कुमकुम - एक प्यारा सा बंधन या सिरीयलमधून अल्पावधीतच लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री जुही परमार सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. जुही नेहमी अनेक घरेलू आयडियाज आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते. तिचे हे घरगुती नुस्खे खूप फायदेशीर ठरतात. यासह हे नुस्खे घरच्या साहित्यात बनले जाते. प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसायचे असते. सुंदर दिसण्यासाठी ती विविध प्रोडक्ट्सचा वापर देखील करते. हे प्रोडक्ट्स काही लोकांना सूट करतात तर काहींना घातक. त्यामुळे घरच्या साहित्यात देखील आपण स्कीनची योग्यरित्या काळजी घेऊ शकता. वातावरणात बदल घडले तर बऱ्याचदा स्कीन खूप टॅन होते. आणि हे टॅनिंग आपण घरच्या घरी दुर करू शकता. ते कसे हे आपल्याला जुहीच्या व्हिडिओद्वारे कळुन येईल.
बहुतांशवेळा उन्हाळ्यात बाहेर फिरायला गेलात तर सर्वात जास्त टॅनिंगचा सामना करावा लागतो. दिल्ली-मुंबईसारख्या शहरात महिला दिवसा पूर्ण बाह्यांचे आणि दुपट्टा घालून फिरतात. टॅनिंग काढण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने आहेत. यापैकी काही उत्पादनांमध्ये घातक रसायने असतात. जी आपल्याला काही काळासाठी गोरी बनवतात परंतु, दीर्घकाळापर्यंत, ते आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम करतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जुही परमार आपल्या मुलीसोबत गोव्यात सुट्टी एन्जॉय करत होती. यादरम्यान, तिला टॅनिंगचाही सामना करावा लागला. टॅनिंग दूर करण्यासाठी, अभिनेत्रीने एक घरगुती उपाय इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याद्वारे आपण आपले शरीर नैसर्गिकरित्या सुंदर बनवू शकता.
फेस पॅक बनवण्यासाठी साहित्य
बेसन
खोबरेल तेल
काॅफी पाऊडर
एलोवेरा जेल
फेस पैक बनवण्याची कृती
सर्वप्रथम एका बाउलमध्ये बेसन, खोबरेल तेल, काॅफी पाऊडर, एलोवेरा जेल चांगले मिक्स करा. एक ते दीड मिनिटे या साहित्यांना चांगलं मिसळा. मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यासहित आपल्या मानेवर देखील लावावे. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटे तसेच ठेवून द्यावे. आणि शेवटी थंड पाण्याने धुवून टाकावे.
हे मिश्रण लावल्यानंतर काही मिनिटांनंतर तुम्हाला त्वचेत थोडासा फरक दिसेल. तुम्हाला या पेस्टचा 100% परिणाम लगेच दिसणार नाही, परंतु, हे मिश्रण आपण दररोज लावलात तर याचा रिजल्ट तुम्हाला लवकर दिसेल. आणि यासह चेहरा चमकदारही दिसेल.