Join us  

चेहऱ्यावर फिरतात गोगलगायी! स्नेल फेशियचा हा नवा ट्रेंड पाहिला का, चक्क गोगलगाय करते फेशियल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2024 6:35 PM

Snail Facial Popular Skincare Treatment : Discover the Latest Beauty Trend The Snail Facial : Snails on the Face to Make You More Beautiful : स्नेल फेशियल, स्नेल म्युसिन तरुणाईमध्ये सध्या या ट्रेंडची इतकी चलती का आहे, काय आहे हा नेमका ट्रेंड ते पाहूयात....

'पी हळद आणि हो गोरी' या म्हणीच्या अर्थाप्रमाणेच एखाद्या गोष्टीचा रिझल्ट हा पटकन दिसून यावा असे सतत सगळ्यांनाच वाटते. खरंतर, हे अनेकींच्या बाबतीत होताना दिसत. आपली त्वचा सुंदर दिसावी म्हणून अनेकजणी सतत काही ना काही नवनवीन उपाय करत असतात. स्किन प्रॉब्लेम्स हे कमी अधिक प्रमाणात सगळ्यांनाच असतात. पण एखादा उपाय करुन पाहिल्यानंतर लगेचच त्याचा परिणाम त्वचेवर दिसून यावा अशी अपेक्षा असते. दिवसेंदिवस अनेक ब्यूटी ट्रेंड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक स्किन प्रॉब्लेम्सवर असंख्य प्रकारचे उपाय असतात. आपल्यापैकी अनेकजणी न चुकता हे ब्यूटी ट्रेंड्स फॉलो करताना दिसतात. सोशल मिडियावर रोज नवनवीन ब्यूटी ट्रेंड्स पाहायला मिळतात, त्यापैकी काही ट्रेंड्स बघून चक्क आश्चर्य वाटत तर कधी हे उपाय नकोसे वाटतात(Snails on the Face to Make You More Beautiful).

सध्या सोशल मिडियावर असाच एक ट्रेंड व्हायरल होताना दिसत आहे. हा ट्रेंड काय तर म्हणे 'स्नेल फेशियल'. फेशियलचे आजवर अनेक प्रकार आपण पाहिले  अनुभवले असतील पण सुंदर आणि चमचमत्या ग्लो साठी चक्क आपल्या चेहऱ्यावर गोगलगाय सोडल्या जातात. होय !गोगलगाय.... 'गोगलगाय अनं पोटात पाय' म्हणून हिणवल्या जाणाऱ्या या हळूबाई गोगलगायीचा (Snails on the Face to Make You More Beautiful) फेशियलसाठी असा उपयोग होऊ शकतो असा विचार देखील कुणी केला नसेल. स्नेल फेशियल, स्नेल म्युसिन असे अनेक प्रकार सध्या व्हायरल होताना दिसत आहे. हा नक्की फेशियलचा कोणता नवीन प्रकार आहे आणि तरुणाईमध्ये सध्या या ट्रेंडची इतकी चलती का आहे, काय आहे हा नेमका ट्रेंड ते पाहूयात(Discover the Latest Beauty Trend The Snail Facial). 

स्नेल फेशियलमध्ये चेहऱ्यावर जिवंत गोगलगायीचा वापर केला जातो. यात चक्क फेशियल करताना आपल्या चेहऱ्यावर जिवंत गोगलगायी सोडल्या जातात. यात गोगलगायी आपल्या स्किनवर पुढे सरकत असताना त्यांचे म्युसिन मागे सोडून पुढे जातात. गोगलगाईला सरपटत चालण्यासाठी मदत मिळावी म्हणून त्या आपल्या शरीरातून एक प्रकारचा चिकट, जाड, पारदर्शक द्रव पदार्थ सोडतात. ज्याच्या मदतीने त्या अगदी सहजपणे चालू शकतात. हाच तो चिकट पदार्थ ज्याला श्लेष्मा म्हणजेच म्युसिन असे म्हटले जाते. हेच म्युसिन सध्याच्या अनेक स्किन केअर प्रॉडक्ट्समध्ये वापरले जाते.

रात्री झोपताना चेहऱ्यावर ‘हा’ घरगुती स्लिपिंग मास्क लावा, सकाळी चेहरा इतका चमकेल की पाहा तेज!

गोगलगायी जो चिकट पदार्थ सोडतात, त्याचं सिरम सध्या अनेक तरुण मुली लावतात. हे फार महागडेसुद्धा असते. हजारभर रुपयांना लहानशी बाटली येतेत. तरुण मुलींमध्ये तर त्याची फार मोठ्या प्रमाणात क्रेझ असल्याचे पाहायला मिळते आहे. याचा वापर केल्याने त्वचा अत्यंत तेजस्वी आणि एकसमान चकचकीत, त्वचेवर कायम टिकणारा ग्लो येतो असे म्हणतात.  

गोगलगाय आपल्या शरीरातून जो स्त्राव सोडते हा स्त्राव आपल्या त्वचेसाठी अनेक फायदेशीर घटकांनीयुक्त असा असतो. गोगलगायीच्या शरीरातून येणारे हे स्नेल म्युसिन त्वचेच्या विविध समस्यांवर उपचार करते. कोरडी त्वचा, त्वचेवरील बारीक रेषा - सुरकुत्या, स्ट्रेच मार्क्स, पिंपल्स, एजिंग स्पॉट्स, बर्न मार्क्स, काळे डाग, रेझर बंप अशा अनेक स्किन प्रॉब्लेम्सवर फायदेशीर ठरते. 

तुरटीचा इवलासा खडा त्वचेवर अशी करेल जादू, दिवाळीत त्वचा चमकेल-नव्या दिसाल तुम्ही!

आजकाल स्नेल म्युसिन सामान्यतः विविध स्किनकेअर प्रॉडक्ट्समध्ये असल्याचे दिसते. सीरम, क्रिम आणि फेसमास्क अशी म्युसिनचा वापर तयार करून केलेले ब्यूटी प्रॉडक्ट्स तुमच्या नियमित स्किनकेअर रूटीनमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात. आपली स्किन सुंदर दिसावी यासाठी नेमके काय काय उपाय केले जातील आणि कोणता आगळावेगळा ट्रेंड फॉलो केला जाईल हे सांगणे अवघडच आहे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी