Join us  

भरीव, दाट पापण्या व भुवयांसाठी सोनम सांगते एक राज की बात, १ घरगुती उपाय... भुवया पापण्या होतील दाट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2023 6:24 PM

Sonam Kapoor Ahuja has the most interesting beauty hack for coconut oil : जेव्हा स्किन केअरचा प्रश्न येतो तेव्हा सोनम घरगुती पारंपरिक उपाय करण्यावर जास्त भर देते.

नारळाचे तेल म्हणजेच खोबरेल तेल याच तेलाचा वापर सर्वसामान्य घरांमध्ये केला जातो. खोबरेल तेलामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. खरंतर पूर्वीच्या काळापासून नारळाच्या तेलाचा वापर त्वचेसाठी व त्याचबरोबर केसांच्या मजबुतीसाठी केला जातो. या तेलामध्ये अनेक औषधी गुणधर्मांचा समावेश असून ते विविध सौंदर्यप्रसाधनांमध्ये आणि हेअरकेअर प्रॉडक्ट्समध्ये वापरले जाते. खोबरेल तेलाचा योग्य प्रकारे वापर केल्यास तुमच्या सौंदर्यात अधिकच भर पडू शकते. 

सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर बरेचदा सोशल मीडियावरुन तिच्या चाहत्त्यांसाठी तिचे स्किन आणि हेअर केअर रुटीनबद्दलचे व्हिडीओ शेअर करत असते. सोनम कपूरने तिच्या सौदर्यांचे रहस्य चाहत्यांना सांगितले आहे. सोनम वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या प्रॉडक्स्टचा वापर तर करतेच. परंतु जेव्हा प्रश्न स्किन केअरचा येतो तेव्हा सोनम घरगुती पारंपरिक उपाय करण्यावर जास्त भर देते. एका मुलाखती दरम्यान सोनमने सौंदर्यासाठी खोबरेल तेलाचा वापर कसा करावा यासंदर्भात सांगितले आहे(Sonam Kapoor Ahuja has the most interesting beauty hack for coconut oil).     

सोनम कपूर खोबरेल तेलाचा वापर नेमका कसा करते ?

सोनम कपूरने एका मुलाखती दरम्यान, ती तिच्या स्किनकेअर रुटीनमध्ये खोबरेल तेलाचा आवर्जून समावेश करत असल्याचे सांगितले. या मुलाखतीमध्ये सोनमने खोबरेल तेल वापरण्याचे फायदे देखील सांगितले आहेत. सोनम आपल्या डेली रुटीन स्किनकेअरमध्ये खोबरेल तेलाचा वापर न चुकता करते. सोनम आपल्या भुवयांना व पापण्यांना खोबरेल तेलाने मालिश करते. आपल्या भुवया व पापण्या जाड, दाट, भरीव असाव्यात अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. आपल्या भुवया व पापण्यांचे केस जाड, भरीव दिसावेत म्हणून आपण पार्लरमध्ये जाऊन अनेक महागड्या ट्रिटमेंट्सवर पैसे खर्च करतो. परंतु सोनम भुवया व पापण्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी खोबरेल तेल वापरण्याचा सल्ला देताना दिसते.

सकाळी उठल्या उठल्या चेहरा भप्प सुजलेला दिसतो? भाग्यश्री सांगते त्यावर उपाय...

भुवया आणि पापण्यांप्रमाणेच सोनम ओठांच्या सौंदर्यासाठी देखील खोबरेल तेल वापरण्यास सांगते. लिपस्टिक लावण्याआधी प्री - लिपस्टिक बाम म्हणून ओठांवर खोबरेल तेल लावावे. लिपस्टिक बराच काळ आपल्या ओठांवर असते तसेच लिप्स्टीकमध्ये असणाऱ्या इतर केमिकल्समुळे आपले ओठ काळे पडू शकतात. असे होऊ नये म्हणून लिपस्टिक लावण्याआधी ओठांवर हलकेच बोटांनी खोबरेल तेल लावून घ्यावे. तसेच खोबरेल तेल ओठांसाठी वापरल्यामुळे दिवसभर ओठांना लावलेली लिपस्टिक काढून टाकताना देखील ती सहज ओठांवरुन निघते.

'रिव्हर्स हेअर वॉशिंग' केस धुण्याची नवी पद्धत, केस गळती थांबून केस होतील चमकदार....

सौंदर्य खुलून येण्यासाठी खोबरेल तेलाचा असा वापर करावा :-   

१. खोबरेल तेलाने चेहरा उजळण्यास मदत होते. यासाठी खोबरेल तेल आणि मध समप्रमाणात घेऊन त्याचे फेसपॅक तयार करावे. हे फेसपॅक चेहऱ्याला लावावे. नैसर्गिक फेसपॅकमुळे चेहरा उजळतो.

२. सतत आपण केसांवर केमिकलयुक्त शॅम्पू, कंडिशनरचा मारा करत असतो. यामुळे केसांचे आरोग्य बिघडते. केसगळतीचे प्रमाण वाढते. तुम्ही देखील अशा समस्येचा सामना करत असाल तर आठवड्यातून एकदा खोबरेल तेलाने केसांना मसाज करावा. यामुळे केसगळतीचे प्रमाण कमी होते आणि कोंड्याची समस्या देखील दूर होते.

३. खोबरेल तेल हे उत्तम मेकअप रिमूव्हर म्हणून काम करते. मेकअप काढण्यासाठी आपण बऱ्याचदा बाजारात मिळणारे वेगवेगळे रसायनयुक्त रिमूव्हर विकत घेतो. पण त्याऐवजी खोबरेल तेलाने मेकअप काढला तर त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नाही.

४. डोळ्याखाली खोबरेल तेलाने दररोज मसाज केल्यास डोळ्याखाली सुरकुत्या पडत नाही. डोळ्याखाली असलेली काळी वर्तुळेही निघून जातात.

५. जर ओठ सतत ड्राय होत असतील किंवा ओठांची सालपट निघत असतील तर ओठांवर खाेबरेल तेल लावा. यामुळे ओठ मऊ होतील. रात्री झोपण्याआधी सुरकुतलेल्या ओठांवर खोबरेल तेल लावा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजी