Join us  

त्वचा खूप तेलकट आहे ? ५ उपाय, चेहरा दिसेल सुंदर कायम फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2022 1:31 PM

काही महिलांची त्वचा खूप तेलकट असते. अनेकदा अचानक तेलकट दिसू लागते ते कशाने होते ?

काही महिलांची त्वचा खूपच तेलकट असते, काहींची ड्राय कोरडी. काहींना ब्यूटी प्रोडक्ट्स सूट करतात, काहींना सूट होत नाही. तेलकट त्वचा असते त्यांच्या चेहऱ्यावर इतर मेकअप प्रॉडक्ट्स जास्त काळ टिकत नाही. मुख्य म्हणजे हार्मोनल बदलांमुळेही त्वचा तेलकट होते. महिलांमध्ये अनेक कारणांमुळे हार्मोन असंतूलन होते. यामध्ये गर्भधारणा, गर्भनिरोधक औषधांचा वापर, टेस्टोस्टेरोनचे प्रमाण कमी होणे, पौगंडावस्थेत येणे इत्यादी. तणावामुळे देखील शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात आणि त्वचा तेलकट होऊ लागते. काही वेळेला वेगवेगळ्या प्रकारची स्किन केअर उत्पादने देखील तुमच्या तेलकट चेहरा होण्यामागे कारणीभूत ठरू शकतात. कारण, सौंदर्य उत्पादनांमध्ये अनेक प्रकारची रसायने असतात, ज्यामुळे आपल्या त्वचेला हानी पोहोचते.

त्वचा तेलकट असेल तर काय काळजी घ्याल ?

१. दिवसातून दोनदा चेहरा धुणे

जास्त साबण किंवा फेसवॉश वापरू नका. त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल संपुष्टात येऊ लागते. आपल्या चेहऱ्यावर ग्लिसरीन साबण किंवा फेस वॉश वापरून पहा.

२. तेलकट त्वचेसाठी मध उत्तम

मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे तेलकट त्वचेमध्ये पिंपल्सची समस्या नियंत्रित करतात. याव्यतिरिक्त, मध त्वचेला तेलकट होण्यापासून प्रतिबंधित करते आणि नैसर्गिक पद्धतीने त्वचेची आर्द्रता राखते.

३. तेलकट पदार्थ टाळा

आपण जे खातो त्यानुसार, आपले शरीर बनते. म्हणूनच जास्त तेलकट पदार्थ खाऊ नयेत. आपल्या आहारात कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे प्रमाण कमी ठेवा. यामुळे त्वचेवर तेल तयार होण्याचे प्रमाण कमी होईल.

४. शक्य तितके पाणी प्या आणि त्वचा हायड्रेट ठेवा

आपला चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी अधिक पाणी पिणे फार महत्वाचे आहे. कारण, पाण्यामुळे तुमचा चेहरा हायड्रेटेड राहतो आणि रफसह चिकटपणा कमी होऊन चेहरा अधिक खुलून दिसतो.

५. टोमॅटोचा करा वापर

टोमॅटोमध्ये सॅलिसिलिक ऍसिड असते जे त्वचेतील तेल कमी करण्यास मदत करते. तसेच, सॅलिसिलिक ऍसिड देखील मुरुमांच्या समस्येवर एक चांगला उपाय आहे. चेहरावर तुम्ही एक टोमॅटो घेऊन त्याचा लगदा करून त्यात थोडी साखर मिसळून चेहऱ्यावर लाऊ शकता. चेहऱ्यावर लावल्यानंतर तुम्हाला ५ मिनिटे हलके मसाज करायचे  त्यानंतर १० मिनिटांनी धुवायचे आहे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी