Lokmat Sakhi >Beauty > Skin Tanning Solution : उन्हामुळे त्वचा काळपट झालीये? ग्लोईंग त्वचेचे ५ ग्लोल्डन रूल्स, नेहमी दिसेल दिसेल फ्रेश

Skin Tanning Solution : उन्हामुळे त्वचा काळपट झालीये? ग्लोईंग त्वचेचे ५ ग्लोल्डन रूल्स, नेहमी दिसेल दिसेल फ्रेश

Skin Tanning Solution : जास्त पाणी पिण्याचा तुमच्या त्वचेवर सकारात्मक परिणाम होतो आणि तुमची त्वचा चमकते. आपल्या शरीरातील सर्व पेशी पाण्यापासून बनलेल्या असतात. जेव्हा या पेशींना पुरेसे पाणी मिळत नाही, तेव्हा त्या कोरड्या होतात, सुरकुत्या पडतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 05:29 PM2022-04-08T17:29:00+5:302022-04-08T17:43:14+5:30

Skin Tanning Solution : जास्त पाणी पिण्याचा तुमच्या त्वचेवर सकारात्मक परिणाम होतो आणि तुमची त्वचा चमकते. आपल्या शरीरातील सर्व पेशी पाण्यापासून बनलेल्या असतात. जेव्हा या पेशींना पुरेसे पाणी मिळत नाही, तेव्हा त्या कोरड्या होतात, सुरकुत्या पडतात.

Skin Tanning Solution : How to get glowing skin 5 beauty rules for skin glowing skin | Skin Tanning Solution : उन्हामुळे त्वचा काळपट झालीये? ग्लोईंग त्वचेचे ५ ग्लोल्डन रूल्स, नेहमी दिसेल दिसेल फ्रेश

Skin Tanning Solution : उन्हामुळे त्वचा काळपट झालीये? ग्लोईंग त्वचेचे ५ ग्लोल्डन रूल्स, नेहमी दिसेल दिसेल फ्रेश

रोजच्या धावपळीच्या रूटीनमुळे त्वचेवर लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी डार्क सर्कल्स, पिंपल्स, काळपटपणा वाढत जातो. फेशियल, क्लिनअप केल्यानंतर थोडावेळ चेहरा सुंदर दिसतो पण दोन दिवसात पुन्हा जैसे थे. (Skin Care Tips) म्हणूनच या लेखात तुम्हाला काही गोल्डन रूल्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही ग्लोईंग स्किन मिळवू शकता. डॉ. रितिका धिंग्रा (प्रगत कॉस्मेटोलॉजी तज्ञ आणि संस्थापक, लक्स क्लिनिक) यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना या नियमांबद्दल सांगितले आहे. (How to get glowing skin 5 beauty rules for skin glowing skin)

१) नियम पहिला-  स्वत:ला नेहमी  हायड्रेट ठेवा

जास्त पाणी पिण्याचा तुमच्या त्वचेवर सकारात्मक परिणाम होतो आणि तुमची त्वचा चमकते. आपल्या शरीरातील सर्व पेशी पाण्यापासून बनलेल्या असतात. जेव्हा या पेशींना पुरेसे पाणी मिळत नाही, तेव्हा त्या कोरड्या होतात, सुरकुत्या पडतात. जेव्हा त्वचा योग्यरित्या हायड्रेटेड असते तेव्हा ती जाड दिसते आणि सुरकुत्या कमी होतात. त्यामुळे तुमच्या त्वचेला सतत पाण्याचा प्रवाह द्या. दररोज किमान 8 ग्लास पाणी प्या आणि ते एकाच वेळी पिण्याऐवजी दिवसभर प्या.

२) नियम दुसरा- भरपूर झोप घ्या

जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर तुमची त्वचा तुमच्यासारखीच थकते. त्यामुळे त्वचा कोरडी होते आणि डोळ्याभोवती डार्क सर्कल्स दिसतात. झोपेला प्राधान्य देण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे अपुरी झोप तुमच्या त्वचेवर पिंपल्स तयार करू शकते. संशोधनात असे दिसून आले आहे की खराब झोप त्वचेच्या गुणवत्तेवर परिणाम करते आणि वृद्धत्वाच्या लक्षणांमध्ये योगदान देऊ शकते जसे की फाईन लाईन्स आणि सुरकुत्या. त्यामुळे रोज रात्री किमान ८ तास झोपण्याचा प्रयत्न करा.

३) नियम तिसरा- त्वचा एक्सफोलिएट करा

चेहऱ्याची नियमित साफसफाई खूप आवश्यक आणि उपयुक्त आहे.  त्वचेची  निगा राखण्याची दिनचर्या सुधारण्यासाठी मृत त्वचेच्या पेशी योग्यरित्या काढून टाकण्यासाठी दर आठवड्याला एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो. सनस्क्रीन, व्हिटामीन, मास्क तेल शोषून घेण्यास मदत होते. याशिवाय सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी होऊन त्वचेवर ग्लो येतो. 

नसांमध्ये साचलेलं घातक कोलेस्ट्रॉल कमी करतात ५ पदार्थ; गंभीर आजारदूर ठेवण्यासाठी आजपासूनच खा

४) नियम चौथा- त्वचा मॉईश्चराईज करा

ग्लिसरीन असलेले मॉइश्चरायझर निवडा. कारण त्यात आर्द्रता लॉक करण्याची क्षमता असते. चांगल्या त्वचेसाठी आर्द्रता पातळी पुनर्संचयित करणे आणि पुन्हा भरणे महत्वाचे असते. तसेच, आंघोळ केल्यानंतर मॉइश्चरायझर पुन्हा लावणे लक्षात ठेवा, मग तुम्ही सकाळी किंवा रात्री आंघोळ करा. हिवाळ्यात मॉइश्चरायझरची आवश्यकता असते कारण त्वचा कोरडे होण्याची शक्यता असते.

५) नियम पाचवा- सनस्क्रीन लावा

सूर्य UVB आणि UVA किरणे उत्सर्जित करतो ज्यामुळे तुमची त्वचा लवकर काळपट पडते. आणि UVB किरणांची तीव्रता तुमची त्वचा टॅन किंवा बर्न करू शकते. त्यामुळे चांगल्या स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरायला हवं जे तुमचे दोन्ही किरणांपासून संरक्षण करेल.  SPF तुमच्या त्वचेचे  सुर्याच्या किरणांपासून संरक्षण करू शकते.  उन्हाळ्यात महिलांना गंभीर युरिन इन्फेक्शनचा धोका; 4 चुका- लघवीचे आजार हमखास

Web Title: Skin Tanning Solution : How to get glowing skin 5 beauty rules for skin glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.