Join us  

त्वचा कोरडी आणि निस्तेज झाली ? केळीपासून बनवा फेसपॅक, चेहरा करेल ग्लो, आणि फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 6:02 PM

Banana Face Pack Winter Face Problems हिवाळ्यात अनेकांना कोरडी त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात, केळीपासून बनवा फेसपॅक, चेहरा चमकेल

हिवाळा सुरू झाला की अनेकांना कोरडी त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. कोरडी आणि निस्तेज त्वचेमुळे अनेकांना मेकअप करून देखील चमकदार त्वचा मिळत नाही. कोरडी त्वचेपासून छुटकारा मिळवण्यासाठी अनेक जण प्रोडक्ट्सचा वापर करतात. काही प्रोडक्ट्स चेहऱ्यावर प्रभावी ठरतात तर काही नाही. आपण घरगुती साहित्यांचा वापर करून कोरडी त्वचेला बाय बाय करू शकता. आज आपण अशा एका फेसपॅकची माहिती जाणून घेणार आहोत. ज्याने आपली त्वचा कोरडीमुक्त होईल, यासह एक विशेष चमक चेहऱ्यावर येईल. हे फेसपॅक आपण केळी या फळापासून बनवणार आहोत. केळीमध्ये अत्यंत गुणकारी पोषक तत्वे आहेत, जे आपल्या चेहऱ्यावरील निस्तेज त्वचा काढून एक चमकदार चेहरा देईल.

फेसपॅक बनवण्यासाठी साहित्य

पिकलेला केळ - १

तांदुळाचं पीठ - ३ मोठे चमचे 

मध - २ मोठे चमचे

कृती

कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी, सर्वप्रथम एका बाउलमध्ये १ पिकलेलं केळ घ्या. आणि त्या केळीला चमच्याच्या सहाय्याने मॅश करा. आता त्यात तांदळाचे पीठ आणि मध घाला. हे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्या. आता ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा, आणि साध्या पाण्याने धुवा. अश्याप्रकारे आपल्याला कोरडीमुक्त आणि निसतेच त्वचा मिळेल. हा फेसपॅक महिन्यातून ३ वेळा चेहऱ्यावर लावा, जेणेकरून थंडीत सुद्धा एक चमकदार चेहरा मिळेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी