Lokmat Sakhi >Beauty > Skin Care: सुंदर दिसायचं तर मेकअप नाही, करा फक्त 5 सोप्या गोष्टी; त्वचा होणारच चमकदार-तुकतुकीत

Skin Care: सुंदर दिसायचं तर मेकअप नाही, करा फक्त 5 सोप्या गोष्टी; त्वचा होणारच चमकदार-तुकतुकीत

Skin Care Tips: आपलं दररोजचं स्किन केअर रुटीन कसं आहे, रोजच्या रोज आपण त्वचेसाठी काय करतो, तिची कशी काळजी घेतो, यावर तुमच्या त्वचेचा पोत (texture of skin) अवलंबून असताे... म्हणूनच तर सौंदर्यतज्ज्ञांनी याविषयी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2022 01:02 PM2022-04-05T13:02:38+5:302022-04-05T13:03:44+5:30

Skin Care Tips: आपलं दररोजचं स्किन केअर रुटीन कसं आहे, रोजच्या रोज आपण त्वचेसाठी काय करतो, तिची कशी काळजी घेतो, यावर तुमच्या त्वचेचा पोत (texture of skin) अवलंबून असताे... म्हणूनच तर सौंदर्यतज्ज्ञांनी याविषयी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 

Skin Care: Your daily skin care routine decides the health of your skin, Expert says 5 rules for glowing, healthy and radiant skin | Skin Care: सुंदर दिसायचं तर मेकअप नाही, करा फक्त 5 सोप्या गोष्टी; त्वचा होणारच चमकदार-तुकतुकीत

Skin Care: सुंदर दिसायचं तर मेकअप नाही, करा फक्त 5 सोप्या गोष्टी; त्वचा होणारच चमकदार-तुकतुकीत

Highlights त्वचेचा पोत हा तुम्ही कोणत्या भागात राहता यावरही अवलंबून असतो. तसेच अनुवंशिकताही त्याला कारणीभूत असते. पण तरीही रोजच्या रुटीनमध्ये केलेले बदल नक्कीच त्वचेसाठी अधिक पोषक ठरतील. 

आजकाल सौंदर्य प्रसाधनांचं मार्केट प्रचंड वाढलं असून त्याच्या जाहीरातींचा भरपूर मारा दिवसभर आपल्यावर होत असतो. यासगळ्या पर्यायांमधून नेमकं आपल्यासाठी काय योग्य, हे ठरवणं खूपच अवघड. त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी सौंदर्य प्रसाधने नक्कीच मदत करतात. पण त्यांच्यावरच आपल्या त्वचेचा पोत, चमक (home remedies for radiant skin) अवलंबून आहे, असं मुळीच नाही.. जोपर्यंत तुम्ही योग्य स्किन केअर रुटीन (what is the correct skin care routine?) समजून घेत नाही आणि त्याचे पालन करत नाही, तोपर्यंत त्वचा तुकतुकीत, तजेलदार, स्वच्छ होणार नाही, असं सौंदर्यतज्ज्ञ डॉ. मधू चोप्रा यांनी इ- टाईम्स यांच्याशी बोलताना सांगितलं.

 

चमकदार त्वचेसाठी आवश्यक ५ गोष्टी
१. भरपूर पाणी पिणे

त्वचेसाठी आणि आपल्या एकंदरीतच आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे अतिशय गरजेचे आहे. आपल्या शरीरात अनेक विषारी घटक असतात. ते शरीराबाहेर टाकून देण्यासाठी पाण्याची गरज असते. जर पाणी पुरेशा प्रमाणात नाही मिळाले तर विषारी घटक शरीरातच राहतात आणि आरोग्यावर तसेच त्वचेवर दुष्परिणाम करतात. त्यामुळे भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. दिवसभरातून ८ ते १० ग्लास पाणी प्यायलाच हवं.

 

२. फळं आणि भाज्या...
बऱ्याच लोकांच्या जेवणात पोळी जास्त आणि भाजी कमी असते. याच्या अगदी उलट करण्याची गरज आहे. त्वचेचा पोत जपायचा तर फळं आणि भाज्या अधिकाधिक प्रमाणात खायलाच हव्या. दररोज एक तरी फळ पोटात गेलं पाहिजे. आहारातील कच्च्या भाज्यांचं प्रमाणही वाढवलं पाहिजे. 

 

३. त्वचेच्या स्वच्छतेसाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर
आजकाल प्रत्येक कॉस्मेटिक्समध्ये रसायनं असतातच. त्यामुळे त्वचेसाठी साबण, क्लिंजर यांचा वापर कमीत कमी करा. त्याऐवजी त्वचेची स्वच्छता करण्यासाठी डाळीचं पीठ आणि हळद, कॉफी पावडर आणि मध, मसुरीच्या डाळीचं पीठ, दूध आणि लिंबू असे नैसर्गिक पदार्थ वापरा. 

 

४. क्लिंजिंग आणि टोनिंग
चेहरा धुतल्यानंतर तुम्ही तिला कशा पद्धतीने टोनिंग आणि माॅईश्चराईज करता हे देखील अतिशय आवश्यक आहे. दिवसभरातून ३ ते ४ वेळा चेहरा धुतला गेला पाहिजे. पण प्रत्येकवेळी साबण किंवा अन्य काही फेसपॅक लावण्याची गरज नाही. स्वच्छ पाणी पुरेसं आहे.

 

५. कडक ऊन आणि प्रदुषण
कडक ऊन्हात तसेच प्रदुषण असलेल्या ठिकाणी खूप वेळ काम करावं लागणं त्वचेसाठी खरोखरच हानिकारक आहे. त्यामुळे शक्यतो अशा ठिकाणी जाणे टाळा. किंवा जावचं लागलं तर त्वचेची योग्य काळजी घ्या. त्वचेचा जास्तीत जास्त भाग झाकलेला असेल याकडे लक्ष द्या. त्वचेचा पोत हा तुम्ही कोणत्या भागात राहता यावरही अवलंबून असतो. तसेच अनुवंशिकताही त्याला कारणीभूत असते. पण तरीही रोजच्या रुटीनमध्ये केलेले बदल नक्कीच त्वचेसाठी अधिक पोषक ठरतील. 

 

Web Title: Skin Care: Your daily skin care routine decides the health of your skin, Expert says 5 rules for glowing, healthy and radiant skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.