Lokmat Sakhi >Beauty > थंडीच्या दिवसांत केसांना लावा हे खास तेल, केसांतला कोंडा होईल कमी- केस राहतील निरोगी

थंडीच्या दिवसांत केसांना लावा हे खास तेल, केसांतला कोंडा होईल कमी- केस राहतील निरोगी

Hair Care Tips: थंडी सुरू झाली की केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या खूप जास्त वाढते. हा त्रास कमी करण्यासाठी हिवाळा सुरू होताच केसांसाठी हे एक खास तेल (special home made hair oil for winter season) तयार करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 04:33 PM2022-10-28T16:33:54+5:302022-10-28T16:36:27+5:30

Hair Care Tips: थंडी सुरू झाली की केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या खूप जास्त वाढते. हा त्रास कमी करण्यासाठी हिवाळा सुरू होताच केसांसाठी हे एक खास तेल (special home made hair oil for winter season) तयार करा.

Special hair care oil for winter season, Home made hair oil that reduces dandruff | थंडीच्या दिवसांत केसांना लावा हे खास तेल, केसांतला कोंडा होईल कमी- केस राहतील निरोगी

थंडीच्या दिवसांत केसांना लावा हे खास तेल, केसांतला कोंडा होईल कमी- केस राहतील निरोगी

Highlightsहे तेल नियमितपणे लावल्यास केसांतील कोंडा तर कमी होतोच, पण केस निरोगी राहून त्यांची वाढही खूप चांगली होते. 

दिवाळी सरली आणि आता वातावरणात चांगलाच गारवा जाणवू लागला आहे. थंडीची (winter) चाहूल लागताच तिचा सगळ्यात पहिला परिणाम दिसून येतो, तो आपल्या त्वचेवर. सगळी त्वचा कोरडी होऊ लागते. डोक्याची त्वचा म्हणजेच स्काल्पदेखील याला अपवाद नाही. डोक्याची त्वचा कोरडी (dry scalp) पडली की तिला खाज सुटते आणि मग डोक्यांतला कोंडा वाढू लागतो. कोंड्याचं प्रमाण एवढं जास्त वाढतं की मग चारचौघांसमोर अगदी लाजिरवाणं होतं. शिवाय थोडी जरी हेअरस्टाईल बदलली तरी लगेचच कोंडा (how to reduce dandruff?) दिसू लागतो. म्हणूनच हाच त्रास कमी करण्यासाठी आणि केसांना पोषण मिळण्यासाठी हिवाळ्यात हे खास तेल वापरून बघा.

 

केसांतला कोंडा कमी करण्यासाठी खास तेल
हे तेल कसं तयार करायचं आणि त्याचे नेमके फायदे काय, याची माहिती इन्स्टाग्रामच्या meghnasfoodmagic या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
तेल तयार करण्यासाठी साहित्य
५०० मिली खोबरेल तेल
७ ते ८ आवळे

बाबा म्हणाला लॅपटॉपमध्ये गार्बेज फार, लेकीनं साबणानं घसाघसा कसा धुतला पहा.. व्हायरल व्हिडिओ
कढीपत्त्याची १५ ते २० पाने
१ टेबलस्पून मेथी दाणे
१ टेबलस्पून कलूंजी
जास्वंदाची ८ ते १० फुलं

 

कृती
१. खोबरेल तेल एका पातेल्यात काढा आणि गॅसवर ते मध्यम आचेवर गरम करायला ठेवून द्या.

२. आवळा किसून घ्या किंवा मग त्याचे बारीक काप करून घ्या.

दिवाळीसाठी मीरा कपूरने बनवलेल्या काजू कतलीचे फोटो व्हायरल, काय आहे त्या काजू कतलीत स्पेशल?

३. तेल तापायला ठेवलं की त्यात आवळा, कढीपत्ता, मेथीचे दाणे आणि कलुंजी टाका.

४. मध्यम आचेवर तेल ५ ते ७ मिनिटे उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा आणि तेल व्यवस्थित हलवून घ्या. 

५. तेल कोमट झाले की मग त्यात जास्वंदाची फुलं चुरून टाका. पातेल्यावर झाकण ठेवून द्या आणि त्यानंतर २४ तासांनी हे तेल गाळून बाटलीत भरून ठेवा.

६. हे तेल नियमितपणे लावल्यास केसांतील कोंडा तर कमी होतोच, पण केस निरोगी राहून त्यांची वाढही खूप चांगली होते. 

 

Web Title: Special hair care oil for winter season, Home made hair oil that reduces dandruff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.