Lokmat Sakhi >Beauty > शांत झोप आणि सुंदर व्हा ! ब्यूटी स्लिपचा घ्या निवांत फॉर्म्युला, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो चकटफू...

शांत झोप आणि सुंदर व्हा ! ब्यूटी स्लिपचा घ्या निवांत फॉर्म्युला, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो चकटफू...

Beauty Benefits of Sleep : झोपेचा आणि त्वचा रुक्ष कोरडी होण्याचा, काळ्या वर्तुळांचा संबंध असतोच. त्यासाठीच घ्या हा खास फॉर्म्युला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2023 01:36 PM2023-10-28T13:36:02+5:302023-10-28T13:54:35+5:30

Beauty Benefits of Sleep : झोपेचा आणि त्वचा रुक्ष कोरडी होण्याचा, काळ्या वर्तुळांचा संबंध असतोच. त्यासाठीच घ्या हा खास फॉर्म्युला...

Skincare Tips Beauty Sleep Is Real Know The Benefits of Beauty Sleep, Beauty Benefits of Sleep | शांत झोप आणि सुंदर व्हा ! ब्यूटी स्लिपचा घ्या निवांत फॉर्म्युला, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो चकटफू...

शांत झोप आणि सुंदर व्हा ! ब्यूटी स्लिपचा घ्या निवांत फॉर्म्युला, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो चकटफू...

चेहऱ्यावर येणारा कायमचा चमचमता ग्लो कुणाला नाही आवडणार. प्रत्येकाला आपली त्वचा नितळ, चमकदार आणि ग्लो करणारी हवी असते. आपली त्वचा चमकदार, मुलायम आणि सुंदर दिसण्यासाठी फक्त त्वचा स्वच्छ ठेवणे किंवा क्रिम्स लावणे एवढेच पुरेसे नसते. त्वचा सुंदर दिसण्यासाठी त्वचेची तितकीच काळजी घेणे देखील महत्वाचे असते. प्रत्येकाला आपली त्वचा खूप खास दिसावी असे कायम वाटत असते. यासाठी अनेकजणी दर महिन्याला पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंट्स करुन घेतात. काहीवेळा पार्लरला जाऊन महागड्या ट्रिटमेंट्स, क्रिम्स वापरून देखील त्वचेवर हवा तसा ग्लो येत नाही. यासोबतच त्वचेवर ग्लो (Sleep and Skin: The Benefits of Beauty Sleep) येण्यासाठी त्वचेची केवळ बाहेरुनच काळजी घेणे योग्य नसते. त्वचा कायम चमकदार व तजेलदार राहावी यासाठी आतून - बाहेरुन त्वचेची काळजी घ्यावी लागते(Does sleep improve facial glow?).

'झोप' (The Truth About Beauty Sleep) हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. झोपे दरम्यान शरीर, मन, ज्ञानेंद्रिये, मेंदू विश्रांती घेत असतात. योग्य वेळी पुरेशा प्रमाणांत झोप घेतली तर त्याचे अनेक चांगले फायदे आपल्या आरोग्याबरोबरच शरीरावर दिसून येतात. पुरेशा प्रमाणात घेतलेली झोप ही अनेक आजारांवर एक बेसिक उपचार आहे. योग्य प्रमाणात झोप घेतल्यास एकूणच शरीर व त्वचेवर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. त्वचेवर ग्लो येण्यासाठी आपण महागड्या क्रिम्स, ट्रिटमेंट्सचा वापर करण्यापेक्षा एक्स्पर्टसनी सांगितलेल्या (4 skin benefits of beauty sleep) 'ब्यूटी स्लीप' चा उपाय आजमावून पाहू शकतो(Beauty sleep and its benefits for your skin). 

झोप आणि त्वचेचा नेमका काय संबंध आहे ? 

डायरेक्टर ऑफ स्किन डेकोर आणि चीफ डर्मेटोलॉजिस्ट डॉ. मोनिका चहर यांच्या मते , "सध्या बहुतेक लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. यामागे अनेक कारणे आहेत, जसे की ऑफिसचे काम करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागे राहणे किंवा सोशल मिडीयावर वेळ घालवणे. बरेच लोक रात्रभर जागे राहण्यासाठी कॅफिनचे सेवन करतात. अशा प्रकारच्या जीवनशैलीचा वापर करणाऱ्यांना अनेकदा वेळेवर पुरेशी झोप मिळत नाही. याचा थेट परिणाम त्यांच्या त्वचेवर होतो. त्यामुळे तज्ज्ञ 'ब्युटी स्लीप'चा सल्ला देतात. तज्ज्ञांच्या मते, झोप आणि त्वचेचा खोलवर संबंध असतो. चांगली झोप न मिळाल्याने डोळ्यांच्या आजूबाजूची संवेदनशील त्वचा व डोळे यासंबंधींत अनेक लहान - मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. यासोबतच याचा आपल्या त्वचेवर नकारात्मक परिणाम देखील पहायला मिळतो. 

