वाढते प्रदुषण, जीवनशैलीत झालेला बदल, व्यायामाचा अभाव, हेअर डाय, हेअर कलर किंवा शाम्पूचा अतिवापर यामुळे आता केस पांढरे होण्याची समस्या प्रचंड वाढली आहे. १० पैकी ६ लोक केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येने हैराण आहेत. म्हणूनच जीवनशैलीत आणि आहार- विहारात काही बदल करणे गरजेचे आहे. काही साधे- सोपे उपाय करून पाहिले, तर नक्कीच ही समस्या दूर होऊ शकते.
का होतात केस पांढरे ?१. अकाली केस पांढरे होण्यासाठी अनुवंशिकताही कारणीभूत ठरते. २. शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता असल्यास केस पांढरे होऊ लागतात.३. प्रोटीन, लोह, विटामिन बी १२ पुरविणारे अन्नपदार्थ कमी प्रमाणात खाल्ल्याने केसांचे पोषण होत नाही.४. सतत टेंशनमध्ये असणे. डिप्रेशनमध्ये जाणे५. स्ट्रेटनिंग, कर्ल, हेअर कलर, हेअर डाय, शाम्पू यांचा प्रमाणाबाहेर वापर करणे.६. मोठा आजार किंवा ॲण्टीबायोटिकचे सेवन७. थायरॉईड८. कोणतेही व्यसन असणे.९. वारंवार प्रदुषित हवेत जाणे किंवा दुषित हवेत काम करावे लागणे. वारंवार कडक उन्हात जावे लागणे.
केस अकाली पांढरे होणं थांबविण्यासाठी करून बघा हे उपाय१. खोबरेल तेलात भरपूर कढीपत्ता घाला आणि तेल चांगले उकळू द्या. यानंतर थंड झालेले तेल बरणीत भरून ठेवा आणि आठवड्यातून दाेनदा केसांच्या मुळांना लावून मसाज करा. २. खोबरेल तेलामध्ये मेहंदीच्या पानांचे बारीक बारीक तुकडे करून टाका. या तेलाला चांगली उकळी येऊ द्या. तेलाचा रंग बदलतो आहे, असे लक्षात आले की गॅस बंद करा. हे तेल आठवड्यातून दोन- तीन वेळेस केसांच्या मुळाशी लावून मसाज करा. ३. हेअर डायचा किंवा हेअर कलरचा अतिरिक्त वापर करणे टाळा. याऐवजी केसांना मेहंदी लावा.
४. एक मध्यम आकाराचा कांदा किसून त्याचा रस काढा. यामध्ये अर्धे लिंबू पिळा. हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावा आणि एखाद्या तासाने केस धुवून टाका.५. केसांच्या मुळाशी कच्चे दूध लावल्यानेही चांगला परिणाम दिसून येतो. आठवड्यातून दोनदा हा उपाय करून पहा. कच्चे दूध लावल्यानंतर एक- दिड तासाने केस धुवा.६. साजूक तुपाने आठवड्यातून एकदा केसांच्या मुळाशी मसाज केल्यानेही चांगला परिणाम दिसून येतो. केस अकाली पांढरे होणे तर थांबतेच पण केसांचे गळणेही कमी होते आणि चांगली चमक येते. ७. पाण्यामध्ये दोन चमचे चहा, दोन चमचे कॉफी टाकावी आणि ८ ते १० मिनिटांसाठी पाणी उकळू द्यावे. जेवढे पाणी घेतले असेल, त्याच्या अर्धे झाले की गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे. हे पाणी केसांना लावून ठेवावे आणि एखाद्या तासानंतर केस धुवावे.
८. अद्रकाचा रस आणि कच्चे दूध यांचे मिश्रण केसांना लावल्यानेही केस पांढरे हाेणे कमी होते. अर्धा तास हे मिश्रण केसांना लावून ठेवावे आणि त्यानंतर शाम्पू करून केस धुवून टाकावे.९. आवळ्याचे लहान लहान तुकडे किंवा आवळ्याचा किस खोबरेल तेलात टाकून उकळू द्यावे. या तेलातच एक टेबल स्पून मेहंदीची पावडरही टाकावी. हे तेल केसांच्या मुळाशी लावावे आणि एक- दिड तासाने केस धुवून टाकावेत.
१०. कच्च्या पपईची पेस्टही केसांसाठी फायदेशीर ठरते. अर्धा तास ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावून ठेवावी आणि त्यानंतर केस धुवून टाकावेत.११. आवळा ज्युस, बदाम तेल आणि लिंबू रस एकत्र करून केसांच्या मुळाशी लावल्यास केस पांढरे होत नाहीत.