Join us  

Solutions For Cracked Heels: उष्णतेमुळे तळपायाची आग होते, भेगा पडल्या, रखरखीत झाले? करा 4 उपाय, त्रास होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 5:00 PM

Skin Care In Summer: हिवाळ्यात जसे पाय भेगाळतात, तसाच त्रास उन्हाळ्यात (summer) अनेक जणांना होतो. कोरड्या, रखरखीत तळपायांची आगही होते खूप.. त्यासाठीच हे ३ घरगुती उपाय..(home remedies for cracked heels)

ठळक मुद्देहिवाळ्यात भेगाळलेले तळपाय झाकून टाकण्यासाठी आपण निदान सॉक्स तरी घालू शकतो. पण उन्हाळ्यात मात्र त्याचीही सोय नसते.

उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढते. ही उष्णता (heat) तळपायांच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर फेकली जाते. त्यामुळे ज्यांना उष्णतेचा खूप त्रास होतो, त्यांच्या तळपायांचीही यादिवसांत खूप आग होते. तळपाय  कोरडे पडतात आणि तिथली कातडी सोलल्यासारखी होते. काही जणांच्या तळपायाला तर मोठमोठ्या भेगा (cracked heels) पडतात. या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास तर होतोच, पण दुसरी एक गोष्ट म्हणजे आपले तळपाय इतके घाण दिसू लागतात की चारचौघांत दाखविण्याचीही लाज वाटते.

 

शिवाय हिवाळ्यात भेगाळलेले तळपाय झाकून टाकण्यासाठी आपण निदान सॉक्स तरी घालू शकतो. पण उन्हाळ्यात मात्र त्याचीही सोय नसते. त्यामुळेच हा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय नक्की करून बघा. उष्णतेचा त्रासही कमी होईल, पायांची आग जळजळ थांबेल आणि तळपायही मृदू, मुलायम होतील. 

 

उष्णतेमुळे तळपायांना भेगा पडल्यास..१. काशाच्या वाटीने मसाजतांबे आणि जस्त यांच्यापासून बनलेला मिश्र धातू म्हणजे कांस्य. या धातूपासून तयार झालेल्या वाटीला बोली भाषेत काशची वाटी म्हणण्यात येते. या वाटीने तळपायांची मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होते आणि पायांना तसेच संपूर्ण शरीरालाही आराम पडतो. अशा पद्धतीने मसाज करण्यासाठी तळपायांना आधी तिळाचे तेल लावा. तिळाचे तेल नसल्यास खोबरेल तेलही चालेल. तेल लावल्यानंतर वाटीचा खालचा भाग तळपायांवर घासा. ५ ते १० मिनिटे मसाज करा. रात्री झोपताना हा उपाय करा कारण त्यानंतर तळपायांना धुळ लागू नये.

 

२. मध आणि हळदमध आणि हळद या दोन्ही गोष्टींमध्ये ॲण्टी बॅक्टेरियल आणि ॲण्टी फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे तळपायांचा त्रास कमी करण्यासाठी या दोन्हींचा एकत्रित उपयोग करू शकता. हा उपाय आंघोळीच्या आधी करा. यासाठी मध, हळद आणि खोबरेल तेल हे तिन्ही पदार्थ समप्रमाणात घ्या. ते व्यवस्थित एकत्रित करा आणि त्याने तळपायांना ५ ते १० मिनिटे मसाज करा. अर्धा तासाने आंघोळ करा. पायाला मध- हळद लावलेली असताना धुळीत जाणे टाळा.

 

३. आंघोळीनंतर करा हे उपाय आंघोळीनंतर पाय ओलेच असतात. आंघोळ झाली की लगेचच दररोज ओलसर तळपाय दगडाने (pumice stone) घासा. यामुळे पायांवरील डेडस्किन निघून जाईल. यानंतर पाय पुसून कोरडे करा आणि त्यावर व्हॅसलिन किंवा माॅईश्चरायझर लावा. नंतर घराबाहेर पडावं लागत असेल तर हा उपाय रात्री करा. कारण माॅईश्चरायझर लावल्यावर धुळीत जाणे टाळावे. 

photo credit- google

४. तळपायांना मेहेंदी लावामेहेंदी अंगातील उष्णता कमी करण्यासाठी खूप मदत करते. उष्णतेमुळे पायांची जळजळ होत असल्यास तळपायाला मेहेंदी लावा. यानंतर दोन ते तीन तासांनी पाय धुवून टाका. तळपायांना थंड आणि शांत वाटेल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसमर स्पेशल