एजिंग ही नैसर्गिक प्रक्रिया असून ती निरंतर सुरु असते. चेहऱ्याच्या त्वचेवरुन वय वाढल्याच्या खुणा लगेच दिसतात. चेहेऱ्याच्या त्वचेची काळजी घेतल्यास त्वचेवरुन वय ओळखणं अवघड होतं. त्वचा तरूण दिसण्यासाठी ती घट्ट असणं आवश्यक आहे. त्वचा घट्ट होण्यासाठी उपाय करणं म्हणजे तारूण्य टिकवणं होय. त्वचा ही केवळ वयामुळेच सैल होते असं नाही तर वजन कमी झाल्याने, वॅक्सिंग केल्यानं, त्वचा ग्लो होण्यासाठी पील ऑफ मास्क वापरणं यामुळेही त्वचा सैल पडते. त्वचा सैल पडू नये म्हणून किंवा त्वचा सैल पडलेली असल्यास ती घट्ट करण्यासाठी उपाय करता येतात.
Image: Google
त्वचा घट्ट करण्यासाठी
1. त्वचा घट्ट राहाण्यासठी फेस योगाचा चांगला उपयोग होतो. चेहऱ्याची त्वचा नैसर्गिकरित्या घट्ट करण्यासाठी फेस योगाचा उपयोग होतो. फेस योगाचे मार्गदर्शनपर व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. ते पाहून फेस योगा सहज करता येतो.
2. आहारातून क, ब आणि ई जीवनसत्व पुरेसं सेवन केल्यास त्याच त्वचेवर चांगला परिणाम दिसतो. या पोषक घटकांमुळे त्वचेवरील ताण नाहिसा होतो. त्वचेवर सुरकुत्या पडत नाही, त्वचा सैल होत नाही
Image: Google
3. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी, त्वचा घट्ट करण्यासाठी जेड रोलर्स आणि गोशुआ सारखे स्किन डिव्हाइस उपयुक्त असतात. या विशिष्ट प्रकारच्या दगडांमुळे चेहऱ्यावरील त्वचा घट्ट होण्यास मदत होते.
Image: Google
4. दिवसभर पुरेसं पाणी पिल्यास त्वचा ओलसर राहाते, तरुण दिसते. पाणी कमी प्याल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होवून त्वचेवर त्याचे परिणाम दिसतात. पाणी कमी प्याल्यस त्वचा सुरकुतलेली, कोरडे दिसते. पाण्याचं कमी प्रमाण असल्यास त्वचेवर एजिंग इफेक्ट लगेच दिसतो आणि त्वचा ढीली पडते. त्वचा तरुण दिसण्यासाठी , त्वचा घट्ट दिसण्यासाठी पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे.
5. सूर्याच्या अति नील किरणांपासून त्वचेचं संरक्षण केलं नाही तर एजिंगची पक्रिया वेगानं होते. त्वचा सुरकुतते, सैल पडते. हे टाळण्यासाठी चेहऱ्याला नियमित सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे. सनस्क्रीमुळे एजिंगची प्रक्रिया मंद होते.