आपल्या चेहऱ्याची त्वचा खूप नाजूक - कोमल असते. मात्र, बिघडलेल्या जीवनशैलीमुळे स्किनची काळजी घ्यायला अनेकांना जमत नाही. साधारणपणे त्वचेचे पाच प्रकार असतात. असे असले तरी आपल्यापैकी अनेकींना, आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे माहिती नसते. प्रत्येक स्किनसंबंधित महिलांना तक्रारी असतात. त्यात ज्यांची स्किन ऑईली आहे, त्यांना तर फार आपल्या त्वचेसंबंधित प्रश्न असतात. ऑईली स्किनसंबंधित महिलांमध्ये अनेक गैरसमज आहेत.
ऑईली पदार्थ खाल्ल्याने स्किन तेलकट होते का? ऑईली स्किनवर कोणते प्रॉडक्ट्स लावावे? अशा प्रश्नांची उत्तरं हिंदुस्तान टाईम्स या वेबसाईटला माहिती देताना अकिहीच्या सह-संस्थापक तुलसी गोसाई यांनी दिली आहे. त्यांनी यातून ऑयली स्किनसंबंधित महिलांमध्ये असलेले गैरसमज सोडवण्याचा प्रयत्न केला आहे(Skincare myths and misconceptions you need to stop believing now for healthy and radiant skin).
तेलकट पदार्थ खाल्ल्याने चेहऱ्यावर मुरूम वाढतात का?
खरंतर सेबम नावाच्या पदार्थामुळे चेहऱ्यावर मुरूम तयार होतात. हे त्वचेद्वारे तयार केले जाते. मात्र, असे कोणतेही संशोधन यावर झालेले नाही की, तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर मुरूम तयार होतात. परंतु, वजन नक्कीच वाढू शकते.
केस वाढावेत म्हणून केसांना कांद्याचा रस चोपडताय? - ते धोक्याचं!कांद्याचा रस कुणी लावावा आणि कुणी..
तेलकट त्वचेला मॉइश्चरायजरची गरज नसते का?
तेलकट त्वचेसह इतर स्किन टाइप्सला मॉइश्चरायजरची आवश्यकता असते. मॉइश्चरायजर त्वचेला हायड्रेटेड आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. यासह चेहऱ्यावर नैसर्गिक ऑईल प्रोड्यूस करण्यास मदत करते. ज्यामुळे स्किन ग्लो - फ्रेश दिसते.
सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात वापरावे का?
सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात नसून, इतर ऋतूतही लावावे. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे स्किनला हानी पोहचू शकते. उन्हाळा असो किंवा पावसाळा, घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावून बाहेर पडावे.
स्किनकेअर प्रॉडक्ट्स खरेदी करताना नेहमी महागडे प्रॉडक्ट्स खरेदी करावे का?
महागडे प्रॉडक्ट्स इतर पर्यायांपेक्षा चांगले असतीलच असे नाही. आपल्या स्किनवर कोणते प्रॉडक्ट्स योग्यरित्या काम करतील, कोणत्या प्रॉडक्ट्समुळे आपल्या चेहऱ्याला फायदा होईल, हे पाहून प्रॉडक्ट्स खरेदी करा. व खरेदी करताना डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
रात्री झोपण्यापूर्वी लावा गुलाब पाणी, चेहऱ्यावर येईल गुलाबी चमक - सकाळी चेहरा बघून म्हणाल..
नैसर्गिक उपाय आपल्या चेहऱ्यासाठी चांगले असतात का?
नैसर्गिक उपाय आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतात. परंतु, आपल्या स्किनवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. काही नैसर्गिक उपाय स्किनकेअरसाठी मदत करतात तर, काही नाही.
नैसर्गिक स्किनकेअर उत्पादने नेहमीच सुरक्षित असतात का?
एखाद्या प्रॉडक्टवर जर ' नैसर्गिक ' म्हणून लेबल लावलेलं असे, तर गरजेचं नाही, ते आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरू शकते. काहींच्या स्किनवर नैसर्गिक घटकांमुळे ऍलर्जी होते. त्यामुळे प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्याचे ५ फायदे, चेहरा न धुता झोपले तर...
तेलकट त्वचा असणाऱ्यांनी काय खावं?
अनेकांचा असा गैरसमज आहे की तेलकट त्वचा असणाऱ्यांनी ऑईली फूड खाऊ नये. पण असे नाही. आपण आपल्या आहारात केळी, ब्रोकोली आणि लिंबूवर्गीय फळे यासारखे व्हिटॅमिन-समृद्ध पदार्थांचा समावेश करू शकता. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारू शकते.