Join us  

केसांचा चिकटा? कितीही शाम्पू करा, केस चिकट-चिप्पू चिप्पू दिसतात? करा हे ४ सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2021 6:24 PM

शाम्पू केल्यावर केस मस्त सिल्की, झुळझुळीत व्हावेत, असं आपल्याला वाटतं. पण काही जणांच्या बाबतीत असं होतच नाही. त्यांचे केस तसेच चिपचिपित राहतात. या समस्येसाठी हे काही घरगुती उपाय करून पहा.

ठळक मुद्देकेस मऊ, स्वच्छ आणि सिल्की होण्यासाठी मुलतानी माती लावण्याचा पर्यायही अतिशय चांगला आहे.

केस धुतल्यानंतर खरेतर ते छान दिसावेत, फुलून यावेत, हात लावल्यावर मऊ आणि सिल्की व्हावेत, अशी आपली अपेक्षा असते. पण काही जणींच्या बाबतीत असं काही होतच नाहीत. शाम्पू केला काय आणि नाही केला काय, त्यांच्या केसांचं टेक्स्चर काही बदलतचं नाही. शाम्पू केला की लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा केस हाताला चिकट लागतात. असे केस तेलकट नसतात. केसांवर अजिबात तेल दिसत नाही, पण तरीही केस एकमेकांना चिकटलेले असतात. तुमची डोक्याची त्वचा जास्त तेल सोडत असेल, तर या तेलात बाहेरची धुळ अडकते आणि मग केस चिपचिपीत होऊन जातात. या गोष्टी टाळायच्या असतील, तर काही उपाय निश्चितच करून बघितले पाहिजेत. जेणेकरून डोक्याच्या त्वचेतून अतिरिक्त तेल निघणार नाही आणि केस मोकळे, सिल्की राहतील.

 

चहा पावडरमेंदी भिजवतानाही आपण त्यात चहा पावडर टाकतो. चहा पावडर वापरल्यामुळे केस निश्चितच मोकळे होतात. हा उपाय करण्याठी एक ग्लास पाणी उकळत ठेवा. त्यात एक टेबलस्पून चहा पावडर टाका. हे मिश्रण १५ मिनिटे उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि ते थंड होऊ द्या. यानंतर हे पाणी केसांच्या मुळांना लावा. अर्ध्या तासने केस धुवून टाका. यामुळे केसांचा चिकटपणा कमी होतो. 

 

कढीपत्ता आणि दहीहा हेअरमास्क केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे. यामुळे केस चमकदार आणि सिल्की होतात. यासाठी एक कप कढीपत्त्याची पाने घ्या आणि त्यामध्ये तेवढेच दही टाका. हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्या. ही पेस्ट आता हळूवार हाताने केसांच्या मुळाशी लावा. अर्धा ते पाऊण तासाने केस धुवून टाका. या उपायामुळे केस मुळापासून स्वच्छ होतात आणि त्यांचा तेलकटपणा कमी होतो. 

 

मुलतानी माती आणि टोमॅटोकेस मऊ, स्वच्छ आणि सिल्की होण्यासाठी मुलतानी माती लावण्याचा पर्यायही अतिशय चांगला आहे. यासाठी एक चमचा मुलतानी मातीमध्ये एका मध्यम आकाराच्या टोमॅटोचा रस टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि केसांना लावा. १५ ते २० मिनिटांनी केस स्वच्छ धुवून घ्या. हा फेसपॅक डोक्यावर वाळू देऊ नका. ओलसर असतानाच धुवून टाका अन्यथा माती वाळली तर केस धुताना ते तुटू शकतात. 

 

कोरफडीचा गरकोरफडीचा गर केसांसाठी वरदान आहे. हळूवार हाताने कोरफडीचा गर केसांच्या मुळाशी लावा. अर्ध्या- पाऊण तासाने शाम्पू लावून केस स्वच्छ धुवून टाका. हा उपाय केल्यामुळे केसगळतीची समस्या तर कमी होतेच, पण केसांची वाढही चांगली होते आणि केसांचा पोत सुधारतो. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी