Lokmat Sakhi >Beauty > रोज सकाळी मनुका भिजवलेलं पाणी पिण्याचे फायदे, व्हाल फिट - दिसतील ५ आरोग्यदायी बदल

रोज सकाळी मनुका भिजवलेलं पाणी पिण्याचे फायदे, व्हाल फिट - दिसतील ५ आरोग्यदायी बदल

Soaked Manuka Benefits : महिनाभर मनुक्याचं पाणी प्यायल्यानं शरीराता ५ बदल दिसायला सुरूवात होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 01:02 PM2022-12-09T13:02:30+5:302022-12-09T16:37:49+5:30

Soaked Manuka Benefits : महिनाभर मनुक्याचं पाणी प्यायल्यानं शरीराता ५ बदल दिसायला सुरूवात होईल.

Soaked Manuka Benefits : Munakka water benefits | रोज सकाळी मनुका भिजवलेलं पाणी पिण्याचे फायदे, व्हाल फिट - दिसतील ५ आरोग्यदायी बदल

रोज सकाळी मनुका भिजवलेलं पाणी पिण्याचे फायदे, व्हाल फिट - दिसतील ५ आरोग्यदायी बदल

थंडीच्या दिवसात थकवा, अशक्तपणा जाणवणं खूपच कॉमन झालंय. मनुक्यांमध्ये पोषक तत्व आणि चांगल्या कॅलरीज असतात. रोज मनुके खाल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. (Munakka water benefits) महिनाभर मनुक्याचं पाणी प्यायल्यानं शरीराताल ५ बदल दिसायला सुरूवात होईल पण त्याचे पोषण मुल्य आणि फायद्यांबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. याबाबत डायटिशियन मनप्रीत यांनी इंस्टाग्रामवर अधिक माहिती दिली आहे. (Soaked Manuka Benefits) 

मनुक्यांचे पोषण मुल्य

१) मनुक्यांमध्ये फायबर्स, मिनरल्स असतात. याशिवाय यात  फायटोकेमेकि्लस जसं की फ्लेवोनोइड्स, रेस्वेराट्रोल, एपिकेचिन, फायटोएस्ट्रोज आणि हायड्रेसिनेमिक एसिड असते.  त्यात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. यात अँटी-बॅक्टेरियल, भूक नियंत्रित करणारे, दाहक-विरोधी गुणधर्म आहेत.

२)  मनुक्यांमध्ये आयर्न असल्यानं एनिमियापासून लढण्यास मदत मिळेत.  यात व्हिटामीन बी कॉम्प्लेक्स असतात ज्यामुळे लाल रक्त पेशींचे उत्पादन वाढण्यास मदत होते. 

३) मनुकामध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटिऑक्सिडंट असतात जे चमकदार आणि निरोगी त्वचा राखण्यास मदत करतात. त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म देखील आहेत जे बॅक्टेरियाच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात आणि मुरुम टाळू शकतात.

४) मनुक्यांचे पाणी प्यायल्याने आपल्याला व्हिटॅमिन-सी मिळते, ज्यामुळे केस चमकदार आणि दाट होतात. मनुक्यांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असू शकतात जे कोंडा घालवण्यास प्रभावी ठरू शकतात.

५) वजन वाढवण्याचा नैसर्गिक मार्ग हवा असेल तर मनुक्यांचे पाणी वापरा. रोज दुधासोबत मनुके खाल्ल्याने तुमची पचनशक्ती वाढतेच पण वजनही नियंत्रणात राहते. 

मनुक्यांचे पाणी कसं बनवायचं

मनुक्याचं पाणी बनवणं खूपच सोपं आहे. ४ ते ५ मनुके एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. तुम्हाला वाटल्यास तुम्ही पाणी प्यायल्यानंतर भिजवलेले मनुकेसुद्धा खाऊ शकता. 

Web Title: Soaked Manuka Benefits : Munakka water benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.