केसांना काळे करण्यासाठी अनेकदा मेहेंदीचा वापर केला जातो. पण मेहेंदी लावली की तिचा कलर तात्पुरता राहतो. अशी अनेकांची तक्रार असते. (Solution For Grey Hairs) हेअर डायच्या बाबतीतही तसंच होतं. पिकलेले केस लपवण्यासाठी हेअर डाय लावला जातो पण हेअर डाय लावल्यानंतर १५ ते २० दिवसांत पुन्हा केस पांढरे दिसून येतात. अशावेळी फक्त मेहेंदी न लावता तुम्ही मेहेंदीमध्ये काही पदार्थ मिसळले तर केसांचा नैसर्गिक रंग महिनोंमहिने टिकून राहील. (How to Color Hairs)
जर तुम्हाला दीर्घकाळ केस काळे ठेवायचे असतील तर मेहेंदीत एक चमचा हळद, मोहोरीचे तेल, मेथी पावडर आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा. (Natural Ingredients To Mix With Hair Henna Powder) जेव्हाही तुम्ही केसांना मेहेंदी लावणार असाल तर तेव्हा ही पेस्ट केसांमध्ये मिसळा. या उपायाने केस लांबसडक आणि काळे राहण्यास मदत होईल. (How to Colour Hair at Home Naturally)
1) जर तुमचे केस तेलकट असतील तर ऑर्गेनिक मेहेंदी पाण्यात मिसळून पेस्ट बनवून ५ मिनिटांसाठी केसांना लावून ठेवा नंतर थंड केस थंड पाण्याने केस धुवा. यामुळे केसांचा चिकटपणा दूर होईल आणि केसांना बाऊंसी लूक येईल.
घरी असो किंवा प्रवासात रोज खा मूठभर फुटाणे, ५ फायदे; मिळेल भरपूर प्रोटीन-पचन सुधारेल
2) पांढरे केस आणि केसांच्या इतर समस्यांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही आवळा आणि मेथीच्या बियांच्या हेअर मास्कचा वापर करू शकता. यासाठी सगळ्यात आधी आवळा पावडर वाटून घ्या नंतर त्यात राईचे तेल किंवा इतर आयुर्वेदीक तेल मिसळून मेथीच्या बिया घालून व्यवस्थित शिजवा. हे मिश्रण थंड करून घ्या त्यानंतर केसांना अप्लाय करा. २० ते २५ मिनिटं तसंच लावून ठेवा.
3) केळी सुद्धा केसांना काळे बनवण्यास लाभदायक ठरते. सगळ्यात आधी पिकलेली केळी घेऊन व्यवस्थित मॅश करा आणि याची पेस्ट बनवून घ्या. त्यानंतर यात २ ते ३ चमचे मेहेंदी पावडर मिसळा याची पेस्ट बनवून घ्या आणि कमीत कमी १० ते १५ मिनिटांसाठी केसांवर लावून ठेवा. त्यानंतर २ ते ३ वेळा केस स्वच्छ धुवा.