आपण सगळेच सुंदर दिसण्यासाठी मेकअप करतो. काही खास सण, समारंभ, प्रसंग असला की आपण आवर्जून मेकअप करतोच. सुंदर दिसण्यासाठी मेकअप करणे हे योग्य आहे परंतु नंतर तो मेकअप चेहेऱ्यावरुन काढणे देखील तितकेच महत्वाचे आहे. काहीवेळा आपण लेट नाईट पार्टी करुन आलो की बरेचदा आपण मेकअप काढायचा कंटाळा करतो. आपण रोज ऑफिसला जाताना सुद्धा किमान मेकअप करून जातोच, संध्याकाळी ऑफिसमधून दमून भागून आल्यावर मेकअप काढायला अळसपणा करतो. अशा परिस्थितीत आपण अनेकदा आळशी होतो आणि मेकअप चेहेऱ्यावर तसाच ठेवून झोपी जातो. आपण जेव्हा चेहेऱ्यावर मेकअप तसाच ठेवून झोपतो तेव्हा मात्र त्वचेचे अधिक नुकसान होते.
आपण जरी चेहेऱ्यावरील मेकअप काढला नाही तरी दुसऱ्या दिवशी मात्र आपल्याला आपल्या त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी लागते. यामुळे त्वचेचे झालेले नुकसान थोडेफार भरुन काढता येते. रात्रभर चेहेऱ्यावर मेकअप ठेवल्याने त्या मेकअप प्रॉडक्ट्स मधील हानिकारक केमिकल्स आपल्या त्वचेतील छिद्रांमध्ये अडकून बसतात. यामुळे त्वचेवर मुरूम, पुटकुळ्या किंवा त्वचेबाबत इतर समस्या उद्भवतात. खरंतर रात्री झोपण्यापूर्वीच मेकअप काढणे गरजेचे असते. परंतु जर आपण रात्री मेकअप काढायचे विसरलात तर दुसऱ्या दिवशी स्किनची काळजी कशी घ्यावी ते पाहूयात(SLEPT WITH YOUR MAKEUP ON? DAMAGE CONTROL TIPS FOR THE MORNING AFTER).
मेकअप काढायला विसरलात तर दुसऱ्या दिवशीचे स्किनकेअर रुटीन कसे असावे ?
१. चेहेऱ्यावरील मेकअप काढा :- जरी आपण चुकून रात्री मेकअप काढायला विसरला असाल, तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तुमच्या स्किनकेअर रुटीनची पहिली पायरी म्हणजे तुमचा मेकअप चेहऱ्यावरून काढून टाकणे. यासाठी आपला नियमित मेकअप रिमूव्हर वापरावा. जर तुमचे मेकअप रिमूव्हर संपले असेल तर आपण खोबरेल तेल वापरू शकता. नारळाचे तेल चेहऱ्यावरील मेकअप तर काढून टाकतेच पण नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझेशनचे कामही करते. इतकेच नाही तर नारळाच्या तेलाच्या मदतीने त्वचेचे झालेले नुकसान नियंत्रित करण्यातही मदत होते.
कोरफड म्हणजे उन्हाळ्यात वरदान, ७ प्रकारे कोरफड वापरा- उन्हामुळे होणारे त्रास होतील पटकन कमी...
२. चेहेऱ्याची स्वच्छता करा :- चेहऱ्यावरील मेकअप काढून टाकल्यानंतर, चेहेरा स्वच्छ करुन घ्यावा. चेहेरा स्वच्छ करत असताना तो दोन वेळा स्वच्छ धुवून क्लिन करावा. यामुळे तुमची त्वचा अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ होते. सर्वप्रथम, चेहेरा स्वच्छ करण्यासाठी ऑईल बेस्ड क्लिंजरचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावरील मेकअपचे कण स्वच्छ होण्यास मदत होते. यानंतर, तुम्ही फोमिंग क्लिन्झरचा वापर करावा. यामुळे त्वचेवरील घाण साफ होण्यास मदत होईल.
फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?
३. स्क्रबिंग करा :- जर तुमच्या त्वचेवर रात्रभर मेकअप असेल तर त्वचेच्या छिद्रांमध्ये मेकअप साचण्याची शक्यताही खूप वाढते. त्यामुळे तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी फक्त चेहेरा स्वच्छ करणे पुरेसे नाही . त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली घाण साफ करण्यासाठी चेहरा एक्सफोलिएट करणे आवश्यक असते. एक्सफोलिएटिंगमुळे त्वचेची छिद्रे साफ होण्यास मदत होईल. त्वचेला एक्सफोलिएट करताना ते हलक्या हातांनीच करावे जोरजोरात घासू नये.
आठवडभरात गायब होतील डोळ्याखालची काळी वर्तुळं, बघा घरगुती आय मास्कची जादू....
४. फेस मास्क लावा :- आता आपली त्वचा खोलवर स्वच्छ केल्यानंतर, त्वचेला कुलिंग करण्यासाठी कूलिंग फेस मास्क लावणे गरजेचे असते. काकडी किसून घ्यावी आणि त्यात दोन चमचे एलोवेरा जेल घालावे आणि हे मिक्स करुन चेहऱ्यावर आणि मानेवर लावावे. सुमारे १५ मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने चेहेरा धुवून घ्यावा.
५. मॉइश्चरायझर लावा :- फेस मास्क लावल्यानंतर त्वचेला हायड्रेशन करणे आवश्यक असते आणि त्यासाठी मॉइश्चरायझर लावावे. यासाठी त्वचेवर पुरेशा प्रमाणात मॉइश्चरायझर लावावे आणि हलक्या हातांनी मसाज करावा. यानंतर तुमच्या त्वचेला मोकळा श्वास घेण्यासाठी किमान एक दिवस त्वचेवर मेकअप न लावण्याचा प्रयत्न करावा.
डोळे कायम सुजलेले दिसतात, झोपेतून उठल्यासारखे? थंडगार चमच्याचा १ सोपा उपाय, सूज होईल कमी...