नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला (Sobhita Dhulipala) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. चित्रपटांपासून वेब सीरिजपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांना वेड लावणारी शोभिता धुलिपाला आपल्या फिटनेस आणि सौंदर्याची देखील तितकची काळजी घेताना दिसून येते. शोभिता धुलिपाला हिच्या सौंदर्याबद्दल बोलायचं झालं तर ती बहुतेक घरगुती उपाय करण्यावर अधिक भर देताना दिसते. शोभिता धुलिपाला ही एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.(From raw milk to coconut oil: Secrets behind Sobhita Dhulipala's glowing skin revealed)
अभिनेत्री शोभिता धूलिपाला ही तिच्या उत्तम अभिनयामुळे सगळीकडे प्रसिद्ध आहे. तिच्या निखळ आणि चमकदार त्वचेचे सगळीकडे अनेक फॅन आहेत. शोभिता आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी नेमकं काय करते? असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना. शोभिता तिच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करते. त्वचेच्या वेगवेगळ्या भागांची काळजी घेण्यासाठी ती घरगुती उपाय करताना दिसते. शोभिताचे ब्यूटी सिक्रेटस नेमके काय आहे ते पाहूयात(Sobhita Dhulipala shares her SECRET beauty and makeup tips).
शोभिताचे ब्यूटी सिक्रेटस काय आहेत ते पाहूयात ?
१. बेसनाचा वापर करते :- एका मुलाखतीत, शोभिताने स्वतः सांगितले की ती तिच्या त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी बेसनाचा वापर करते. बेसनाचा वापर केल्याने त्वचेतील घाण साफ करण्यास मदत मिळते आणि त्वचेवर ग्लो आणते. यासोबतच शोभिता वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि त्या फळांच्या साली आणि रस यांचा वापर त्वचेला मसाज करण्यासाठी करते.
२. कच्चे दूध :- शोभिताने सांगितले की ती तिच्या त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करते. कच्चे दूध त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासाठी फायदेशीर असते.
३. लिप बाम ऐवजी तेलाचा वापर :- शोभिता तिच्या ओठांच्या सौंदर्यात अधिक भर पाढण्यासाठी लिप बाम ऐवजी तेलाचा वापर करते. महागड्या लिप बाम ऐवजी ती खोबरेल तेल वापरणे अधिक पसंत करते. ओठांवर जर भेगा पडल्या असतील, ओठ सुकले असतील तर आपण ओठांसाठी खोबरेल तेलाचा वापर करु शकतो.
४. आय ब्रो साठी तेलाचा वापर :- शोभिता ओठांप्रमाणेच सुंदर, घनदाट आय ब्रो साठी एरंडेल तेलाचा वापर करते. भुवयांचे सौंदर्य जपण्यासाठी ती रात्री झोपण्यापूर्वी भुवयांवर एरंडेल तेलाने मसाज करते.
५. झोपण्यापूर्वी करा हे एक काम :- रात्री कितीही उशीर झाला तरीही झोपण्यापूर्वी त्वचेवरील संपूर्ण मेकअप रिमूव्ह करून झोपण्याचा सल्ला तिने दिला आहे. तसेच झोपण्यापूर्वी ती स्वच्छ आंघोळ करून मगच झोपते. जर तुम्हाला तुमची स्किन हेल्दी हवी असेल तर मेकअप रिमुव्ह कार्याला विसरु नका अशी महत्वाची टीप शोभिता देते.
१ चमचा अळशी - १ चमचा तांदुळाचे पीठ, उपाय साधा- चेहऱ्यावरून तुमचं वय ओळखता येणार नाही...