Join us  

Skin Care Tips : उर्मिला कोठारेचा सुंदर दिसण्याचा परफेक्ट 5 स्किन केअर मंत्र, मेकअपशिवायही दिसाल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 5:37 PM

Skin Care Tips : नितळ त्वचेसाठी अभिनेत्री उर्मिला कोठारे देते चाहत्यांना खास टिप्स, तुम्हीही तिच्या टिप्स वापराल तर त्वचा होईल नितळ...

ठळक मुद्देपाहा काय आहे उर्मिलाच्या नितळ त्वचेमागील रहस्य...त्वचा ताजीतवानी राहण्यासाठी रासायनिक उत्पादनांपेक्षा हर्बल गोष्टी कधीही जास्त चांगल्या, उर्मिला म्हणते...

आपला चेहरा टीव्हीतील अभिनेत्रींसारखा उजळ असावा असे आपल्याला कायमच वाटते. पण त्यासाठी नेमके काय करायचे हे आपल्याला कळत नाही. प्रसिद्ध अभिनेत्री  उर्मिला कोठारे अभिनयाबरोबरच तिचा फॅशन सेन्स आणि डान्स यामुळे नेहमीच चर्चेत असते. उर्मिलाला एक मुलगी असून तिच्याबरोबरचे काही व्हिडिओ उर्मिला नेहमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत असते. उर्मिलाचे सौंदर्यही मनाचा ठाव घेणारे आहे. आता आपल्या सौंदर्यासाठी आणि मुलायम त्वचेसाठी उर्मिला नेमके काय करते असा प्रश्न आपल्याला पडू शकतो.  (Skin Care Tips) तर नितळ त्वचेसाठी उर्मिला काय करते हे तिने स्वत: लोकमतशी बोलताना सांगितले आहे. उर्मिलाने दिलेल्या याच टिप्सचा वापर आपणही केला तर आपल्याही सौंदर्यात कदाचित भर पडू शकेल. 

(Image : Google)

१. क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्वचेचा पोत चांगला राहण्यास मदत होते. इतकेच नाही तर सध्या उन्हाचा तडाखा जास्त असल्याने चेहऱ्याला न विसरता सनस्क्रीन लोशन लावणेही आवश्यक आहे. 

२. घरात असताना कोणत्याही भाजीची, फळांची साले चेहऱ्याला लावा. त्यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो येतो. तसेच त्वचा ताजीतवानी राहायला मदत होईल. घरात त्या दिवशी जी भाजी होणार आहे किंवा जे फळ खाणार आहात त्याच्या सालांचा वापर करा. ही साले आपण फेकून देतो पण तसे न करता त्याचा उपयोग करणे अतिशय आवश्यक आहे. 

३. आहार हा आपल्या त्वचेसाठी अतिशय महत्त्वाचा घटक असतो. पोट साफ असेल तर त्याचे रिफ्लेक्शन चेहऱ्यावर येते. त्यामुळे पोट साफ असणे आवश्यक आहे. तसेच तेलकट खाणे, मसालेदार पदार्थ खाणे यावर नियंत्रण ठेवायला हवे. तरच आपली त्वचा नितळ आणि पिंपल्स न येता चांगली राहू शकते. 

४. कमीत कमी मेकअप करणे हे त्वचा आणि चेहरा चांगले राहण्यासाठी अतिशय आवश्यक असते. त्यामुळे गरज नसताना चेहऱ्यासाठी खूप जास्त उत्पादने वापरणे योग्य नाही. कमीत कमी मेकअप केल्याने चेहऱ्याची त्वचा चांगला श्वास घेऊ शकते आणि ती जास्त ताजीतवानी राहते. 

(Image : Google)

५. स्कीन केअर रुटीन फॉलो करणे गरजेचे आहे. यामध्ये चेहरा दिवसातून चार ते पाच वेळा पाण्याने किंवा तुमच्या त्वचेला सूट होणाऱ्या फेसवॉशने धुवायला हवा. त्यामुळे चेहऱ्यावरची घाण निघून जाण्यास मदत होते.  तसेच रात्री झोपताना न चुकता चेहऱ्याला मॉईश्चरायजर लावायला हवे त्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीउर्मिला कानेटकर कोठारे