हिवाळ्यात केसांना तेल लावल्याने खरंच सर्दी - खोकला होतो ? तज्ज्ञ सांगतात केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत...

गरम पाण्याने आंघोळ करताना लक्षात ठेवा काही गोष्टी, नाहीतर त्वचाविकार लागतील मागे - गाठावा लागेल स्किन स्पेशालिस्ट...

चांगल्या झोपेचे त्वचेवर कोणते सकारात्मक परिणाम होतात ? 

१. त्वचा रिपेअर केली जाते :- डॉ. मोनिका सांगतात, आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा आपल्या शरीराचा व त्वचेचा रिपेअर मोड सुरु होतो. जेव्हा एखादी व्यक्ती गाढ झोपते तेव्हा त्वचा स्वतःच आपोआप रिपेअर होऊ लागते. ज्यामुळे त्वचेत नाविन्यता, तजेलदारपणा, फ्रेशनेस दिसून येतो. त्वचेमध्ये होणारी ही प्रक्रिया त्वचा सुधारण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. जर एखादी व्यक्ती रात्री झोपत नसेल तर त्याचे उलट परिणाम त्वचेवर दिसून येतात.

२. डार्क सर्कल कमी करण्यास मदत मिळते :- पुरेशी झोप न झाल्यास डोळ्यांसंबंधीचे अनेक आजार उद्भवतात. झोप चांगली न झाल्यामुळे डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, डोळे चुरचुरणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्या डोळ्यांच्या खाली असणाऱ्या संवेदनशील त्वचेखाली असलेल्या रक्तवाहिन्या, या पुरेशा झोपेअभावी विस्तारतात यामुळे डोळ्यांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय डोळ्यांखाली एक विशेष प्रकारचा द्रव साचतो, त्यामुळे डोळे सुजतात. याउलट जर एखाद्या व्यक्तीला पुरेशी झोप मिळत असेल तर कोणतीही समस्या निर्माण होत नाही. 

३. मुरूम व पुटकुळ्या कमी येतात :- मुरुम व पुरळ यांचा संबंध हार्मोनल बदलांशी असतो. अपुऱ्या झोपेमुळे देखील चेहऱ्यावर मुरुम किंवा डाग येऊ शकतात. असे होऊ नये म्हणून योग्य पोषक आहार व पुरेशी झोप घेणे गरजेचे असते. 

४. एजिंगच्या खुणा कमी करते :- रात्री चांगली झोप घेतल्याने आपल्या शरीरात कोलेजन तयार होते. हे एक महत्त्वाचे प्रथिन आहे, जे त्वचेला लवचिकता प्रदान करते. यासोबतच कमी झोपेमुळे शरीरात कोलेजन तयार होत नाही आणि वयाच्या आधी त्वचेवर सुरकुत्या व एजिंगच्या खुणा यांसारखी लक्षणे दिसू लागतात. 

काजळ जरुर लावा, पण हमखास होणारी १ चूक टाळा, नाहीतर डोळे व आजूबाजूची त्वचा होईल खराब...

'जेड रोलर' म्हणजे काय ? त्यानं चेहऱ्याला मसाज केला तर चेहऱ्याच्या सगळ्या समस्या गायब होतात, हे खरं आहे ?

ग्लोइंग त्वचेसाठी चांगली झोप नेमकी कशी घ्यावी ? (What is the best way to sleep for beauty?)

१. रोज किमान ७ ते ९ तासांची पुरेशी झोप घ्यावी. 
२. रोजच्या झोपेची एक वेळ सेट करा यामुळे अमुक एका वेळी शरीराला आराम घेण्याची तसेच झोपण्याची सवय लागेल. 
३. जर आपल्याला चमकदार त्वचा हवी असेल तर पाणी पिऊन आपले शरीर हायड्रेट ठेवा. 
४. आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश करा. यासाठी अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजयुक्त आहार घ्या. 
५. तणावापासून स्वतःला दूर ठेवा. स्ट्रेस हार्मोन्सचा त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो. तणाव कमी करण्यासाठी योग किंवा ध्यान करा.

Web Title: Skincare Tips Beauty Sleep Is Real Know The Benefits of Beauty Sleep, Beauty Benefits of Sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.