सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. हेअर डायचा वापर लोक पांढरे केस काळे करण्यासाठी करतात. पण डायचा इफेक्ट तात्पुरता दिसून येतो. नंतर पुन्हा केस तसेच दिसतात. केमिकल्सयुक्त उत्पादनांच्या वापरामुळे केसांचे गळणंसुद्धा वाढतं. (Natural Home Remedies For Grey Hair) पार्लर ट्रिटमेंटपेक्षा काही सोपे घरगुती उपाय तुमचं अधिक सोपं करू शकतात. नॅच्युरल हेअर डाय घरच्याघरी तयार करून तुम्ही केस काळे करू शकता. (Natural Dye For White Hair)
केस नैसर्गिकरित्या काळे करण्याचे उपाय (Effective Home Remedies For Grey Hair)
काळा चहा
हा उपाय करण्यासाठी १ कप पाण्यात जवळपास, २ चमचे चहा पावडर घाला. व्यवस्थित उकळून थंड होण्यासाठी ठेवा. यानंतर, केसांना चांगले लावा आणि सुमारे 1 तास सोडा मग केस धुवा. त्यानंतर तुम्हाला शॅम्पूने केस धुण्याची गरज नाही. जर तुम्ही ही रेसिपी सुमारे 15 दिवस वापरून पाहिली तर तुम्हाला उत्तम परिणाम दिसून येतील.
लिंबू आणि नारळाचं तेल
1 चमचा लिंबाचा रस सुमारे 2 चमचे खोबरेल तेलात मिसळा. नंतर हे मिश्रण टाळूवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यानंतर, हा पॅक अर्धा ते 1 तास सोडा आणि नंतर तुमचे केस धुवा. जर तुम्ही हा उपाय आठवड्यातून 2 वेळा करून पाहिला तर तुमचे केस हळूहळू काळे होऊ लागतात.
आवळा
यासाठी एका पॅनमध्ये आवळा आणि खोबरेल तेलाचे किमान 6-7 तुकडे उकळवा. मग तुम्ही त्यात १ चमचा मेथीचे दाणे घालून शिजवा. यानंतर ते थंड करा आणि मग गाळून घ्या आणि केसांना चांगले लावा आणि आपल्या टाळूची मालिश करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पूने केस धुवा. आवळा आणि मेथीच्या वापरामुळे तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होईल.