Join us  

चमकदार नितळ त्वचेसाठी सोहा अली खान करते हे ३ उपाय; पाहा आवडतात का..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2022 5:17 PM

अभिनेत्रींची त्वचा नितळ असण्यामागचं सत्य, पाहा काय आहे सोहा अली खानचं स्कीन रुटीन

ठळक मुद्देकोणत्याही एका गोष्टीमुळे तुम्हाला सौंदर्य मिळत नाही तर त्यासाठी एकावेळी सर्व मार्गाने प्रयत्न करावे लागतात असे सोहा सांगतेब्युटी प्रॉडक्ट आणि ट्रीटमेंटबरोबरच तुमचा आहार आणि व्यायामही चांगला असायला हवा

अभिनेत्रींची त्वचा एकदम उजळ आणि नितळ असते. आपलीही त्वचा त्यांच्याप्रमाणे ग्लोईंग असावी असं आपल्याला नेहमी वाटतं. पण इतक्या छान त्वचेसाठी त्या काय काय करतात हे मात्र आपल्याला माहित नसतं. प्रसिद्ध अभिनेत्री सोहा अली खान हीची त्वचा अतिशय नितळ असल्याचे आपण नेहमी पाहतो पण यामागील सिक्रेट काय आहे हे आपल्याला क्वचितच माहित असेल. तर पाहूया नितळ आणि ग्लोईंग त्वचेसाठी सोहा कोणकोणते उपाय वापरते. 

(Image : Google)

१. क्लिंझिंग, टोनिंग आणि मॉईश्चरायजिंग या ३ स्टेप टेक्निकचा वापर सोहा आपली त्वचा ग्लोईंग ठेवण्यासाठी करते. रोज रात्री झोपताना या गोष्टींसाठी ती ६ मिनीटे आवर्जून राखून ठेवते. तसंच आपल्या त्वचेचे सौंदर्य हे आपण काय खातो यावरही अवलंबून असल्याचे ती म्हणते. दररोज एक मूठ बदाम खाणे त्वचेसाठी फायदेशीर असल्याचे सोहा सांगते. 

२. जास्तीत जास्त तरुण दिसण्यासाठी किंवा वाढलेले वय चेहऱ्यावर दिसू नये यासाठी काही घरगुती उपाय करत असल्याचे सोहा सांगते. सोहा म्हणते, “आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध असणारे बदाम, मध, हळद यांसारख्या पदार्थांचा मी चेहऱ्यासाठी वापर करते. तसंच आपण उत्तम आरोग्यासाठी जे व्हिटॅमिन्स आणि आवश्यक घटक आहारात घेतो ते त्वचेलाही लावायला हवेत. काकडीपासून ते पपईपर्यंत अनेक फळे सोहा फेस मास्क म्हणून वापरते. याबरोबरच योगा आणि व्यायाम या गोष्टीही त्वचा नितळ होण्यासाठी अतिशय गरजेच्या असतात. कोणत्याही एका गोष्टीमुळे तुम्हाला सौंदर्य मिळत नाही तर त्यासाठी एकावेळी सर्व मार्गाने प्रयत्न करावे लागतात.” 

(Image : Google)

३. आईकडून आपल्याला मिळालेले ब्यूटी टेक्निक आता आपण आपली मुलगी इनायाकडे पास करत असल्याचे सांगताना सोहा म्हणते. आईकडून मला मेकअपच्या बाबतीत म्हणावे असे काही सिक्रेट मिळाले असे नाही. पण डोळे मोठे दिसण्यासाठी डोळ्यांच्या आतल्या बाजूने आपण पांढरा आयलायनल लावू शकतो असे तिने मला सांगितलेले. मला ही गोष्ट सांगणारी आई ही पहिली व्यक्ती होती. पण नंतर मला हे कळून चुकले की यामध्ये कोणतेही सिक्रेट नसून अनेकांना ते आधीच माहित आहे. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसोहा अली खान