समीरा रेड्डी (actress Sameera Reddy) नेहमीच सोशल मिडियावर ॲक्टिव्ह असते. त्यातही तिच्या बऱ्याचशा पोस्ट खूपच वास्तववादी असतात. त्यामुळे ती जे काही सांगते किंवा व्हिडिओच्या माध्यमातून जे काही दाखवते, ते सर्वसामान्यांना खरोखरंच त्यांच्याशी कुठेतरी कनेक्ट होणारं वाटतं. त्यामुळे तिच्या पोस्ट चांगल्याच व्हायरल (viral post of Sameera Reddy) होत असतात. आता समीराने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर (instagram share) केली आहे. खरंतर ती ब्यूटी किंवा मेकअप अशा विषयांचा पोस्ट खूपच कमी शेअर करते. पण ही जी पोस्ट तिने शेअर केली आहे, ती ज्यांना डोळ्यांचा बेसिक मेकअप किंवा आयशॅडो (How To Apply Eye Shadow Perfectly) लावणं शिकायचं आहे, त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरणारी आहे.(eye makeup tips)
चेहऱ्याला फाउंडेशन, कन्सिलर लावणं, लिपस्टिक- लिपलायनर लावणं अनेकींना परफेक्टली जमतं. पण जेव्हा डोळ्यांच्या मेकअपचा विषय येतो, तेव्हा मात्र लगेच हात थरथरायला लागतो. कारण डोळ्यांचा मेकअप व्यवस्थित जमला तर आपला सगळा मेकअप छान दिसतो. आयशॅडो आणि आय लायनर हे डोळ्यांच्या मेकअपचे २ महत्त्वाचे भाग. आयशॅडो लावताना त्यात अनेकदा काही कर्व्ह घेतले जातात. एका टोकाने आयशॅडो शार्प केले जातात. दोन्ही डोळ्यांचे असे परफेक्ट एकसारखे कर्व्ह बऱ्याचदा जमतातच असे नाही. त्यामुळे मग सगळा मेकअप बिघडतो. म्हणूनच तर चमचा वापरून आयशॅडो कसं लावायचं, याची माहिती समीरा देत आहे.
समीराने सांगितलेली आयशॅडो लावण्याची पद्धत- अतिशय सोपी पद्धत समीरा सांगते आहे. यासाठी सगळ्यात आधी चमचा डोळ्यांना लावा. चमच्याचा खोलगट भाग आतल्या बाजूने असावा.- आता बरोबर चमच्याच्या बॉर्डरला आऊटलाईन केल्याप्रमाणे काजल पेन्सिलने डोळ्यावर रेघ काढून घ्या.- आता चमच्याचे जे खालचे टोक असते, ते डोळ्याच्या शेवटच्या टोकाला थोडंसं तिरक्या दिशेने ठेवा. आणि दोन्ही डोळ्यांभोवती शार्प कोन काढून घ्या.- आता बाहेरच्या बाजूने डार्क रंग आणि आतल्या बाजूने तुमच्या कपड्यांनुसार सोनेरी, सिल्व्हर अशा शेड्स वापरून मधली जागा भरून टाका. - अगदी परफेक्ट आयशॅडो लावले जाईल. - कधीतरी समीराची ही ट्रिक वापरून बघायला हरकत नाही.