हीवर जाहिराती पाहून वेगवेगळे कॉस्मेटिक्स वापरून बघण्याचा मोह होतो. मग चेहऱ्यावर धाडधाड प्रयोग करणं सुरू होतं.

दहावीचा टप्पा ओलांडला आणि एकदा का ११ वी ला प्रवेश घेऊन कॉलेजमध्ये पाय ठेवला की सगळं काही बदलून गेल्यासारखं वाटतं.. आता काय आपण कॉलेजला आलो आहोत म्हणजे मोठे झालो आहोत.. जे हवं ते करू शकतो, असं वाटण्याचं हेच वय. म्हणूनच तर मग कॉलेजला जायचं, छान दिसायचं, तर मग पार्लरची वारी एकदा करायलाच हवी, असं टिनएज मुलींना (beauty tips for teenage girls) वाटतं आणि मग त्यातूनच सुरू होतं, चेहऱ्यावर एकेक ब्यूटी ट्रिटमेंट (Skin Care Tips) करण्याचा खेळ. 

 

पण मुलींनो कॉलेजमध्ये जरी गेला असलात, तरी तुम्ही आणि तुमची त्वचा या दोन्ही गोष्टी अजूनही मॅच्युअर झालेल्या नसतात. त्यामुळे अगदी लहान वयातच त्वचेवर कसलेही प्रयोग करू नका. कॉस्मेटिक्समध्ये असणारे केमिकल्स तुमच्या कोवळ्या त्वचेचं नुकसान करू शकतात. यामुळे मग कमी वयातच चेहरा खराब व्हायला सुरुवात होते. त्यामुळे चुकूनही असे काही प्रयोग तुमच्या चेहऱ्यावर करायला जाऊ नका..

 

१. ब्लिचिंग
चेहऱ्याला ग्लो देण्यासाठी ब्लिचिंग करण्यात येतं. पण अगदी कोवळ्या वयात ब्लिचिंग करणं धोक्याचं आहे. एरवीही ज्या महिला नेहमी ब्लीच करतात, त्यांनाही चेहऱ्यावर जळजळ होणे, चुरचुरणे असा त्रास जाणवतो. ब्लीचमध्ये असणारे हाय केमिकल्स त्वचेवर झटकन रिॲक्शन देतात. त्यामुळे २२- २३ वर्षाचे झाल्यानंतरच ब्लीचच्या वाटेला जाणं चांगलं. तेव्हाही ३ ते ४ महिन्यातून एकदाच ब्लीच करा.

 

२. पिलिंग
वयात आल्यानंतर अनेक मुलींना तारुण्यपिटिका येण्याचा त्रास होतो. त्याचे अनेक डाग चेहऱ्यावर दिसू लागतात. त्यामुळे मग खराब झालेल्या चेहऱ्यासाठी अनेक मुलींना पिलिंग करण्याचा मोह होतो. पण ही एक केमिकल ट्रिटमेंट असल्याने कमी वयात ती टाळलेली बरी. अशा ट्रिटमेंट्स करण्याआधी तुमच्या शहरातील नावाजलेल्या आणि चांगला अनुभव असलेल्या सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

 

३. नवनविन ब्यूटी प्रोडक्ट्स ट्राय करणे
टीन एजमध्ये मैत्रिणींचं ऐकून किंवा टिव्हीवर जाहिराती पाहून वेगवेगळे कॉस्मेटिक्स वापरून बघण्याचा मोह होतो. मग चेहऱ्यावर धाडधाड प्रयोग करणं सुरू होतं. हे सगळं तुमच्या त्वचेसाठी अजिबातच चांगलं नाही. अशामुळे त्वचेवर वेगवेगळ्या रिॲक्शन होऊ शकतात आणि त्यामुळेही पिंपल्स येणे, चेहरा काळवंडणे, रॅश येणे असा त्रास होऊ शकतो.  

Web Title: Skin Care Tips: Teenage girls must not try these beauty treatments in the early age, It will damage your skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.