Join us  

Skin Whitening Facial At Home : चेहरा खूप डल, काळपट वाटतोय? गव्हाच्या पिठानं फक्त ४ स्टेप्सनी फेशियल करा, चेहरा दिसेल ग्लोईंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2022 1:04 PM

Skin Whitening Facial At Home : चेहऱ्यावर पीठ वापरल्याने त्वचेचा रंग सुधारतो. नको असलेल्या केसांची समस्याही कमी होते. त्यामुळे गव्हाच्या पीठाने फेशियल केल्याने तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल.

प्रत्येकाला स्वच्छ आणि चमकदार त्वचा हवी असते. यासाठी महिला विविध प्रकारचे उपचार आणि सौंदर्य उत्पादने वापरतात. विशेषतः फेशियल करायला अनेकींना आवडतं (Beauty Tips)  चांगल्या  त्वचेसाठी महिन्यातून एकदा फेशियल करणे आवश्यक आहे. पण वेळेअभावी आणि फेशियल खूप महाग असल्यानं अनेकजणी फेशियल करणं टाळतात. (Skin whitening facial at home) पण आता तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही कारण  आम्ही तुम्हाला गव्हाच्या पिठाने फेशियल करण्याच्या सोप्या स्टेप्स सांगणार आहोत (Permanent Skin Whitening Wheat flour Face Pack) चेहऱ्यावर पीठ वापरल्याने त्वचेचा रंग सुधारतो. नको असलेल्या केसांची समस्याही कमी होते. त्यामुळे गव्हाच्या पीठाने फेशियल केल्याने तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल. (Aata or wheat flour Facial)

1) स्टेप १

एका वाडग्यात 1 टीस्पून गव्हाचे पीठ आणि 2 चमचे कच्चे दूध घाला. दोन्ही गोष्टी नीट मिसळा. त्याची जाडसर पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर चांगली लावा. नंतर चेहरा कोरडा होऊ द्या. हे सुकल्यानंतर हातावर पाणी घेऊन 5 मिनिटे हलक्या हातांनी चेहऱ्याची मालिश करा. आता आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. 

पांढऱ्या केसांची समस्या विसरा, वापरा मसाल्याच्या डब्यातली १ गोष्ट- केस राहतील कायम काळेभोर-सुंदर

2) स्टेप २

आता तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ कराल तेव्हा पुढची पायरी स्क्रबिंगकडे येते. चेहरा स्क्रब करणे आवश्यक आहे. यामुळे मृत त्वचा निघून जाते. स्क्रबिंगसाठी, तुम्हाला 1 चमचे गव्हाचे पीठ, 1 चमचे ओट्स आणि ऑलिव्ह ऑइलचे 4-5 थेंब लागतील. या सर्व गोष्टी एका भांड्यात मिसळा. आता ते तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि गोलाकार गतीने स्क्रबिंग करा.

रोज भाताशिवाय जेवणच जात नाही? भात बनवताना एक ट्रिक वापरा, भात खाऊनही फिट राहाल

3) स्टेप ३

त्वचेला एक्सफोलिएट केल्यानंतर चेहऱ्यावर क्रीम लावावी. यामुळे तुमची त्वचा मुलायम होईल. 1/2 चमचे गव्हाचे पीठ आणि 1 चमचे ग्लिसरीन कोणत्याही भांड्यात  मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कमीतकमी 5 मिनिटे त्वचेवर चोळून घ्या.

4) स्टेप ४

वाफ घेतल्यानं किती  फायदे मिळतात याची तुम्हाला माहिती असेलच. म्हणूनच फेशियल केल्यानंतर स्टीम घेणे खूप गरजेचे आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येतो. यासाठी तुम्हाला फक्त एका स्टीमरची गरज आहे. परंतु जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही ते भांड्यात पाणी गरम करून वाफ घेऊ शकता. नंतर 5 मिनिटांनी चेहरा स्वच्छ सूती कापडाने किंवा कॉटन बॉलने पुसा.  या ४ स्टेप्सच्या मदतीनं घरबसल्या गव्हाच्या पिठाने फेशियल करा.

टॅग्स :हेल्थ टिप्सब्यूटी टिप्सत्वचेची काळजी