Join us

चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी उन्हाळ्यात प्या हे खास ज्यूस, टॅनिंगही होईल दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:23 IST

Juice For Glowing Skin: हे खास ड्रिंक शरीर तर हायड्रेट ठेवतात आणि त्वचेलाही पोषण देतात. जर तुम्हाला त्वचा साफ, मुलायम आणि चमकदार ठेण्यासाठी हे ज्यूस पिणं सुरू करा.

Juice For Glowing Skin: उन्हाळ्यात त्वचेसंबंधी अनेक समस्यांचा सामना सगळ्यांनाच करावा लागतो. प्रखर उन्ह, घाम, धूळ, माती यामुळे त्वचा ड्राय, निर्जीव आणि टॅन होते. अशात त्वचा ग्लोइंग आणि हेल्दी ठेवण्यासाठी काही ड्रिंकचा डाएटमध्ये समावेश करू शकता. हे खास ड्रिंक शरीर तर हायड्रेट ठेवतात आणि त्वचेलाही पोषण देतात. जर तुम्हाला त्वचा साफ, मुलायम आणि चमकदार ठेण्यासाठी हे ज्यूस पिणं सुरू करा.

चमकदार त्वचेसाठी खास ज्यूस

१) काकडीचा ज्यूस

काकडी उन्हाळ्यात खाणं खूप जास्त फायदेशीर असते. कारण यात भरपूर प्रमाणात पाणी असतं. ज्यामुळे शरीर आणि त्वचा हायड्रेट राहते. या दिवसांमध्ये नियमितपणे काकडीचा ज्यूस प्याल तर त्वचेवर नॅचरल ग्लो यईल. तसेच शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतील आणि त्वचा फ्रेश दिसेल.

कसा बनवाल?

एका काकडीचे छोटे छोटे तुकडे करा. यात थोडा लिंबाचा रस आणि पदीन्याची पानं टाका. हे ब्लेंड करून गाळून घ्या आणि थंड थंड प्या.

२) गाजर आणि बिटाचा ज्यूस

गाजर आणि बिटाचा ज्यूस त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. यातील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटनं त्वचेचा टॉक्सिन्सपासून बचाव होतो आणि त्वचेवर नॅचरल ग्लो येतो.

कसा बनवाल?

१ गाजर आणि १ छोटं बीट सोलून कापून घ्या. हे ब्लेंडरमध्ये टाकून बारीक करा. यात एक छोटा आल्याचा तुकडाही टाकू शकता. यानं ज्यूसची टेस्ट आणखी वाढले. ज्यूस गाळून एका ग्लासमध्ये काढा आणि त्यात थोडा लिंबाचा रस टाकून प्या.

३) कोरफडीचा ज्यूस

कोरफडीचं जेल त्वचेसाठी वरदान मानलं जातं. त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या आणि काही आजारांना दूर करण्यासाठी कोरफडीचं जेल वापरलं जातं. यातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स त्वचेला हायड्रेट ठेवतात. तसेच नॅचरल ग्लो देतात. 

कसा बनवाल?

२ मोठे चमचे कोरफडीचं जेल घ्या. त्यात एक ग्लास पाणी आणि थोडं मध टाका. हे चांगल्याप्रकारे मिक्स करा आणि सकाळी उपाशीपोटी प्या.

४) टोमॅटोचा ज्यूस

टोमॅटोचा ज्यूसही त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो. यात लायकोपीन नावाचं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतं. जे प्रखर सूर्यकिरणांपासून त्वचेचा बचाव करता. टोमॅटोचा ज्यूस नियमित प्यायल्यानं त्वचेचा टॅनिंगपासून बचाव होतो आणि चेहरा चमकतो.

कसा बनवाल?

२ टोमॅटो घेऊन बारीक तुकडे करा. थोडं काळं मीठ आणि लिंबाचा रस टाकून ब्लेंड करा. ताजाताजा रस प्या.

६) डाळिंबाचा ज्यूस

डाळिंब त्वचेसाठी एक सुपरफूड मानलं जातं. यातील अ‍ॅंटी-एजिंग गुण त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात आणि त्वचा तरूण ठेवतात.

कसा बनवाल ज्यूस?

१ डाळिंबाचे दाणे काढा आणि ब्लेंड करा. हे गाळून पिऊ शकता. उन्हाळ्यात हा ज्यूस शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि हायड्रेट ठेवण्यासाठीही खूप फायदेशीर ठरतो.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स